पुणे दि १७ डॉ. सतीश महामुनी
भारताचे पंतप्रधान व देशाचे कोहिनूर नरेंद्र दामोदरदास मोदी यांचा आज वाढदिवस आहे. 17 सप्टेंबर मराठवाड्यासाठी मराठवाडा मुक्ती संग्राम दिन याच दिवशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस हा संपूर्ण देशासाठी विकास दिन ठरला आहे. 2014 ते 2024 या दहा वर्षांमध्ये भारताने जी प्रगती केली जगामध्ये जे कर्तुत्व गाजवले याच्या पाठीमागे जी काम करणारी किमया आहे तिचे नाव आहे नरेंद्र मोदी.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टी आणि मित्रपक्ष यांच्याकडून कोणत्या कोणत्या कार्यक्रमाच्या रूपामध्ये वाढदिवस साजरा होत आहे जगभरामधून प्रधानमंत्री मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा येणार. भारतातील ग्रामीण भागामध्ये विशेषता महिलावर्ग आणि गरीब माणूस यांच्यासाठी नरेंद्र मोदींची कामगिरी ही देवदूचा सारखी आहे. देशाच्या कृषी क्षेत्राला स्थिर करण्याच्या अनुषंगाने नुकताच घेतलेला आयात कराचा निर्णय हा देखील महत्त्वाचा आहे. शेतीचे उत्पन्न दुप्पट करण्याचा निर्धार करून कृषी क्षेत्रासाठी वेगवेगळे योजना देण्याचे काम केंद्र सरकारने प्रधानमंत्री मोदी यांच्या व कृषिमंत्री शिवराज सिंग चव्हाण यांच्या माध्यमातून जलद गतीने सुरू आहे. शेतकरी वर्गामध्ये नरेंद्र मोदी यांच्या कृषी क्षेत्रातील योजना निश्चितपणे स्वीकारला गेलेले आहेत. खूप मोठ्या प्रमाणावर काम देखील सुरू आहे. रस्ते विकास आणि रेल्वे विकास या दोन क्षेत्रांमध्ये मोदी सरकारने मागील 10 वर्षांमध्ये जे काम केले आहे ते या देशाच्या यापूर्वीच्या सरकारने 70 वर्षांमध्ये करू शकले नाहीत एवढे प्रचंड काम या काळात झालेले आहे. या दहा वर्षात झालेल्या विकासाचे दुसरे वैशिष्ट्य असे आहे की कोणतेही काम जलद गतीने करणे कोणताही अडथळा न निर्माण करता ते काम वेळेमध्ये पूर्ण करणे आणि उद्घाटन व भूमिपूजन अशा दोन्ही पातळीवर केंद्र सरकार आणि राज्य सरकार चांगले काम करीत आहे. डबल इंजिन सरकार असणाऱ्या राज्यामध्ये याचा परिणाम अधिक मोठ्या प्रमाणात आहे. ज्या राज्यामध्ये भाजपची सत्ता नाही तेथे नरेंद्र मोदी यांच्या योजनांना विरोध देखील झाला आहे. नरेंद्र मोदी यांच्या योजना विरोधी पक्षाचे सरकार राबविणार नाहीत याचा केंद्र सरकारला अंदाज आलेला असल्यामुळे अनेक योजनांमध्ये थेट लाभार्थी पर्यंत मदत पोहोचवण्याचे काम करणारी यंत्रणा केंद्र सरकारने निर्माण करण्यामध्ये बऱ्यापैकी यश प्राप्त केले आहे.
नरेंद्र मोदी यांचे वक्तृत्व आणि भाषण शैली त्याचबरोबर भाषणामधील मानले गेलेले विषय त्या विषयाच्या अनुषंगाने व्यक्त केलेले विचार या सगळ्यांचा परिपाक म्हणजे नरेंद्र मोदी हे प्रभावी शस्त्र आहे ते शब्दांनी सभा जिंकतात आणि आपल्या वाढीने लोकांची मनी जिंकतात हेच वेळोवेळी सिद्ध झाले आहे. निवडणुकांची भाषणे असो अथवा सभा संमेलना मधील भाषणे असो नरेंद्र मोदीचे बोलतात ते ऐकल्यानंतर विरोधक देखील त्यांच्यावर टीका करू शकत नाहीत एवढे सुंदर आणि समर्पक विचार मोदी यांच्या वाणी मधून व्यक्त होतात त्यांना ऐकणे ही खूप मोठी परभणी आणि मैफिल ठरते.
भारतीय राजकारणाला सामान्य माणसाच्या पायावर लीन करण्याची क्षमता नरेंद्र मोदी यांनी राजकारणामध्ये निर्माण केली कोणताही विषय असो तो सार्वजनिक झाला पाहिजे अशा प्रकारचा त्यांचा अजेंडा देशामध्ये खूप लोकप्रिय ठरला. यापूर्वीची काँग्रेस सरकारची कामगिरी पाहिल्यानंतर आजचे 2014 पासून सुरू असलेले सरकार अनेक पटींनी भ्रष्टाचार मुक्त आहे याच्यावर सामान्यतः विश्वास बसलेला आहे केंद्र सरकारने ज्या मोठ्या योजना दिल्या उज्वला गॅस योजना आणि जनधन योजना मुद्रा योजना शेतकरी सन्मान योजना घरकुल योजना प्रधानमंत्री सडक योजना पिण्याच्या पाण्याच्या योजना घरघर लाईट योजना एलईडी निर्माण करणारी यंत्रणा औद्योगीकरणांमध्ये विकास मोबाईल सेक्टरमध्ये करण्यात आलेली वाढ संगणक क्षेत्रात करण्यात आलेली क्रांती ही व्हेईकल इलेक्ट्रिक कार याला दिलेले प्रोत्साहन सीएनजी आणि इथेनॉल पासून चालणारी वाहने निर्माण होण्यासाठी शासनाने घोषित केलेल्या योजना याशिवाय सौरऊर्जेसाठी सर्व देशांमध्ये सरकारने दिलेले अनुदान एक नाही अनेक क्षेत्रांमध्ये मोदी सरकारची कामगिरीही मोदी है तो मुमकिन है याची साक्ष देणारी आहेत.
मोदींची चालू असलेली कामगिरी लक्षात घेऊन विरोधी पक्षातील अनेक मातब्बर नेते भारतीय जनता पार्टीमध्ये सामील झाले हा देखील मोदी यांच्या कामाचा करिष्मा आहे. भारतीय राजकारण आणि भारतीय जनतेच्या कल्याणासाठी सुरू असलेले नरेंद्र मोदी यांचे काम 2019 पर्यंत अविरत सुरू राहणार आहे या वाढदिवसाच्या निमित्ताने न्यूज मराठवाडा परिवाराच्या वतीने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना हार्दिक शुभेच्छा त्यांच्या हातून भारताची अविरत सेवा घडत राहो सैन्य दलामध्ये काम करणाऱ्या सर्व सैनिकांना नरेंद्र मोदी यांच्या हातून उत्तम पाडवळ मिळून देशामध्ये कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याला त्याचे उत्पन्न दुप्पट करून देण्यासाठी नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून चांगल्या योजना यशस्वी होऊन शेतकरी बळीराजा सुखी संपन्न होऊ देशामधील तरुणाई देशात आणि जगामध्ये चांगल्या नोकऱ्या आणि चांगले उद्योजक निर्माण करेल त्यासाठी मोदी सरकार त्यांना योग्य ते पाठबळ देईल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. डॉक्टर सतीश महामुनी संपादक न्यूज मराठवाडा तुळजापूर जिल्हा धाराशिव महाराष्ट्र ९८९००२४९१०