तुळजापूर दि २४डॉ.सतीश महामुनी
धाराशिव जिल्ह्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सर्व जिल्हाभर”सेवा पंधरवाडा”विविध सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात येत आहे युवा मोर्चाचे उत्साही आणि कल्पक पदाधिकाऱ्यांनी खूप चांगले आयोजन केलेले आहे ज्यामधून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर प्रेम करणाऱ्या ग्रामीण भागातील माणसाला देखील या कार्यक्रमांमध्ये सहभागी होत आले आहे असे उद्गार भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार राणा जगजीत सिंह पाटील यांनी काढले.
या कार्यक्रमा अंतर्गत 23 सप्टेंबर २०२३ रोजी येथे देशाचे पंतप्रधान ” नरेंद्रभाई मोदी ” यांच्या जन्मदिनाच्या औचित्याने “सर्वश्रेष्ठ दान-रक्तदान” कार्यक्रम धाराशिव ग्रामीण मंडळात धाराशिव भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने घेण्यात आले. युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राजसिंह राजे निंबाळकर यांनी या पंधरा दिवसांमध्ये धाराशिव जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येत आहे या कार्यक्रमासाठी लोकांमधून मिळणारा प्रतिसाद खूप चांगला आहे ज्याच्यामुळे आमचा उत्साह आणखी वाढला आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता आणि त्यांच्यावर प्रेम करणारी ग्रामीण भागातील जनता या उपक्रमामुळे आपल्या मनातील भावना व्यक्त करतात असे आपल्या प्रास्ताविकात सांगितले.
या निमित्ताने आमदार राणा जगजितसिंह पाटील म्हणाले की भारतामध्ये जलद गतीने विकासाची गंगा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कामामधून पोचली जात आहे वेगवेगळ्या सेक्टरमध्ये वेगवेगळ्या योजना आज राबविण्यात येत आहेत एकाच वेळी देशाचा सर्व भागात विकासाच्या प्रकल्पाला गती देऊन स्थानिक रोजगार स्थानिक बाजारपेठ आणि कौशल्यावर आधारित कार्यक्रम राबविण्यात मध्ये देशाने मोठी आघाडी घेतली आहे जगभरामध्ये भारताचा जो डंका निर्माण झाला आहे या सर्व कामाच्या पाठीमागे नरेंद्र मोदी यांची दूरदृष्टी आणि केंद्रीय मंत्रिमंडळातील सर्व मंत्री महोदयांचे प्रयत्न कारणीभूत आहेत महाराष्ट्रामध्ये देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या नियोजनांमधून प्रत्येक जिल्ह्यामध्ये विकासाचे प्रकल्प सुरू आहेत उपेक्षित आणि अनेक वर्ष रिंगात पडलेल्या योजना देखील तातडीने मार्गी लागल्या जात आहेत मंत्रिमंडळाच्या कामावर जनता अत्यंत समाधानी आहे असे शब्दात त्यांनी राज्य आणि केंद्र सरकारचा गौरव केला
याप्रसंगी लासोना ग्रामस्थ मधील असंख्य युवकांनी सहभाग नोंदवाला, यावेळी 57 रक्तदात्याने रक्तदान केले.
या रक्तदान शिबिराचे उदघाटन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते करण्यात आले ,यावेळी प्रमुख उपस्थिती माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे ,जिल्हाध्यक्ष भाजयुमो राजसिंहा राजेनिंबाळकर, माजी जिल्हापरिषद अध्यक्ष नेताजी पाटील, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष ओम नाईकवाडी ,दत्ता देशमुख ,सरपंच संगमेश्वर स्वामी ,हिम्मत भोसले ,प्रसाद मुंडे , श्रीमंत पाटील ,शरदराव यादव
जोतिराम काटे, (पोलिस पाटील),संजय पवार ,प्रशांत यादव ,आण्णासाहेब पाटील,सुभाष नाईकनवरे ,जयराम पाटील
,योगेश सावंत (अध्यक्ष), राजेश यादव (उपाध्यक्ष)यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक ,युवक उपस्थित होते . याप्रसगी जिल्हाध्यक्ष भाजयुमो धाराशिवराजसिंहा राजे निंबाळकर यांनी रक्तदान केलेल्या रक्त दात्याचे आभार मानले.