भारतीय सिनेमा भारतीय संस्कृती व परंपरेचे संवाहक हिंदी सप्ताह कार्यक्रम – प्रा.ज्योतिर्लिंग क्षीरसागर

तुळजापूर,दि.११, येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित तुळजाभवानी महाविद्यालय तुळजापूर येथे हिंदी सप्ताहाच्या निमित्ताने कनिष्ठ विभागाचे स्टाफ सेक्रेटरी प्रा ज्योतिर्लिंग क्षीरसागर यांचे भारतीय सिनेमा व हिंदी भाषा या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना त्यांनी वरील प्रतिपादन केले.

आपल्या व्याख्यानात ते पुढे म्हणाले की,१९१३ साली भारतीय सिनेमाची दादासाहेब फाळके यांनी राजा हरिश्चंद्र सिनेमा निर्माण करुन मुहूर्त मेढ रोवली,हा पहिला मूक चित्रपट होता ही भारतीय सिनेमाची खरी नांदी होती,,१९१३ ते १९१८ या कालावधीत त्यांनी २३ चित्रपट निर्माण केले,१९६४ मध्ये राजश्री प्रोडक्शन खाली ताराचंद बडजात्यांनी दोस्ती चित्रपटाची हिंदी भाषेत निर्मिती करुन हिंदी चित्रपट सृष्टीला एक नवी दिशा दिली, हिंदी चित्रपटात समाजातील वास्तविकता दाखवली जाते, भारतीय समाजाची किंवा भारतीय मनाची नाळ ही हिंदी चित्रपट सृष्टीमुळे एकमेकांशी जुळली गेली.हम सब एक है, भारतीय है,ही भावना देशभक्तीपर हिंदी चित्रपटांनी विश्वाला दिली,जी २० परिषदेमध्ये सुध्दा परदेशी पाहुणे, पत्रकार यांनी हिंदी भाषेचा व्यापक स्तरावर प्रयोग केल्याचे दिसून आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समापणात महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य मेजर डॉ वाय ए डोके म्हणाले की, हिंदी ही भारतीय मनाची भाषा आहे,एका मनाशी दुसरे मन हळुवार संवाद साधत असते या संवादामध्ये सौंदर्यमयी भाषा हिंदी कवितांच्या आणि गितांच्या माध्यमातून अफलातूनपणे कार्य करते,मातृभाषेएवढेच प्रेम आपण भारतीय भाषा हिंदीला महत्त्व द्यावे असे अनमोल विचार यावेळी त्यांनी मांडले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा विवेकानंद चव्हाण यांनी केले.सदर कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस एम मणेर यांच्या मार्गदर्शनानुसार संपन्न झाला.कार्यक्रमाचे आभार डॉ मंत्री आर आडे यांनी मानले.यावेळी डॉ रामा रोकडे यांच्या सह सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *