शारदीय नवरात्र महोत्सव आढावा बैठक संपन्न
तुळजापूर दिनांक 25 वृत्तसेवा
सर्व खात्यांचा समन्वय ठेवून येणाऱ्या शारदीय नवरात्र महोत्सवांमध्ये भाविकांची सोय करण्यात यावी अशा सूचना धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा तुळजाभवानी मंदिर संस्थांचे अध्यक्ष डॉक्टर सचिन ओंबासे यांनी तुळजापूर येथे घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत दिले आहेत
तुळजापूर येथील पंचायत समिती सभागृहामध्ये आयोजित केलेल्या शारदीय नवरात्र महोत्सव आढावा बैठकीदरम्यान सर्व खात्यांच्या तयारीचा पूर्ण आढावा या बैठकीत घेण्यात आला बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे होते बैठकीस जिल्हा पोलीस प्रमुख अतुल कुलकर्णी आणि इतर महसूल अधिकारी उपस्थित होते
या बैठकीमध्ये नगरपरिषद प्रशासन तुळजापूर पोलीस प्रशासन तुळजाभवानी मंदिर प्रशासन राज्य परिवहन महामंडळ वीज वितरण कंपनी सार्वजनिक बांधकाम विभाग आरोग्य विभाग यांच्यासह इतर विभागाचे अधिकारी बैठकीस उपस्थित होते. या बैठकीमध्ये येणाऱ्या शारदीय नवरात्र महोत्सवामध्ये भाविकांची सुविधा होण्याच्या अनुषंगाने मागील वर्षाच्या मास्टर प्लॅन प्रमाणे यावर्षी देखील सुविधा करण्यात येतील असे सांगण्यात आले या अनुषंगाने सर्व खात्याचा समन्वय ठेवून भाविकांना सुलभ दर्शन देण्यात येईल असे सांगण्यात आले अष्टमी आणि कोजागिरी पौर्णिमा या जास्तीची गर्दी असलेल्या यात्रा काळात पोलीस प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली गर्दीवर नियंत्रण करण्यात येईल शहराच्या बाहेरून येणाऱ्या सर्व मार्गावर तात्पुरती वाहन तळे उभारणी यासाठी भूसंपादन आणि सर्व प्रक्रियेला पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आरोग्य विभाग आणि पोलीस कर्मचारी यांना राहण्यासाठी सुविधा करण्यात येतील असेही या बैठकीत सांगण्यात आले.