मराठवाडा मुक्ती संग्रामातील बलिदानाचा आणि शौर्याचा वारसा हजारो पिढ्यांसाठी अभिमानास्पद आहे. त्या सर्व ज्ञात अज्ञात हुतात्म्यांच्या स्मृतीचा जागर आणि खऱ्या अर्थाने आपल्या मराठवाडा मुक्ती संग्राम भारतीय स्वातंत्र्याच्या पूर्णत्वाचा अमृत महोत्सव वर्षानिमित्त देशभक्तीचा पुल्लिंग… मनामनात पेटवणारी…. राष्ट्रीय शिक्षण स्वदेश मातृभाषा भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवणारी स्वातंत्र्य प्राप्तीसाठी आत्मबलिदानाची तयारी करणारे तरुण हैदराबाद मुक्तिसंग्रामात तयार करणारी… हैदराबाद मुक्तिसंग्रामाचे आद्यपीठ राष्ट्रीय शाळा हिप्परगा (रवा) या राष्ट्रीय शाळेची स्थापना अनंतराव कुलकर्णी व व्यंकटराव देशमुख यांनी १९२१ च्या विजयादशमीच्या दिवशी रामचंद्र होनाळकरांच्या वाड्यामध्ये शाळेची स्थापना केली.
निजाम राजवटीत या शाळेला परवानगी नव्हती म्हणून या शाळेतील विद्यार्थी मुंबई बोर्डामध्ये बसवण्यात आले संपूर्ण मुंबई बोर्डामध्ये ही शाळा प्रथम क्रमांकावर आली होती.
पुढे चालून याच शाळेमध्ये इंग्रजीचे शिक्षक म्हणून व्यंकटेश खडकीकर (स्वामी रामानंद तीर्थ) हे हिप्परगाच्या शाळेमध्ये आले आणि त्यांच्यासोबत बाबासाहेब परांजपे सुद्धा आले व स्वामीजी नंतर मुख्याध्यापक झाले १४ जानेवारी १९३२ च्या मकर संक्रमणा दिवशी गावाजवळच असलेल्या कोंडीबा लोमटे यांच्या आमराईच्या वाड्यामध्ये त्यांनी स्वामीनारायण यांच्याकडून दीक्षा घेतली व संन्यास स्वीकारला याच दिवशी व्यंकटेश खडकीकरांचे नाव स्वामी रामानंद तीर्थ असे झाले.
क्रांतिवीर दत्तोबा भोसले.
हेही याच शाळेतील विद्यार्थी होते व त्यांनी अखिल भारतीय जिमखाना बडोदा येथे कुस्ती खेळून सतत तीन वर्ष यांनी ढाल मिळवली होती.
1943 ला हिप्परग्यात वार्षिक उत्सव झाला या वार्षिक उत्सवाला हजेरी लावणारे न.ची केळकर, वि. स खांडेकर ग. त्र्य माडगूळकर, कवी गिरीश कवी मायदेव, कवी सोपानदेव चौधरी, दत्तो अप्पाजी तुळजापूरकर, वामन नाईक हैदराबाद, श्रीधरराव नाईक, प्रसिद्ध चित्रकार दलाल, धनराज गिरजी हैदराबाद, गिरराव अण्णा घाटे वकील गुलबर्गा, विनायक महादू भुस्कुटे पुणे, गोपाळराव एकबोटे, दिगंबरा बिंदू, किर्लोस्कर पिता पुत्र, गोपाळ कृष्ण देवधर. यांनी शाळेला भेट देऊन शाळेसंबंधी गौरवास्पद उद्गार काढले प्रसिद्ध साहित्यिक वि स खांडेकर यांनी किर्लोस्कर मासिकात “हिप्पर्ग्याच्या फुलबाग” असा सुंदर लेख लिहिला या उत्सवाला गावातील अमृत बाबाराव भोसले (दादाराव मास्तर) हे शारीरिक शिक्षक होते व त्यांच्या जोडीस शिवाप्पा होनाळरकर हे मला खांबात तरबेज होते यांनी या उत्सवा दरम्यान सर्व विद्यार्थ्यांचे शारीरिक खेळांची तयारी करून घेतली होती.
बाबासाहेब परांजपे विज्ञानाचे शिक्षक बॉम्ब तयार करायचे प्रशिक्षण देत असत त्यांना मदत गावातील स्वातंत्र्यसैनिक पंढरीनाथ मुळे हे पोस्टमास्तर होते हे गावाला टपाल घेऊन येताना टपाला सोबत दारूगोळा बनवायचे साहित्य आणायचे ते पोस्ट मास्तर असल्यामुळे त्यांची चौकशी कोणी करत नसत व त्या काळात दारूगोळा बनवण्याचे प्रशिक्षण सुद्धा येथे दिले जायचे.
हिप्परगा येथील शाळेचे विश्वस्त मंडळ
१) भास्कर राव जी वकील नळदुर्ग (अध्यक्ष)
२) अनंतराव कुलकर्णी (व्यवस्थापक)
3) विश्वनाथराव तावशीकर (सह व्यवस्थापक )
४) रामरावजी वकील (उमरगा)
५) व्यंकटरावजी वकील (हिप्परगा)
६) देविदास राव नाईक तुळजापूरकर (हिशोब तपासणी)
७) विश्वनाथ होनाळकर (हिप्परगा)
८) व्यंकटराव खेडगीकर स्वामी रामानंद तीर्थ (मुख्याध्यापक)
९) कोंडोपंत कानडे
या शाळेचे विद्यार्थी शिवाप्पा लिंबराज गिराम महाराज यांनी गावोगावी जाऊन रजा कराच्या जुलमी सत्तेविरोधात यांनी कीर्तनाच्या माध्यमातून जनजागृती केली
दत्तोबा भोसले यांच्या नेतृत्वाखाली लढला गेलेला देवताळ्याचा रणसंग्राम 1948 साली झाला.त्यावेळेस रझाकार संपले म्हणून त्यांचे बंधू नरसिंग रामचंद्र होनाळकर यांनी देवताळ्याहून येताना प्रतीक म्हणून एक शीला गावात आणली व गावाजवळ असलेल्या पूर्व बाजूच्या माळावर देवताळ्याच्या देवीची प्रतिष्ठापना केली. आज त्या ठिकाणी छोटेसे मंदिर पूर्ण करण्यात आले आहे.
आजही हे मंदिर निजामशाहीतून मुक्त झाल्याचे साक्ष देत आहे.
मुरलीधर बसवंत होनाळकर
मो. 9373019306