समग्र प्रकाशनच्या तुळजापूरच्या माधुरी पुराणिक लिखित – “कविता पिढ्यापिढ्यांची” कवितासंग्रहाचा आज प्रकाशन सोहळा

मराठवाडा साहित्य परिषद शाखा तुळजापूर आयोजित

साठ वर्षांपूर्वी तुळजापूरच्या तीर्थक्षेत्री तुळजाभवानी देवीच्या विविध काव्यरचना लिहिल्या गेल्या या प्राचीन कवितांचा नव्या स्वरूपात काव्यसंग्रह कॉम्प्युटर इंजिनियर असणारे तुळजापूर येथील गायक व मराठा साहित्य परिषदेचे सदस्य रंगराज पुराणिक यांच्या प्रयत्नांनी आज पुन्हा एकदा शक्तीपीठ असणाऱ्या तुळजापूर नगरीमध्ये प्रकाशन सोहळ्याच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या जनतेसमोर सादर होत आहे. अखिल भारतीय साहित्य अकादमी चा पुरस्कार प्राप्त देविदास सौदागर यांची या कार्यक्रमाला उपस्थिती असल्यामुळे या प्रकाशन सोहळ्याला धाराशिव जिल्ह्याच्या साहित्यिक चळवळीमध्ये विशेष महत्त्व आहे.

धाराशिव जिल्ह्याच्या इतिहासामध्ये जे साहित्य आजपर्यंत निर्माण झालेले आहे कविता संग्रह विभागामध्ये अत्यंत अनुभवी आणि तुळजाभवानी देवीची निस्सीम सेवा करणाऱ्या कला गौरव पुरस्कार विजेत्या ज्येष्ठ कवियत्री शकुंतलादेवी पाठक ( बत्तासे) यांच्या कवितांचा यामध्ये समावेश आहे. जुन्या आणि नव्या कवितांचा हा अनमोल मिलाफ “कविता पिढ्यानपिढ्याची”याद्वारे होत आहे.

या प्रकाशन सोहळ्याच्या निमित्ताने मान्यवरांची उपस्थिती असून शुभहस्ते श्री. द. वि. अत्रे अध्यक्ष, महाराष्ट्र साहित्य परिषद,
शाखा देहूगाव , कार्यक्रमाचे अध्यक्ष अमर हरिश्चंद्र हंगरगेकर
अध्यक्ष, मराठवाडा साहित्य परिषद, शाखा तुळजापूर प्रमुख उपस्थिती दास पाटील संचालक, समग्र प्रकाशन यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे. अखिल भारतीय साहित्य अकादमी चा पुरस्कार प्राप्त साहित्य देविदास सौदागर यांची या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती आहे.
मागील पिढ्यांचा कवितेचा वारसा या कविता संग्रहाच्या माध्यमातून मराठी वाचकासमोर सादर होणार आहेत.

मागील पिढीतील अनुसुया रामचंद्र तारापूरकर (पुराणिक), गीता जानकीराम पुराणिक, शकुंतला सखाराम पाठक (बत्ताशे), यांच्यासह नवीन पिढीतील राणीमंजुषा पुराणिक, जयश्री पुराणिक, रंगराज पुराणिक यांच्या कवितांचे संकलन आणि संपादन श्रीमती माधुरी पुराणिक यांनी केले आहे. तसेच त्यांच्या स्वतःच्या कविताही या संग्रहात समाविष्ट केलेल्या आहेत.

एका परिवारातील लिहित्या हातांचे हे काव्यसंकलन ” कविता पिढ्यापिढ्यांची ” या कवितासंग्रहाच्या माध्यमातून रसिकार्पण होत आहे. या कवितासंग्रहाच्या प्रकाशन सोहळ्यास आपण उपस्थित राहावे असे आवाहन संयोजकांच्या वतीने रंगराज पुराणिक यांनी केले आहे.

समग्र प्रकाशन सोहळा आज् सायंकाळ शनिवार, दि. १३ जुलै २०२४ वेळ – सायं. ५.३० वा.
स्थळ : श्रीकृष्ण मंदीर सभामंडप विश्वासनगर, धाराशिव रोड तुळजापूर येथे संपन्न होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *