सहाय्यक अभियंता विशाल कांबळे यांचा तुळजापुरात मनसेच्या वतीने सत्कार

तुळजापूर दिनांक 17 न्यूज मराठवाडा

महाराष्ट्र नवनिर्माण सेने तर्फे मनसे विज कामगार सेनेचे राज्य सचिव विशाल कांबळे यांची तुळजापुर महावितरण ग्रामीणला साहाय्यक अभियंता म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल यांचा सत्कार करण्यात आला . महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तुळजापूर तालुका पदाधिकाऱ्यांनी सहाय्यक अभियंता विशाल कांबळे यांचे स्वागत करण्याच्या अनुषंगाने शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

यावेळी उपस्थित शेतकरी सेना तालुका अध्यक्ष झुंबर काळदाते, शहर अध्यक्ष धर्मराज सावंत, सचिव धनाजी साठे, शेतकरी सेना उपजिल्हाध्यक्ष अमोल मोठे,तालुका संघटक उमेश कांबळे, तालुका उपाध्यक्ष अक्षय साळवे,विज कामगार सेना माझी तालुका अध्यक्ष खंडु कुंभार,म.वि.से.तालुका उपाध्यक्ष गणेश बिराजदार,राम ढगे, वैभव इंगळे,सागर मोकाशे,सुरेश पवार, नेताजी भिसे, इतर मनसेनिक उपस्थित होते.

तुळजापूर तालुक्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जनतेच्या प्रश्नासाठी सातत्याने पक्षाचे कार्यकर्ते प्रयत्न करीत असतात प्रशासनावर चर्चा करून प्रश्न सोडवणे आणि प्रशासनाच्या अडचणी देखील वरिष्ठापर्यंत पोहोचून त्या सोडवण्यासाठी प्रयत्न केले जातात त्यामुळे प्रशासन गतिमान होते आणि लोकांचे प्रश्न सोडवले जातात असा निर्वाळा या निमित्ताने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष धर्मराज सावंत आणि सचिव धनाजी साठे यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *