29 ऑगस्ट रोजी लेडीज क्लबच्या मैदानावर होणार भव्य मंगळागौर स्पर्धा, सौ अर्चनाताई पाटील त्यांच्या उपस्थितीत महिलासाठी “आनंद सोहळा”

तुळजापूर दि 28 डॉ. सतीश महामुनी

उस्मानाबाद जिल्ह्यातील महिलांना लेडीज क्लब उस्मानाबाद अध्यक्ष सौ अर्चनाताई राणा जगजीत सिंह पाटील वतीने वतीने पारंपारिक मंगळागौर स्पर्धेचे आयोजन लेडीज क्लब उस्मानाबाद येथे करण्यात आले आहे यामध्ये जास्तीत जास्त संघाने सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.

महिला वर्गासाठी हा कार्यक्रम आनंद उत्सव ठरणारा आहे. बाई पण भारी देवा या चित्रपटाला महिलांनी दिलेल्या प्रतिसाद या कार्यक्रमांमधून पुन्हा एकदा व्यक्त होणार आहे. जिल्ह्याच्या सांस्कृतिक इतिहासामध्ये लेडीज क्लबच्या या उपक्रमाची गौरवाने नोंद होणार आहे. संस्थेचे अध्यक्ष सौ अर्चनाताई पाटील यांच्या नेतृत्वाखाली होणारा हा आनंद सोहळा तेवढाच दिमागदार असणार आहे.

29 ऑगस्ट 2023 रोजी दुपारी तीन वाजेपासून कार्यक्रमाला सुरुवात होत आहे . बाई पण भारी देवा या चित्रपटाने महिलांना जगण्याचा नवा संदेश दिला आहे आधुनिक आणि पारंपारिक जीवन पद्धती त्याचबरोबर दररोजच्या जीवनामध्ये आपण करीत असलेले संसारिक कामकाज याच्या व्यतिरिक्त महिलांनी व्यक्त होण्यासाठी मोठी सुवर्णसंधी लेडीज क्लबचे अध्यक्ष सौ अर्चनाताई पाटील यांच्याकडून उपलब्ध करून दिली आहे. किमान दहा व कमाल 20 महिलांचा संघ या स्पर्धेमध्ये सहभागी होऊ शकतो ज्यामध्ये मंगळागौर आणि इतर पारंपारिक खेळ महिलांना सादर करता येणार आहे. तमाम महिला वर्गासाठी हा मोठा आनंद उत्सव आहे. कार्यक्रमाच्या ठिकाणी आधुनिक आणि पारंपारिक गीतावर महिलांना नृत्य करता येणार असून आपल्या उपजत कलागुणांना वाव देण्यासाठी व्यासपीठ लेडीज क्लबचे अध्यक्ष अर्चनाताई पाटील यांनी उपलब्ध करून दिले आहे. विजेता संघांना 1 लाख रुपयांचे आकर्षक पारितोषिक दिले जाणार आहे. सांघिक स्वरूपामध्ये प्रथम पारितोषिक 50 हजार रुपये रोख, द्वितीय पारदर्शक 30 हजार रुपये रोग तृतीय पारदर्शक 20 हजार रुपये रोख ठेवण्यात आले आहे.

या स्पर्धेच्या अनुषंगाने लेडीज क्लबचे अध्यक्ष अर्चनाताई पाटील यांनी सांगितले की यापूर्वी जिल्ह्याच्या विविध ठिकाणी स्त्रियांसाठी बाई पण भारी द्यावा हा सिनेमा मोफत दाखवला गेला तेव्हा महिला वर्गांनी खूप चांगला प्रतिसाद दिला सिनेमा पाहिल्यानंतर महिलांचे सिनेमा संदर्भातील समाधान पाहिल्यानंतर अशा प्रकारचे विविध उपक्रम लेडीज क्लबच्या माध्यमातून करण्यासाठी प्रोत्साहन मिळाले त्यामधून हा मंगळागौर स्पर्धा कार्यक्रम आयोजित केला आहे असे त्यांनी सांगितले.

लेडीज क्लब उस्मानाबाद च्या वतीने महिलासाठी होणारे या कार्यक्रमाकडे सर्व महिलांची लक्ष लागले आहे मोठ्या संख्येने महिला वर्ग या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी उत्सुक आहे या अनुषंगाने लेडीज क्लबच्या मैदानावरील कार्यक्रमाची पूर्वतयारी पूर्ण झाली आहे 29 ऑगस्ट रोजी दुपारी 3.00 वाजता प्रत्यक्ष महिलांचे संघ येणार आहेत. मंगळागौरीच्या या खेळामध्ये कोण बाजी मारणार याकडे राज्यातील महिला वर्गाचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *