तुळजापूर दिनांक 5 डॉक्टर सतीश महामुनी
धाराशिव जिल्ह्यातील खरिपाची पीक परिस्थिती आणि हंगामातील प्रतिकूल नैसर्गिक परिस्थिती यामुळे सर्व शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे नुकसानीचे प्रमाण 50% पेक्षा जास्त असल्याचा अहवाल धाराशिव चे जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे आणि जिल्हा कृषी अधिकारी यांच्याकडून कृषी आयुक्त पुणे आणि विभागीय आयुक्त छत्रपती संभाजी नगर यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला आहे. जिल्ह्याची माजी पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांनी तुळजापूर येथे शिक्षक दिन पाच सप्टेंबर रोजी पत्रकार परिषद घेऊन प्रशासन आणि तातडीने 25% अग्रीमची रक्कम शेतकऱ्याच्या खात्यावर जमा करावी अशी मागणी केली आहे.
धाराशिव जिल्ह्यामध्ये सोयाबीन हे मोठ्या प्रमाणावर उत्पादन देणारे पीक आहे त्याचबरोबर तूर उडीद आणि मूग या पिकाची पेरणी करण्यात आलेली आहे .5 लाख 4 हजार 726 हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन मूग उडीद आणि मका या पिकाची पेरणी करण्यात आलेली आहे. मागील 35 दिवसापासून पाऊस न झाल्यामुळे जिल्ह्यावर प्रचंड मोठे संकट कोसळले आहे शेतकऱ्याला सहकार्य केल्याशिवाय धाराशिव जिल्ह्यातील शेती आणि शेतकरी जगणार नाही त्यासाठी वेगवेगळ्या राजकीय पक्षाकडून आणि राजकीय नेत्याकडून प्रशासन आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्याकडे वेगवेगळी निवेदन देऊन मागणी करण्यात आली आहे जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी यापूर्वी प्रशासनाकडे यासाठी पाठपुरावा केलेला आहे तर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांनी तुळजापूर येथे शासकीय विश्रामगृहा येथे पत्रकार परिषद घेऊन जिल्ह्यातील सर्व मंडळातील शेतकऱ्याला मदत मिळाली पाहिजे ही मदत तातडीने दिली गेली पाहिजे अशीच जोरदार मागणी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केली. यापूर्वी आपण जिल्हाधिकारी महोदय जिल्हा कृषी अधिकारी यांच्याकडे खरीप पिकाचे झालेले नुकसान प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिलेले आहे बारीक-सारीक चुका झाल्यामुळे शेतकरी मदतीपासून वंचित राहतात ही बाब देखील मधुरा चव्हाण यांनी जिल्हा प्रशासनाच्या लक्षात आणून दिली त्यांनी केलेल्या सर्व सूचनांचे अवलोकन जिल्हा कृषी अधिकारी व जिल्हाधिकारी महोदय यांनी केलेल्या असून तातडीने शेतकऱ्याला मदत मिळालीच पाहिजे अशी भूमिका त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये मांडली तुळजापूर तालुक्यातील दोन मंडळ वगळल्याचे बाब देखील एक तारखेच्या अगोदर आपण निदर्शनास आणून दिली अशी माहिती पत्रकार परिषदेच्या माध्यमातून माजी पालकमंत्री चव्हाण यांनी दिली.
शेतकऱ्यांनी शेती कशी करावी जगावे की मरावे अशी परिस्थिती निर्माण झाल्याचे चिंताजनक वक्तव्य माजी पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांनी केली मोठ्या कठीण परिस्थितीमध्ये जिल्ह्यातील शेतकरी पूर्वीपासून निसर्गाशी झगडतो आहे कधी अतिवृष्टी होते तर कधी पाऊस हुलकावणी देतो यामध्ये शेतकऱ्याचे नुकसान मात्र होते ही बाब त्यांनी लक्षात आणून दिली. राज्य शासन आणि केंद्र शासनाने धाराशिव जिल्ह्याचे मॉडेल तयार करून शेतीपूरक व्यवसाय करण्यासाठी शेतकऱ्याला कर्ज विना मोबदला उपलब्ध करून दिले पाहिजे मोठ्या प्रमाणात दूध व्यवसाय करण्यासाठी शेतकऱ्याला पाठबळ केंद्र सरकारच्या विविध योजनांमधून आणि राज्य सरकारच्या प्रयत्नातून झाले पाहिजे अशी भूमिका या पत्रकार परिषदेमध्ये मधुकरराव चव्हाण यांनी मांडली आहे. आर्थिक संकटात सापडलेला शेतकरी बाहेर काढण्यासाठी त्याला शेतीपूरक व्यवसाय आणि दुग्ध व्यवसाय हा खूप चांगला पर्याय आहे याचा सर्व जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी यांनी आराखडा तयार करावा आणि त्याचे सादरीकरण केंद्र सरकारकडे करावे यामध्ये शेतकऱ्याला न्याय मिळण्याची मोठी शक्यता आहे असा मुद्दा देखील त्यांनी उपस्थित केला आहे.
जिल्ह्यामध्ये एकूण पेरणीचे क्षेत्र पाच लाख चार हजार 726 हेक्टर एवढे आहे. यामध्ये 4 लाख 75 हजार हेक्टर सोयाबीन पीक पेरले गेलेले आहे. 32 हजार 627 हेक्टर तूर पेरलेली आहे 26375 हेक्टर उडीद व 5366 हेक्टर मूग यांची पेरणी केली आहे. जून महिन्यापासून सप्टेंबर महिन्यापर्यंत धाराशिव जिल्ह्यामध्ये पर्जन्यमान 603 मिलिमीटर आहे परंतु यावर्षी खरीप हंगामामध्ये केवळ 126 मिलिमीटर पाऊस पडला आहे जून महिन्यामध्ये यापूर्वी 126 मिलिमीटर पाऊस पडला त्याच्या तुलनेमध्ये यावर्षी केवळ 33 मिलिमीटर म्हणजे 26 टक्के पाऊस पडला आहे जुलै महिन्यामध्ये 137 मिलीमीटर पाऊस पडणे अपेक्षित असताना या महिन्यांमध्ये 227 मिलिमीटर पाऊस पडला आहे याची टक्केवारी 166 टक्के आहे.
ऑगस्ट महिन्यामध्ये 135 मिलिमीटर पाऊस पडणे अपेक्षित असताना केवळ 26.9 मिलिमीटर पाऊस झाला आहे म्हणजे 17% पाऊस पडला आहे जिल्ह्याच्या काही भागांमध्ये या काळात 35 दिवसांचा मोठा खंड पावसाने दिला आहे .20 वर्षांमध्ये यापूर्वी कधीही ऑगस्ट महिन्यामध्ये एवढी कमी सरासरी पडलेली नाही असा अहवाल जिल्हा प्रशासनाने राज्य सरकारकडे दिला आहे. पिकाची खूप मोठे नुकसान या काळात झालेले आहे कोणतेही पिक 50 टक्के पेक्षा जास्त उत्पादन झालेले नाही पाणीदार शेतकरी अथवा बागायतदार शेतकरी देखील यावर्षी नफ्यामध्ये राहणार नाहीत त्यांच्या उत्पादनामध्ये देखील 50% पेक्षा जास्त घट झालेली आहे जिल्ह्यातील एकूण महसुली 57 मंडळामध्ये अशाच प्रकारची परिस्थिती असल्याचा अहवाल या निमित्ताने राज्य सरकारकडे दिले गेलेला आहे.
प्रधानमंत्री पीक योजनेमध्ये ज्या मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत मिड सेशन ॲडव्हर्सिटी नुसार जिल्ह्यातील सर्व शेतकरी सदर नुकसान भरपाई मिळण्यासाठी पात्र असल्यामुळे नुकसानीत असलेल्या सर्व शेतकऱ्यांना 25% अग्रीम रक्कम मिळणार अशी अपेक्षा शेतकऱ्याला आहे जिल्ह्यातील जळकोट नळदुर्ग असू जवळा पाचपिंपळा अंतरी पाथरूड माणकेश्वर आष्टा भूम वालवड ईट कळम ईटकुर मोहा गोविंदपूर नारायणवाडी वाशी पारगाव पारा तेरखेडा आधी महसूल क्षेत्र यांचा उल्लेख या अहवालामध्ये करण्यात आलेला आहे राज्याचे कृषी आयुक्त आणि विभागाचे विभागीय आयुक्त यांना जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांनी आपला चार पाणी अहवाल सादर केला आहे यामध्ये सोयाबीन हे खूप मोठ्या प्रमाणावर पिकणारे धाराशिव जिल्ह्यातील पीक असून फुलोरा असताना व शेंग भरण्याची स्थिती असताना पाऊस नसल्यामुळे या भागातील शेतकऱ्यांचे उत्पन्न घटलेले आहे त्याचे प्रमाण 50% पेक्षा जास्त आहे असाच अहवाल दिला गेल्यामुळे या सणासुदीच्या पूर्वी शेतकऱ्याला मदत मिळण्याची अपेक्षा निर्माण झाली आहे.
खरिपाची नुकसान भरपाई साठी धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी पात्र जिल्हा प्रशासनाचा सकारात्मक अहवाल