आरळीच्या सरपंचपदी किरण व्हरकट तर उपसरपंचपदी संजय पाटील यांची निवड अभिनंदनाचा वर्षांव

तुळजापूर दि 10 प्रतिनिधी

तुळजापूर तालुक्यातील आरळी बुद्रुक येथील ग्रामपंचायतच्या नुतन सरपंचपदी किरण व्हरकट तर उपसरपंचपदी संजय पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. राजकीय दृष्ट्या परिपक्व असणाऱ्या तुळजापूर तालुक्यात आरळी बुद्रुक या गावच्या नवीन निवडीनंतर त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.

तत्कालीन सरपंच गोविंद पारवे यांच्या नियोजित कार्यकाळ राजीनामा दिल्यानंतर उपसरपंचपदी असणारे किरण व्हरकट यांची उर्वरित कार्यकाळासाठी सरपंच म्हणून तर रिक्त झालेल्या उपसरपंचपदी संजय पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

निवडीवेळी निरीक्षक म्हणून विस्तार अधिकारी (पंचायत) संजय कळसाईत, तलाठी दयानंद काळे,पोलीस हेड कॉन्स्टेबल लखन गायकवाड, ग्रामसेवक हमीद पठाण यांनी काम पाहिले.यावेळी ग्रामपंचायत सदस्यांची उपस्थिती होती. या निवडीनंतर आरळी बु गावात आजी माजी सरपंच,उपसरपंच यांचे जल्लोषात स्वागत सत्कार करण्यात आला.आरळीकर ग्रामस्थांनी शुभेच्छा देत अभिनंदन केले.

निवडी मागे खास वैशिष्ट्य

30 वर्षांपूर्वी वडिल आता मुलगाही सरपंच

1990 च्या दशकात तत्कालीन सरपंच शामराव व्हरकट यांनी अडीच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करून रंगनाथ पारवे यांच्याकडे उर्वरित काळासाठी सरपंचपद दिले होते,असच काही २०२३ च्या पंचवार्षिक काळात ही घडलं आहे,तत्कालीन सरपंच गोविंद पारवे यांनी नियोजित अडीच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करून उर्वरित काळासाठी सरपंचपदी किरण व्हरकट यांच्याकडे गाव प्रमुखपदाची सूत्र दिली आहेत. योगायोग असा की शामराव व्हरकट आणि रंगनाथ पारवे यांच्या मुलांनी तोच दुर्मिळ योग जुळवुन आणत 30 वर्षानंतर पुन्हा एकदा आरळी बुद्रुक गावात वडिलांच्या नंतर मुलगा सरपंचपदी विराजमान होत सरपंचपद खुर्ची सन्मानपूर्वक देण्याची परंपरा कायम ठेवली आहे 1990 नंतर पुन्हा एकदा 2023 मध्ये ही पुनरावृत्ती झाली आहे.
माजी सरपंच गोविंद पारवे, ग्रा.प.सदस्य सौ.ज्योती राहुल पौळ, मधुमती दादाराव पारवे,मनीषा सिद्राम तानवडे,नशिबा फारूक शेख आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *