“कचरा वापरून भारतात रस्ते निर्मिती” नितीन गडकरी यांची मोठी घोषणा

तुळजापूर दि 16 प्रतिनिधी

केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी एका खाजगी वाहिनीला बोलताना मोठी घोषणा केली आहे अमेरिकन तंत्रज्ञानाचा वापर करून कचऱ्याच्या वापरातून रस्ते निर्मिती करण्याचा प्रकल्प जाहीर करण्यात आला आहे. कचऱ्यापासून रस्ते निर्मिती करण्याच्या या प्रकल्पामुळे देशातील कचऱ्याच्या समस्यांवर मोठा तोडगा निघाल्याचे सिद्ध झाले आहे.

केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी मुलाखतीमध्ये दिलेल्या माहितीनुसार अमेरिकेमध्ये कचऱ्यापासून रस्ते निर्मिती करण्याचे तंत्रज्ञान उपलब्ध आहे मागील काही वर्षांमध्ये भारत सरकारने या तंत्रज्ञानाचा आढावा घेतला आहे त्यानुसार आपल्या देशामध्ये बिहारच्या गाजीपुर येथील कचरा वापरून दिल्लीतील रस्ते निर्मिती करण्यात आली आहे त्याचबरोबर अहमदाबाद लँडफिल या परिसरातील कचऱ्यापासून अहमदाबाद शहरांमध्ये देखील कचऱ्यापासून रस्ते निर्माण करण्यात आले आहेत.

भारतामध्ये मोठ्या शहरापासून लहान शहरापर्यंत कचरा साठवणुकीची खूप मोठी समस्या आहे पर्यावरणाच्या अनुषंगाने देखील अनेक समस्या यामुळे निर्माण झालेले आहेत कचरा पेटल्यानंतर निर्माण होणारी समस्या वेगळी आहे या कचऱ्याच्या समस्येवर मात करणारा हा रस्ते विकासाचा प्रकल्प आहे. शहरापासून ग्रामीण भागात आणि मागास भागांमध्ये देखील कचऱ्यापासून रस्ते निर्माण करण्यासाठी मोठा वाव आहे अशी माहिती या मुलाखतीमध्ये केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे ही भारतासाठी आणि कचरा समस्यांनी ग्रस्त असलेल्या शहरी ग्रामीण भागासाठी खूप मोठी उपलब्दी मानली जात आहे.

याच मुलाखतीमध्ये केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी पेट्रोल आणि डिझेल वापराचे अनुषंगाने महत्त्वाचे विधान केले. इथून ऑल पासून इंधन निर्मिती सुरू झाल्यानंतर डिझेल वापराचे प्रमाण अत्यंत कमी झाले आहे इथेनॉल निर्मिती प्रसंगी हे प्रमाण 48 टक्के होते ते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *