तुळजापूर दि 21 प्रतिनिधी
बोगस दिव्यांग व्यक्तीमुळे पात्र आणि गरजवंत दिव्यांग व्यक्ती सवलती पासून दूर राहतात असे अनेक प्रकार लक्षात आल्यामुळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कडून माजी मंत्री बच्चू कडू यांना बोगस दिव्यांग वितरित करण्यात आलेल्या प्रमाणपत्राची चौकशी करण्याची मागणी युवक नेते शुभम कदम यांनी निवेदनाद्वारे केली आहे. शासनाच्या वेगवेगळ्या योजनांचा चुकीच्या मार्गाने होत असलेले वाटप थांबण्यासाठी माझे प्रयत्न आहेत यासाठी मंत्री महोदयांनी याप्रकरणी चौकशी करणे गरजेचे आहे
तुळजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयामार्फत सन 2018-2019 मध्ये दिव्यांग तपासाणीची मान्यता मिळाल्यानंतर आठवडयाच्या दर गुरूवारी अस्थीरोग, दिव्यांग प्रकाराची तपासणी होत आहे. यापूर्वी उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेले डॉ.विनोद बर्वे यांनी वितरीत केलेल्या प्रत्येक दिवांग प्रमाणपत्राची पुनश्च तपासणी करण्यात यावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे नेते शुभम कदम यांनी दिव्यांग कल्याण समिती अध्यक्ष बच्चु कडु यांना देण्यात आले आहे. दिव्यांग प्रमाणपत्र बोगस दिले गेल्याचे या तक्रारीमुळे उपजिल्हा रुग्णालय आणि संबंधित यंत्रणांचे दणाणले आहे.
माजी मंत्री बच्चू कडू यांना दिलेल्या निवेदनामध्ये तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयाच्या या विषयाच्या अनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील यापूर्वी निवेदन देऊन बोगस दिव्यांगांची चौकशी करण्याची मागणी रिपाईच्या वतीने शुभम कदम यांनी केलेली आहे त्या पाठोपाठ त्यांनी दिव्यांग कल्याण मंडळाचे अध्यक्ष माजी मंत्री बच्चू कडू यांना निवेदन दिल्याने या प्रश्नांमध्ये होणारे गैरप्रकार थांबतील अशी अपेक्षा निर्माण झाली आहे.
जिल्ह्यापेक्षा मोठ्या प्रमाणात तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयाच्या माध्यमातून दिव्यांग प्रमाणपत्र वितरीत करण्यात आल्याची चर्चा असून बोगस दिव्यांग प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले आहे तसेच दिव्यांग प्रमाणपत्राची टक्केवारी वाढविण्यासाठी दिव्यांग बांधवांची मोठया प्रमाणात लुट करण्यात आल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे तुळजापूर रूग्णालयात आजतागायत वितरित करण्यात आलेल्या दिव्यांग प्रमाणपत्राची उच्चस्तरीय समिती नेमुन अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी.
तसेच तुळजापूर उपजिल्हा रूग्णालयातील तत्कालीन कर्मचारी डॉक्टर हे त्यांच्या खाजगी हॉस्पीटल येथे शासकिय प्रोर्टलचा वापर करून स्वताचा आर्थिक फायदा करण्यासाठी खरोखर दिव्यांग अलेल्या दिव्यांग बांधवाची तपासणी करण्याच्या नावाखाली एक्सरे काढण्याचे आणि एक्सरे काढण्यसाठी दिव्यांगाकडुन मोठ्या प्रमाणात फिस आकारून विविध तपासण्या केल्याच्या नंतर कमी टक्केवारी मिळेल असे बोलुन दिव्यांगांची लुट करत होते. उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर व त्यांचा सहकारी यांनी मिळून अनेक बोगस दिव्यांग प्रमाणपत्र वितरीत केले आहेत. याच बोगस प्रमाणपत्राच्या आधारे अनेक बोगस दिव्यांन व्यक्तींनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेवून स्वत:चा आथिक फायदा करून घेतला आहे व शासनाचे आर्थिक नुकसान केले आहे.
कांही लोकांनी महाराष्ट्र राज्य व केंद्र सरकारच्या शासकिय सेवेत बोगस प्रमाणपत्रा आधारे नौकरी मिळविली आहे. यामुळे ख-या दिव्यांग बांधवांना त्यांच्या हक्काच्या असलेल्या सेवा सुविधा आणि योजनांन लाभापासुन वंचित राहवे लागले आहे. कांही महिन्यापुर्वी बीड जिल्हयातील शासकिय सेवेत असलेल्या 78 बोगस दिव्यांग व्यक्तींवर कार्यवाही करण्यात आली होती. याच धरतीवरती तुळजापूर उपजिल्हा रूग्णालयाच्या माध्यमातुन बोगस दिव्यांग प्रमाणपत्र वितरीत केले असल्याचा संशय आहे, त्यामुळे तुळजापूर तालुक्यातील बोगस दिव्यांग शोध मोहिम राबवून बोगस दिव्यांग प्रमाणपत्र वितरीत करणा-या अधिकारी, कर्मचारी यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी.
सदर प्रकरणात वैयक्तीक लक्ष घालुन ख-या पिडित नशिबाने दिव्यांगत्व आलेल्यांवर राजरोसपणे केला जाणारा अन्याय थांबविण्यासाठी चौकशी समिती नेमुन दोषी अधिकारी कर्मचारी यांच्यावर शासनाची फसवणूक केल्याबद्दल तसेच प्राप्त अधिकाराचा गैरवापर केल्याबद्दल गुन्हा दाख
या तक्रारीच्या अनुषंगाने प्रतिक्रिया घेण्यासाठी संपर्क केला असता सदर अधिकारी यांची बदली झाली असून या ठिकाणी नवीन अधिकारी रुजू झालेले आहेत अशी माहिती उपलब्ध झाली आहे.