पुणे दि 21 डाॅ.सतीश महामुनी
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुणे दौऱ्यावर आहेत. गणेशोत्सवानिमित्त त्यांचा हा दौरा असणार असल्याची माहिती आहे. आज (21 सप्टेंबर) ते पुण्यातील विविध गणपती मंडळांना भेट देत दर्शन घेणार आहेत. त्यासोबतच भाजपचे अनेक नेते आणि कार्यकर्त्यांची ते भेट घेणार असल्याचीदेखील माहिती आहे. त्यामुळे फडणवीसांचा आजचा दौरा ‘मंडळ टू मंडळ’ दौरा असल्याचं दिसून येत आहे. त्यांच्यासोबत भाजपचे स्थानिक नेते आणि कार्यकर्तेदेखील मोठ्या संख्येने सहभागी होणार आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्याच्या दौऱ्यावर असल्यामुळे गणेशोत्सव दरम्यान ते विविध गणेश मंडळांना भेट देणार आहेत यादरम्यानचे गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांशी गणेशोत्सव आणि इतर विषयावर चर्चा देखील करतील पुण्याचा गणेशोत्सव जगामध्ये प्रसिद्ध असल्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आवर्जून पुण्याच्या दौऱ्यावर आहेत या दरम्यानचे पुणे भारतीय जनता पार्टीच्या विविध पदाधिकारी आणि घटक पक्षाच्या पदाधिकाऱ्यासोबत बातचीत करतील
सायं. 5.40 वाजता : गणेश दर्शन, कसबा गणपती, कसबापेठ, पुणे
सायं. 6 वाजता : गणेश दर्शन, भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळ, बुधवार पेठ, पुणे
सायं. 6.15 वाजता : गणेश दर्शन, तांबडी जोगेश्वरी गणपती, बुधवार पेठ, पुणे
सायं. 6.35 वाजता : गणेश दर्शन, गुरुजी तालिम मंडळ, लक्ष्मीरोड, पुणे
सायं. 6.55 वाजता : गणेश दर्शन, दगडूशेठ हलवाई गणपती मंडळ, बुधवार पेठ, पुणे
सायं. 7.15 वाजता : गणेश दर्शन, अखिल मंडई गणेशोत्सव मंडळ, महात्मा फुले मंडई, पुणे
सायं. 7.30 वाजता : गणेश दर्शन, तुळशीबाग गणेशोत्सव मंडळ, तुळशीबाग, पुणे
सायं. 7.45 वाजता : गणेश दर्शन, लोकमान्य टिळक गणेशोत्सव मंडळ, केसरीवाडा, नारायण पेठ, पुणे
रात्री 8.30 वाजता : गणेश दर्शन, साने गुरुजी मित्रमंडळ, अंबील ओढा, पुणे
रात्री 9 वाजता : गणेश दर्शन, साई गणेशोत्सव मित्र मंडळ, कोथरुड, पुणे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हा व्यस्त कार्यक्रम असल्यामुळे केवळ गाठीभेटी आणि श्री गणेशाचे दर्शन असे स्वरूप या दौऱ्याचे राहणार आहे