“एक आरती बंधुत्वाची” समर्थ गणेश मंडळ तुळजापूर खुर्द या मंडळाचा स्तुत्य उपक्रम, नगरपरिषद कर्मचारी सुभाष चव्हाण आणि संगणक तज्ञ दिनेश गाटे गणपती आरती सोहळ्याचे यजमान

तुळजापूर दिनांक 22 डॉक्टर सतीश महामुनी

समाजामध्ये सकारात्मक संदेश देण्यासाठी खूप मोठ्या पैशाचा खर्च करून कार्यक्रम करण्याची आवश्यकता नसते गणेशोत्सवासारखा तरुणांना एकत्र करणारा उत्सव हा समाजाच्या सकारात्मक दिशाननिर्देशाचा कार्यक्रम ठरावा आणि त्यामधून चांगली तरुण पिढी पुढे यावी निर्वसणी आणि व्यसनमुक्त समाज निर्माण होण्यासाठी गणेशोत्सवाचा खूप चांगला उपयोग करता येणे शक्य आहे ते अगदी सहजपणे होणारे काम आहे परंतु अशा चांगल्या कामासाठी आज आपण गणेशोत्सव साजरी करणारे लोक कितपत लक्ष देतो हा देखील आजच्या धावपळीच्या आणि स्पर्धेच्या युगात संशोधनाचा विषय झाला आहे अशा धावपळीच्या युगामध्ये तुळजापूर खुर्द या प्रभागातील समर्थ गणेश मंडळ या सार्वजनिक गणेश मंडळांनी एक आरती बंधुत्वाची हा उपक्रम केल्याचे सोशल मीडियावर पाहण्यास मिळाले विशेष म्हणजे या लोकांनी सामान्य माणसांना यजमान करण्याची परंपरा चालू ठेवली आहे त्यांच्या या कृतीमुळे तुळजापूर तालुक्यातील गणेशोत्सवामध्ये समर्थ गणेश मंडळ हा लक्षवेधी आणि प्रेरणादायी गणेशोत्सव ठरणार आहे

या

यजमान श्री सुभाष हरिदास चव्हाण व श्री दिनेश दत्तात्रय गाटे यांच्या हस्ते श्रीची आरती संपन्न झाली आपल्याला माहीतच आहे की, समर्थ गणेश मंडळाने समाजातील व्यक्तींना ( यजमानपद ) महा आरतीस निमंत्रित करण्याची नवीन प्रथा सुरू केली आहे.

आजच्या यजमाना बद्दल सांगायचे म्हणजे सुभाष हे नगरपालिका तुळजापूर मधील बांधकाम विभागात #संगणकचालक म्हणून काम करतात. त्यांनी BSc डिग्री संपादित केली असून मराठी स्टेनो 60 करून ते MPSC स्पर्धापरीक्षेची तयारी करत आहेत. आम्ही श्री गणरायाला प्रार्थना करतोत की श्री सुभाष यांना स्पर्धा परीक्षेत #यश मिळो आणि त्यांच्या हातून आपल्या गावाची व देशाची सेवा करण्याची संधी मिळो हिच प्रार्थना.अश्या व्यक्तींचा #सन्मान करून आमच्या मंडळाने त्यांच्या कार्याची माहीती समाजापुढे मांडण्याचा प्रयत्न केला, गणेशोत्सव साजरा करताना मोठ्या रकमेच्या वर्गणी मागणी मोठ्या मिरवणुका काढून शक्ती प्रदर्शन करणे त्याचबरोबर डॉल्बी सारख्या करणे वाद्याचा वापर करून लोकांना त्रास होईल अशा प्रकारच्या कृती करणे या सर्व प्रकारांना गणेशोत्सव काळात मोठ्या प्रतिष्ठान पाहिले जाते परंतु समर्थ गणेश मंडळ समर्थ नगर तुळजापूर खुर्द या छोट्या मंडळांनी अत्यंत चांगला संदेश देणारा उपक्रम राबविल्यामुळे या मंडळाच्या या एक आरती बंधुत्वाची या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे या मंडळाने आवाहन केल्याप्रमाणे सर्वच गणेश भक्त मंडळांनी सामान्य माणसाला केंद्रबिंदू समजून आपल्या मंडळाचे कार्य पुढे नेले पाहिजे या छोट्या छोट्या मुलांनी घालून दिलेला आदर्श आपण सर्वांनी स्वीकारला पाहिजे यामधून बंधुत्वाची ही साखळी मोठी होण्यास मदत होणार आहे एकमेका साह्य करून अवघे धरू सुपंथ या उक्तीप्रमाणे सर्वांनीच गणेशोत्सव हा विचाराचा उत्सव आणि गणेशोत्सव हा लोकमान्य टिळकांच्या घालून दिलेल्या परंपरेचा पाईक होण्याचा कार्यक्रम अशा पद्धतीने स्वीकार केल्यास निश्चितच चांगली पिढी निर्माण होण्यासाठी गणेशोत्सव हा अत्यंत चांगला मार्ग ठरणार आहे न्यूज मराठवाड्याच्या वतीने एक आरती वंदुत्वाची या उपक्रमाचे जोरदार स्वागत करण्यात येत असून या मंडळाच्या सर्व सदस्यांना हार्दिक धन्यवाद दिले जात आहे. यजमान दिनेश घाटे हे देखील अत्यंत गुणी आणि कौशल्य तज्ञ असणारे यजमान आहेत त्यांनी देखील संगणकीय क्षेत्रात खूप चांगले काम केले आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक संस्था तुळजापूर येथे कार्यरत आहेत या दोघा यजमानांना देखील या निमित्ताने न्यूज मराठवाड्याच्या हार्दिक शुभकामना आहेत

आपल्याला ही तो आवडला असेलच. तर मग आपण ही या ” एक आरती बंधुत्वाची” या संकल्पनेची सुरुवात करावी हीच आमच्या मंडळाकडून विनंती आहे असे आवाहन या निमित्ताने समर्थ गणेश मंडळ, समर्थ नगर, तुळजापूर खुर्द रोड, तुळजापूर , जिल्हा – धाराशिव 9822080409 यांनी केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *