तुळजापुर दिं
महाराष्ट्र वीरशैव सभेच्या जिल्हाध्यक्षपदी प्रफुल्लकुमार शेटे, महिला जिल्हाध्यक्ष माजी नगरसेविका दीपाबाई मस्के यांची निवड
तुळजापूर दिनांक 2 प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्यांमध्ये वीरशैव लिंगायत समाजाची प्रतिष्ठेची मानली जाणारी महाराष्ट्र वीरशैव सभा पुणे यांच्या धाराशिव जिल्हा अध्यक्षपदी तुळजापूर येथील प्रफुल्ल कुमार शेटे आणि महिला जिल्हाध्यक्ष म्हणून माजी नगरसेविका दीपाबाई मस्के यांची निवड करण्यात आली आहे निवडीनंतर प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर होनराव यांनी त्यांचा प्रदेशाच्या वतीने सत्कार केला. दिवसभर चाललेल्या या बैठकीमध्ये प्रदेश उपाध्यक्ष एस.एस.मलंग यांनी वीर शिव लिंगायत सभा पुणे ही प्रदेश पातळीवर राबवीत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली तसेच धाराशिव जिल्ह्यामध्ये काम करण्यासाठी लिंगायत समाजाच्या कार्यकर्त्यांनी अधिक संघटित होणे गरजेचे आहे असे प्रतिपादन केले. सदर बैठकीसाठी प्रदेशाध्यक्ष रमेश आवटे सुनील गालाडे जी आर पर शेट्टी बसवराज पाटील जगदीश घोडके बाबुराव हंद्राळे गणेश हिंगमिरे प्राध्यापक विवेक कोरे सिद्राम सलगरे यांच्यासह इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तुळजापूर येथील त्रिमूर्ती मंगल कार्यालय येथे एक ऑक्टोबर रोजी दिवसभर एक दिवशीय प्रदेश बैठक संपन्न झाली यामध्ये महाराष्ट्र वीर सभेचे प्रदेश उपाध्यक्ष मलंग हे अध्यक्षस्थानी होते प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर होनराव आणि इतर मान्यवर यांनी या बैठकीला मार्गदर्शन केले सदर बैठकीमध्ये धाराशिव जिल्ह्याची कार्यकारणी घोषित करण्यात आली यामध्ये जिल्हाध्यक्ष म्हणून प्रफुल्ल कुमार शेटे कार्याध्यक्ष म्हणून शिवशंकर माळगे, महिला जिल्हाध्यक्ष म्हणून दीपाबाई मस्के, सहसचिव विधीज्ञ प्रदीप पणुरे, कोषाध्यक्ष सिद्राम देशमुख प्रांत सदस्य म्हणून प्रकाश वाकळे व सचिन वाले, जिल्हा कार्यकारणी सदस्य पदी सिद्रामाप्पा खराडे, दिगंबर माळगे, सुधीर येणेगुरे, चंद्रशेखर कदेरे यांची निवड करण्यात आली. विकासात्मक प्रश्न संदर्भात आणि संस्थात्मक प्रश्न संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली अनेक पदाधिकाऱ्यांनी प्रश्न विचारले त्याला प्रदेश उपाध्यक्ष मलंग व सरचिटणीस होनराव यांनी समाधानकारक उत्तरे दिली आगामी काळात तुळजापूर तीर्थक्षेत्रामध्ये समाजाचे प्रदेश पातळीवरील उपक्रम राबविले जातील असे जाहीर करण्यात आले.
या बैठकीमध्ये प्रदेश उपाध्यक्ष एस एस मलंग व प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर होनराव यांनी महाराष्ट्र राज्यभर महाराष्ट्र वीर सेवा कोणकोणते उपक्रम राबवते आणि लिंगायत समाजाचे शिखर संस्था म्हणून कसे काम करते याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले आगामी काळात धाराशिव जिल्ह्यामध्ये लिंगायत समाजाच्या विविध प्रश्नाच्या अनुषंगाने ही सभा काम करणार आहे असे या निमित्ताने उपाध्यक्ष एस एस मलंगे यांनी सांगितले. प्रदेश कार्यकारिणीच्या मार्गदर्शनाखाली धाराशिव जिल्ह्यामध्ये आम्ही लिंगायत समाजाच्या वेगवेगळ्या प्रश्नावर काम करू तसेच प्रत्येक तालुक्यामध्ये समाजासाठी काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना संघटित करू असे या निमित्ताने नवनिर्वाचित अध्यक्ष प्रफुल्ल कुमार शेटे यांनी सांगितले. महिला आघाडीच्या वतीने देखील संघटनेच्या सर्व कार्यक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदविला जाईल अशी ग्वाही या निमित्ताने नवनिर्वाचित महिला जिल्हाध्यक्ष मस्के यांनी दिली. या सभेचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्राध्यापक विवेक कोरे यांनी केले.