ग्रामीण भागातील कॅन्सर, हृदयरोग व किडनी आजार अशा दुर्धर आजार असलेल्या 69 रुग्णांना आर्थिक मदत – मुख्यकार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता

धाराशिव,दि.09 प्रतिनिधी

ग्रामीण भागातील कॅन्सर, हदयरोग व किडनीचे आजार अशा दुर्धर आजार असलेल्या रुग्णांना रु. 15,000/-( पंधरा हजार रुपये ) आर्थिक मदत फक्त एक वेळेस देण्यात येते. तरी जिल्हयातील ग्रामीण भागातील गरजु रुग्णांनी याचा लाभ घ्यावा. असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता, यांनी केले आहे.


जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागात अर्ज स्विकारल्या जात आहेत .या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित रुग्ण हा धाराशिव जिल्हयातील रहिवाशी असणे गरजेचे आहे. रुग्णालयाचे निदान प्रमाणपत्र, आधार कार्ड, राष्ट्रियकृत बॅकेचे पासबुक झेरॉक्स, यापुर्वी लाभ न घेतल्याचे स्वयंघोषणा पत्र ई. कागदपत्रासह अर्ज करावा. सदर योजनेची माहिती गामीण भागातील सर्व नागरीकांपर्यंत पोहचणेसाठी संरपंच, ग्रामसेवक, अंगणवाडी कार्यकर्ती, आशा कार्यकर्ती सामाजिक संस्था ई. यांनी प्रसिध्दी करुन जास्तीत जास्त रुग्णांना लाभ घ्यावा.


पीडीत रुग्णांना आर्थिक लाभ देण्यासाठी विषेश प्रयत्न करून एकुण यावर्षी आतापर्यंतचे ६९ लाभार्थींना लाभ देण्यात आल्याचे माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतिश हरिदास यांनी दिली. तसेच ग्रामीण भागातील कॅन्सर, हृदयरोग व किडनीचे आजार अश्या दुर्धर आजार असलेल्या रुग्णांना आर्थिक मदत मिळावी यासाठी जास्तीत जास्त रुग्णांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहनही मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता, यांनी केले आहे. .


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *