आज तुळजापूर बंद, दर्शन मंडपाच्या योग्य जागेच्या मागणीसाठी शहरवासीयांचा पुन्हा संघर्ष…..

तुळजापूर दि 11डॉ. सतिश महामुनी

तुळजापुरात दर्शन मंडपाच्या योग्य जागेच्या मागणीसाठी तुळजापुरातील सर्व पुजारी वर्ग आणि राजकीय पदाधिकारी यांनी एकत्रित तुळजापूर बंदची हाक दिली आहे. जिल्हा प्रशासनाकडून नव्याने होणाऱ्या विकास आराखड्याच्या अनुषंगाने नवीन होणारा दर्शन मंडप घाटशील रोड पार्किंग या जागेत नियोजित केल्याचे समजते, स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी या विकास आराखड्याच्या अनुषंगाने जे पावर पॉइंट प्रेझेंटेशन यापूर्वी केलेले आहे.

त्यामध्ये दर्शन मंडपाची जागा निश्चिती केलेली नव्हती परिणामी हाच धागा पकडून तुळजापूरकरांनी महाद्वारासमोरील तुळजाभवानी मंदिर संस्थांची प्रशासकीय इमारत त्याला लगत असणारी विजय वाचनालय इमारत आणि नगर परिषदेचे शॉपिंग सेंटर याशिवाय उंबरझरा परिसर या विस्तीर्ण जागेमध्ये नवीन दर्शन मंडपाची सहजपणे उभारणी होऊ शकते अशी तुळजापूर बंद ची हाक देणाऱ्या नागरिकांची मागणी आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर तुळजापूर आणि पंढरपूर या दोन तीर्थक्षेत्रांचा विकास करण्याच्या अनुषंगाने तातडीने प्रस्ताव मागवले होते, मुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर केवळ चौदाव्या दिवशी मुख्यमंत्री महोदयांनी प्रशासनाला प्रस्ताव दाखल करण्याचे आदेश दिलेले होते. राज्यभरातील तीर्थक्षेत्रांना विकसित करण्यासाठी सर्वच तीर्थक्षेत्रामध्ये राज्य सरकारकडून विकासाच्या घोषणा केल्या जात आहेत.

तुळजाभवानी मंदिर संस्थान अध्यक्षपदावर पदसिद्ध अध्यक्ष म्हणून जिल्हाधिकारी असल्यामुळे आणि इतर तीन शासकीय अधिकारी ज्याच्यामध्ये उपजिल्हाधिकारी तहसीलदार यांचा समावेश आहे तर स्थानिक आमदार आणि स्थानिक नगराध्यक्ष हे पदाधिकारी आहेत. नगरपरिषदेवर प्रशासक असल्यामुळे नगराध्यक्ष पद विद्यमान कार्यकाळात अस्तित्वात नाही. तालुक्याचे आमदार राणा जगजीत सिंह पाटील यांनी राज्यामध्ये आणि देशांमध्ये आणि तालुक्यांमध्ये एकाच विचाराचे सरकार असल्यामुळे या विकास आराखड्यासाठी आपल्या परीने काम सुरू केले आहे. त्यांनी या कामाचे पावर पॉइंट प्रेझेंटेशन देखील केले आहे. वास्तु विशारद असणाऱ्या एजन्सीने देखील या संदर्भात स्थानिक लोकांना निमंत्रित करून बैठका घेऊन कोणत्या स्वरूपाचा विकास होणार आहे याविषयी स्थानिक लोकांची मते जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यानंतर त्यानंतर पुरातत्व विभाग आणि जिल्हाधिकारी कार्यालय यांच्यामार्फत हा प्रस्ताव राज्य शासनाच्या नगर विकास मंत्रालयाकडे अंतिम मंजुरी साठी जाणार आहे.

सत्ताधारी मंडळी या विकासाला आ रा खड्याच्या अनुषंगाने बोलताना स्थानिक नागरिक नाराज होणार नाहीत याची खबरदारी घेत आहेत कोणालाही विस्थापित न करता विकास केला जाईल असे देखील सांगितले गेले आहे. आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी या विकास आराखड्याच्या अनुषंगाने लोकांच्या सूचना देखील मागणी केलेले आहेत तरीही आजपर्यंत हा विकास आराखडा अंतिम झालेला नाही.

विकास आराखडा अंतिम झालेला नाही परंतु पुजारी व्यवसायाच्या अनुषंगाने अत्यंत कळीचा मुद्दा म्हणून समोर आलेला दर्शन मंडप प्रकल्प विजय वाचनालय , मंदिर प्रशासकीय इमारत आणि उंबर झरा परिसर या भागात करण्यासाठी सर्वांची सर्वानुमते अनुमती आह. विकास आराखडाच्या अनुषंगाने जास्त सूचना लोकांनी दिलेले आहेत त्यामध्ये देखील या परिसरामध्ये दर्शन मंडप हवा असे लोकांनी लिखित स्वरूपात दिलेली आहे तरीही या जागेवरील दर्शन मंडप अंतिम झालेला नसल्यामुळे जिल्हा प्रशासन व राज्य सरकारचे दर्शन मंडप प्रकल्पाकडे लक्ष वेधण्याच्या अनुषंगाने शांततेच्या मार्गाने तुळजापूर बंद करण्याचा निर्णय सर्वपक्षीय राजकीय पदाधिकारी आणि पुजारी बांधव यांनी घेतलेला आहे याचे निवेदन तुळजापूर तहसीलदार यांना दिलेल्या असून ते जिल्हाधिकारी आणि मुख्यमंत्री महोदय यांना देखील पाठवलेले आहेत.

जिल्हा प्रशासनाने आणि संबंधित लोकप्रतिनिधी यांनी यामध्ये नागरिकांच्या सूचना गांभीर्याने घेणे गरजेचे आहे परंपरागत पद्धतीने पुजारी व्यवसाय करणारे पुजारी बांधव यांनी तुळजाभवानी देवीचे महात्म्य वर्षानुवर्ष जतन केले आहे तुळजाभवानी मंदिर संस्थान कडून मंदिराचे संचालन होत असले तरी खऱ्या अर्थाने भाविकांना दर्शन घालण्याचे काम तसेच त्यांना घरी उतरवून त्यांची व्यवस्था आणि धार्मिक विधी पार पाडण्याचे काम पुजारी वर्ग करीत आला आहे मंदिर प्रशासन केवळ प्रशासन चालवते याशिवाय मंदिर प्रशासन कोणताही धार्मिक विधी चालवत नाही ही बाब देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार जिल्हाधिकारी डॉक्टर डॉक्टर सचिन ओंबासे आमदार राणा जगजितसिंह पाटील या वरिष्ठ मंडळींनी लक्षात घेतली पाहिजे आपण मंदिर संस्थान कडे केवळ आर्थिक मिळगतीची बाब म्हणून पाहू नका या मंदिराचे महात्म्य वर्षानुवर्ष अनधिक आल्यापासून ज्या लोकांची जतन केलेले आहे त्यांच्या सूचना देखील तेवढ्याच मौल्यवान आणि महत्त्वाचे आहेत तेच या मंदिराच्या धार्मिक विधीला पुढे वर्षानुवर्षे चालवणार आहेत

.

तुळजाभवानीचया या तीर्थक्षेत्र शी कर्नाटक आंध्र प्रदेश तेलंगणा महाराष्ट्र मध्य प्रदेश येथील ग्रामीण आणि शहरी लोकांच्या भावना जोडलेले आहेत येथे येणारा भाविक भक्त केवळ तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी आणि वंशपरंपरागत कुलधर्म कुलाचार करण्यासाठी येतो त्याला कोणतेही फाइव स्टार अथवा व्हीआयपी सेवा नको असते सुलभ पद्धतीने सोप्या पद्धतीने दर्शन देवीचे व्हावे आणि पुजारी वर्गांच्या मार्फत आपला कुलधर्म कुलाचार व्यवस्थित पार पडावा अशी त्यांची भावना असते परंतु अलीकडच्या काळात गोरगरीब यात्रे करून चा विचार न करता केवळ व्हीआयपी यात्रे करून चा विचार करून मंदिर संस्थांकडून अनेक निर्णय बदलण्यात आले आहेत. कधीतरी मंदिर संस्थान आणि अधिकाऱ्यांनी गोरगरीब भावी भक्तांचा विचार करावा जे भावी फक्त पायी चालत येतात जे भाविक भक्त साध्या बस ने प्रवास करून देवीच्या दर्शनाला आलेले असतात, त्या भावी भक्तांची कोणती सोय मंदिर संस्थान किंवा राज्य सरकार करते या सर्व भाविक भक्तांची सोय स्थानिक लोक करतात स्थानिक पुजारी बांधव करतात तरीही प्रशासनाकडून काही मुद्द्यावर या सर्व मंडळींची कोंडी करण्याचा प्रयत्न गेल्या काही वर्षापासून चालू आहे. यानंतर देखील येथील विविध पुजारी मंडळ अथवा वेगवेगळ्या संस्था यांनी मंदिर संस्थांची मिळते जुळते घेऊन आपला कार्यभार चालू ठेवलेला आहे. सर्वच लोक आमदार आणि जिल्हाधिकारी यांच्याशी बोलू शकत नाहीत याचा देखील विचार झाला पाहिजे जर लोक विजय वाचनालय प्रशासकीय इमारत आणि उंबरजरा या परिसरात दर्शन मंडप मागत असतील तर तो त्या जागेत का देऊ नये प्रशासनाने याचा देखील गांभीर्याने विचार करावा लोकांची मागणी ही लोकभावना समजून ती मुख्यमंत्री महोदयापर्यंत व्यवस्थित पोहोचवावी आणि याच जागेमध्ये दर्शन मंडपाची उभारणी करावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *