पालकमंत्री प्रा.डॉ. तानाजीराव सावंत 16 ऑक्टोबर रोजी जिल्ह्यात
धाराशिव दि.15 प्रतिनिधी
सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रा.डॉ. तानाजीराव सावंत हे 16 ऑक्टोबर रोजी सोमवारी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे.सकाळी 7 वाजता कात्रज,पुणे येथून मोटारीने धाराशिवकडे प्रयाण.सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव येथे आगमन व जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीस दुपारी 12:30 पर्यंत उपस्थिती.दुपारी 12:30 ते दुपारी 1 वाजतापर्यंत पालकमंत्री कार्यालय,धाराशिव येथे अभ्यंगताच्या भेटीसाठी राखीव असा त्यांचा शासकीय कार्यक्रम जाहीर झाला आहे. राज्याच्या आरोग्य मंत्री तानाजी सावंत हे धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री असल्यामुळे यावर्षी होणाऱ्या तुळजापूर येथील शारदीय नवरात्र महोत्सवांमध्ये आरोग्य व्यवस्था अत्यंत सुसज्ज बनविण्यात आली आहे अगदी आयसीओ बेड असणारी आपला दवाखाना यात्रेकरूंच्या सोयीसाठी तैनात करण्यात आलेले आहेत.
दुपारी 1 वाजता धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालय येथून मोटारीने तुळजापूरकडे प्रयाण.दुपारी 1:30 ते दुपारी 2 वाजतापर्यंत तुळजापूर येथे आगमन,शारदीय नवरात्र महोत्सव 2023 व नियोजित महाआरोग्य शिबिराच्या अनुषंगाने स्थळ पाहणी करतील.दुपारी 2 ते दुपारी 2:45 वाजेपर्यंत तुळजापूर येथे होणाऱ्या शारदीय नवरात्र महोत्सव 2023 व नियोजित महाआरोग्य शिबिराच्या अनुषंगाने सुरक्षा व उपाययोजनेच्या अनुषंगाने महसूल,पोलीस,आरोग्य विभाग तसेच इतर सर्व संबंधित प्रशासकीय विभागाचे अधिकारी यांची आढावा बैठक घेतील.
दुपारी 2:45 ते दुपारी 3 वाजेपर्यंत तुळजाभवानी मंदिर तुळजापूर येथे दर्शन.दुपारी 3 वाजता तुळजापूर येथून तेरणा साखर कारखाना ढोकीकडे प्रयाण करतील. दुपारी 4 वाजता ते दुपारी 4:30 वाजतापर्यंत तेरणा साखर कारखाना ढोकी येथे आगमन व राखीव.दुपारी 4:30 वाजता तेरणा साखर कारखाना ढोकी येथून बार्शीमार्गे कात्रज,पुणेकडे शासकीय वाहनाने प्रयाण करतील.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचा महत्त्वकांक्षी प्रकल्प असणारा आपला दवाखाना तुळजाभवानी देवीच्या नवरात्र महोत्सवांमध्ये देखील दाखल झाला आहे शहराच्या प्रत्येक मार्गावर आपला दवाखाना ही आरोग्यवस्था भाविक भक्तांच्या अडचणीच्या काळात उपयोगी पडावी म्हणून तयार केलेली आहे याचा लाभ भाविकांना मिळतो आहे या आपला दवाखाना उपक्रमाचे या दौऱ्यामध्ये पालकमंत्री तानाजी सावंत आढावा घेणार आहेत.