“प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र” सुरु- कौशल्य विकास प्रशिक्षण घेऊ इच्छिणारे उमेदवारांनी अर्ज करावेत

धाराशिव.दि.17,(जिमाका):-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतुन देशात कौशल्यावर आधारित शिक्षण आणि त्यांच्यासाठी उदयोग सुरू करण्यास प्राधान्य देण्यात आले आहे. भारतातील तरुण वयोगटातील उमेदवारांना अर्थव्यवस्थेच्या विविध क्षेत्रांमध्ये बदलत्या आधुनिक तंत्रज्ञानानुरुप कौशल्याधारित प्रशिक्षणाद्वारे उत्पादन क्षम बनविण्याच्या दृष्टीने “कौशल्य विकास” या कार्यक्रमास राष्ट्रीय प्राधान्यमध्ये राष्ट्रीय कौशल्य विकास कार्यक्रम सुरु करण्यात आला आहे.
महाराष्ट्र राज्यचे वित्त मंत्री तथा उपमुख्यमंत्री यांनी सन 2023-24 चा अर्थसंकल्प सादर करताना ग्रामीण भागाकडून शहराकडे होणारे स्थलांतराचे प्रमाण कमी व्हावे, यासाठी स्थानिक पातळीवरील रोजगार व स्वयंरोजगाराकरिता राज्यातील ५०० ग्रामपंचायतीमध्ये प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र स्थापन करण्याची घोषणा केली आहे.
धाराशिव जिल्हयात एकूण 12 “प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र” स्थापित करण्यास करण्यास मान्यता दिली आहे. यामध्ये बेंबळी ,ढोकी , तेर (धाराशिव), शिराढोण, येरमाळा (कळंब), तेरखेडा (वाशी),ईट (भुम), आसू (परंडा), माकणी (लोहारा), अणदूर, जळकोट (तुळजापूर), गुंजोटी (उमरगा) या ग्रामपंचायतीचा समावेश करण्यात आला आहे.
ग्रामीण भागातील युवकांसाठी ग्रामपंचायत स्तरावर “प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र” ही राज्य शासनाची महत्वकांक्षी योजना आहे. या केंद्राचे उदघाटनाचे आयोजन 19 ऑक्टोंबर 2023 रोजी सायंकाळी 4-00 वा. ऑनलाईन पध्दतीने.पंतप्रधान मोदी यांच्या शुभहस्ते व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या मान्यवरांच्या उपस्थितीत त्या त्या गावात नियोजित ठिकाणी संपन्न होणार आहे.यामध्ये पंतप्रधान हे संबोधित करून संवाद साधणार आहेत.
धाराशिव जिल्हयातील नागरिकांनी, महाविदयालयामधून शिक्षण घेणारे विदयार्थी-विदयार्थींनी, कौशल्य विकास प्रशिक्षण घेऊ इच्छिणारे उमेदवार, त्यांचे पालक यांनी जास्तीत जास्त संख्येने नियोजित वेळेवर त्या त्या ठिकाणी उपस्थित राहण्याबाबत प्रशासनाच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे. आपल्या गावातील आणि आजूबाजूच्या गाव परिसरातील गरजू विदयार्थी / व्यक्तीपर्यंत या प्रशिक्षण केंद्रामार्फत लाभ मिळणे शक्य होईल. तरी या ऑनलाईन उद्घाटन कार्यक्रमाचे प्रसंगी जिल्हयातील जास्तीत जास्त नागरिकांनी संबंधित
गावातील कार्यक्रमाच्या ठिकाणी सहभाग नोंदवावा. असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *