लोकसभेच्या निवडणुकीतून आमदार राणा जगजितसिंह पाटील यांची प्रतिष्ठा पणाला, जनमानसात ओमराजे आघाडीवर परंतु मोदी फॅक्टर मुळे अर्चनाताई शक्तिमान

मोदी यांना प्रधानमंत्री करण्यासाठी लोकांची पुन्हा एकदा पसंती, धाराशिव मतदार संघात अत्यंत काट्याची टक्कर , सुनील चव्हाण यांनी दिला भाजपच्या हातात हात

धाराशिव दिनांक २ जिल्हा प्रतिनिधी

धाराशिव लोकसभा अत्यंत चुरशीची आणि प्रतिष्ठेची तेवढीच काट्याची टक्कर देणारी निवडणूक महायुतीच्या सौ अर्चनाताई पाटील आणि महाविकास आघाडीचे ओमराजे निंबाळकर यांच्या दरम्यान होत आहे. भाऊसाहेब आंधळकर या निवडणुकीमध्ये किती मतदान घेतात याकडे देखील सर्वांचे लक्ष लागले आहे. जेव्हा उमेदवार महायुतीने जाहीर केला नव्हता तेव्हा जी ओमराजे यांची हवा होती ती हवा नरेंद्र मोदी यांच्या सभेनंतर बदलण्याचे चित्र आहे. तिसऱ्यांदा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना करण्यासाठी त्यांना मानणारा खूप मोठा वर्ग धाराशिव जिल्हा मतदार संघ मध्ये मतदान करण्याच्या प्रतीक्षेत आहे.

लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने देशाच्या वेगवेगळ्या प्रश्नांची चर्चा लोकांमध्ये आहे. मागील दहा वर्षांमध्ये ज्यांनी नरेंद्र मोदी यांच्या कामाची स्तुती केली आहे इतिहासातील इतर प्रधानमंत्री आणि नरेंद्र मोदी यांच्या कामाची तुलना या काळात खूप मोठ्या संख्येने सुरू आहे. मोदींना विरोध करणारा घटक देखील तेवढ्याच ताकदीचा आहे जेवढा नरेंद्र मोदी यांच्यावर प्रेम करणारे आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यपद्धतीवर विश्वास असणारे मतदार खूप मोठ्या संख्येने या मतदारसंघांमध्ये आहेत. खूप मोठी चुरस आणि कडवी झुंज अर्चना च्या आई पाटील यांचे व नावाची घोषणा झाल्यानंतर निर्माण झाली आहे तत्पूर्वी या मतदारसंघांमध्ये मागील पाच वर्षे खासदार म्हणून राहिलेले ओमराजे निंबाळकर यांचा बोलबाला दिसून आला तो बोलबाला आजही कायम आहे पूर्वी अर्चनाताई पाटील यांचे नाव घोषित नसल्यामुळे विरोधी उमेदवारी कोणाला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते आणि महायुतीच्या गटामध्ये काळजीच वातावरण होते. परिणामी ओमराजे निंबाळकर यांनी प्रचारामध्ये आघाडी घेतली माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तुळजापूर येथे सभा घेऊन निंबाळकर यांच्या प्रचारामध्ये असणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना शिवसैनिकांना बळ देण्याचे काम या सभेच्या माध्यमातून शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी करून दाखवले त्या पाठोपाठ राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने पक्षाचे प्रमुख शरदचंद्र पवार यांनी सहभाग घेतली. ओम राजे यांच्या भाषणातून डॉक्टर पद्मश्री पाटील आणि राणा जगजीत सिंह पाटील यांच्या कारभाराची माहिती घेतली, शरद पवार यांना डॉक्टर पद्मसिंह पाटील नवीन आहेत परंतु राजकीय अर्थाने शरद पवार यांनी मी जे ऐकले ते धक्कादायक आहे अशा शब्दात आपली बोलकी प्रतिक्रिया सभेत दिली.

बार्शी येथे देवेंद्र फडणवीस यांनी उमेदवार अर्चनाताई पाटील यांच्या प्रचारार्थ घेतलेल्या औसा उमरगा धाराशिव तुळजापूर बार्शी भूम परंडा वाशी अशा वेगवेगळ्या तालुक्यातील महायुतीच्या कार्यकर्त्यांना पाठबळ देण्याचे काम केले या सभेमध्ये उमेदवार असणाऱ्या अर्चनाताई पाटील यांनी अत्यंत प्रभावी भाषण केले आणि आपली भूमिका स्पष्ट केली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री करण्यासाठी घड्याळ या चिन्हावर बटन दाबून आपणास विजयी करावे असे आवाहन त्यांनी यावेळी मतदारांना केले. महायुतीच्या उमेदवार अर्चनाताई पाटील यांच्या अर्ज भरण्याच्या दिवशी खूप मोठ्या संख्येने शक्ती प्रदर्शन करून आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी आपली संघटनात्मक ताकद दाखवून दिली. त्यांचे चिरंजीव मल्हार पाटील हे देखील आक्रमकपणे ओमराजे निंबाळकर यांच्यावर टीका करीत आहेत. आजपर्यंत ओमराजे निंबाळकर आक्रमकपणे राणा पाटील यांच्यावर टीका करीत होते परंतु राणा पाटील मात्र त्यांच्या शांत संयमी स्वभावानेच उत्तर देत होते या उलट मल्हार पाटील मात्र प्रचंड आक्रमकपणे लोकसभा निवडणुकीत प्रचाराला लागले आहेत त्यांचे परंडा येथील भाषण खूप गाजले. पाटोदा येथे त्यांनी केलेले भाषण देखील ग्रामीण भागातील मतदारांना प्रभावित करणारे ठरले आहे.

तुळजापूर विधानसभा मतदारसंघांमध्ये अनेक वर्ष सत्तेमध्ये असणारे मधुकरराव चव्हाण यांचे चिरंजीव तुळजाभवानी शेतकरी साखर कारखान्याचे चेअरमन सुनील चव्हाण यांनी भारतीय जनता पार्टी प्रवेश केला असल्यामुळे अर्चनाताई पाटील यांचे बळ धाराशिव लोकसभा मतदारसंघात वाढली आहे यापूर्वी बसवराज पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे त्यांची मोठी मदत या मतदारसंघात होणार आहे.

धाराशिव लोकसभा मतदारसंघाची उमेदवारीची घोषणा राज्य पातळीवरील वेगवेगळ्या जिल्ह्यातील उमेदवारी घोषित झाल्यानंतर अखेरच्या टप्प्यात ठरली आव्हानात्मक जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी अजित पवार यांची राष्ट्रवादी व एकनाथ शिंदे यांची शिवसेना याशिवाय रामदास आठवले यांची रिपाई इतर पक्ष यांच्या बोलणीमध्ये तडजड करताना धाराशिव जिल्ह्याला कमळ मिळाले नाही त्याऐवजी अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि घड्याळ चिन्ह मिळाले परंतु सुरेश बिराजदार यांची चांगली मागणी असताना येथे भारतीय जनता पार्टी मधून सौ अर्चना पाटील यांना आयात करून घड्याळ या राष्ट्रवादीच्या चिन्हावर उमेदवारी दिलेली आहे. त्यापूर्वी पालकमंत्री तानाजी सावंत आणि जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांच्या नावाची जोरदार चर्चा या मतदार संघात होती आर्थिक दृष्ट्या प्रबळ असणारे हे दोन उमेदवार या मतदारसंघांमध्ये आपला प्रभाव टाकू शकतात असा राजकीय कार्यकर्त्यांचा काय होता परंतु जिल्ह्याचे एकूण राजकीय परिस्थिती लक्षात घेता ओमराजे निंबाळकर यांचा प्रभाव आणि शेतमालाला भाव नसल्यामुळे असणारी शेतकरी वर्गाची नाराजी महागाई ने त्रस्त झालेला सामान्य माणूस बेरोजगारी ने त्रस्त झालेला सुशिक्षित बेरोजगार या भीषण समस्या असताना याला तोंड देणारा प्रभावी उमेदवार असला पाहिजे व तो सर्वमान्य देखील ठरला पाहिजे त्यामुळे धनंजय सावंत यांची उमेदवारी मागे पडली सुरेश बिराजदार यांचा विचार झाला नाही आणि ओमराजे निंबाळकर यांच्या वर्चस्वाला धक्का देण्याची राजकीय शक्ती केवळ राणा जगजीत सिंह पाटील यांच्यामध्ये आहे हे सर्व पक्षांनी मान्य करून त्यांच्या पत्नी संव अर्चनाताई पाटील यांना राष्ट्रवादीच्या घड्याळाचे नाव उभे करण्यासाठी सर्वांचे एकमत झाले आहे. राजकीय निवडणुका लढण्यासाठी मोठी आर्थिक तरतूद देखील लागते आणि या लढाईमध्ये यापूर्वी दोन वेळा राणा जगदीश सिंह पाटील यांनी स्वतः व त्यांचे वडील डॉक्टर पद्मसिंह पाटील यांनी प्रयत्न केलेला होता. सर्व राजकीय गणिते आणि अर्थकारण लक्षात घेऊन सौ अर्चनाताई पाटील यांना उमेदवारी दिली गेली उशिरा उमेदवारी दिली गेले असल्यामुळे प्रचारामध्ये देखील आघाडी घेताना महायुतीची दमचाक होते आहे.

अडीच वर्षांपूर्वी 2019 मध्ये उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पार्टी सोडून शरद पवार आणि काँग्रेस यांच्यासोबत महाविकास आघाडी स्थापन केले आणि मुख्यमंत्रीपद स्वीकारले आपल्या मुलाला देखील मंत्रिमंडळात स्थान दिले तेव्हापासून या जिल्ह्याचे तत्कालीन खासदार ओमराजे निंबाळकर हे आगामी काळात कमळ चिन्ह नरेंद्र मोदी यांचा करिष्मा आणि महायुती चे सहकारी आपल्या सोबत 2024 लोकसभा निवडणुकीमध्ये असणार नाहीत याची त्यांना खात्री होती आणि भविष्यामध्ये राजकीय आव्हान खूप मोठ्या प्रमाणात उभे असणार आहे त्याला तोंड देण्यासाठी आपली पूर्वतयारी असली पाहिजे पूर्वतयारी असल्याशिवाय निवडणुका जिंकता येत नाहीत हे खून गाठ मनामध्ये ठेवून ओमराजे निंबाळकर यांनी मागील अडीच वर्षांमध्ये कोणाचीही वाट न पाहता स्वतःच्या बळावर प्रत्यक्ष प्रत्येक तालुक्यात आणि प्रत्येक तालुक्यातील मोठ्या गावात आपल्या कार्यकर्त्याला बळ देण्याचे काम केले आपला विकास निधी देखील सर्व मतदार संघात वितरित करण्यात यश मिळवले या सर्व घडामोडी करीत असताना तरुण मतदाराला आणि शिवसेनेच्या सर्व स्तरातील कार्यकर्त्याला त्यांनी बळ देण्याचे काम केले त्यामुळे आपोआप संघटनात्मक ताकदीच्या बळावर तसेच जनसंपर्क कायम ठेवल्यामुळे या मतदारसंघांमध्ये ओमराजे नावाची लहर करण्यात त्यांना यश मिळाले. गावोगाव गरीब माणूस सामान्य माणूस सामान्य तरुण सामान्य विद्यार्थी सामान्य शेतकरी यांनी काही झाले तरी ओमराजे यांना मतदान करायचे असाच निर्णय बांधून ठेवला आहे. शेतमालाला भाव नाहीं म्हणून नाराज असणारी मंडळी राजकीय हवा दिल्यामुळे या निवडणुकीत खूप मोठ्या संख्येने हवा निर्माण करीत आहेत ही हवा किती आहे आणि राजकीय शेवटच्या चार-पाच दिवसांमध्ये केले जाणारे राजकारण झाल्यानंतर हीच हवा कायम राहणार की अर्चनाताई आगे पडणार याकडे राजकीय जाणकारांची लक्ष लागले आहे.

पुन्हा एकदा उद्धव ठाकरे धाराशिव येथे ओमराजे यांच्या प्रचारासाठी सभा घेत आहेत कारण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची धाराशिव येथे खूप मोठी सभा झाल्यामुळे अर्चनाताई पाटील यांच्या बाजूने चांगले वातावरण निर्माण झाले आहे याशिवाय राहणार दादा यांचा प्रचाराचा पॅटर्न देखील या आठवड्यात काम करू लागला आहे एकापाठोपाठ एक कार्यकर्त्यांची फळी राणा दादा यांनी संपूर्ण मतदारसंघात उभी केली आहे तीन पदरी असणारी ही यंत्रणा यापूर्वीच्या निवडणुकीमध्ये देखील उपयोगात आणलेली होती. याशिवाय या मतदारसंघांमध्ये भाऊसाहेब आंधळकर हे बहुजन वंचित आघाडीच्या वतीने निवडणूक लढवीत आहेत ते किती मतदान घेणार कोणत्या तालुक्यामध्ये किती मतदान मिळवणार यावर ओमराजे आणि अर्चनाताई पाटील यांच्या मताधिक्याचे आकडे नक्की होणार आहेत. निवडणूक अत्यंत चुरशीची आहे कितीही सोपी म्हटली तरी निश्चित ही निवडणूक अवघड झालेली आहे. नरेंद्र मोदी यांचा करिष्मा दोन हजार चोवीस मध्ये उमेदवाराला अगदी सहजपणे निवडून आलेले असे राजकीय जाणकारांना वाटत होते परंतु ती स्थिती आज नक्की नाही. बोल मला ओमराजे चा आहे आणि खूप मोठी राजकीय ताकद सहा आमदार नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत संघटनात्मक पक्षाची अशी खूप मोठी फळी अर्चनाताई पाटील यांच्या पाठीशी आहे. लोकसभा निवडणुकीच्या होणाऱ्या मतदानामधून या निवडणुकीत जनता कोणाला कौल देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तुळजापूर शहरामध्ये भाजपचे नेते विनोद गंगणे यांनी आपले सर्व नगरसेवक नगरसेविका पक्षाचे सर्व आघाड्या अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना या सर्वांना सोबत घेऊन काढलेल्या रॅलीचा खूप प्रभाव शहराच्या राजकारणावर आहे यापूर्वी देखील अशा प्रकारच्या रॅली काढून विनोद गंगणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी राजकीय मिळवले आहे. महिलांची खूप मोठी संख्या या रॅलीमध्ये होती आजूबाजूच्या 20 गावांमध्ये या रॅलीचा परिणाम दिसून आला आहे.

धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री तानाजी सावंत आणि ओमराजे निंबाळकर यांच्यामध्ये झालेले कडवे वक्तव्य या निवडणुकीमध्ये खूप महत्त्वाची भूमिका बजावणार आहे एकमेकाचा सूड उगवणारी विधाने या दोघांनी केली आहे. पालकमंत्री तानाजी सावंत, आमदार ज्ञानराज चौगुले, माजी मंत्री बसवराज पाटील, नव्याने प्रवेश केलेले सुनील मधुकरराव चव्हाण, आमदार राणा जगजितसह पाटील, युवक नेते मल्हार पाटील, आमदार अभिमन्यू पवार आमदार राजाभाऊ राऊत, आमदार सतीश चव्हाण ,आमदार विक्रम काळे, भाजपचे नेते विनोद गंगणे, तुळजापूर बाजार समितीचे सभापती सचिन पाटील, माजी सभापती विजय गांगणे, माजी नगराध्यक्ष सचिन रोचकरी, तुळजापूरची नगरसेवकांची टीम नगरसेवक अशीच फळी सर्व तालुक्यात अर्चनाताई पाटील यांच्या प्रचारासाठी झपाटून कामाला लागले असल्याचे चित्र आहे. ही सर्व स्वतः स्थाने आणि प्रभावी व्यक्तिमत्त्वाच्या जोरावर अर्चनाताई पाटील या मागे पडणार नाहीत असा राजकीय काय आहे. आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्यासाठी ही निवडणूक आजपर्यंत झालेल्या सर्व निवडणुकीत अत्यंत महत्त्वाचे आणि प्रतिष्ठेची निवडणूक झालेली आहे पत्नीचे उमेदवार असल्यामुळे त्यांनी सर्व निवडणूक आपल्या शिरावर घेऊन रात्रदिवस प्रचाराला अत्यंत गती दिली गेली आहे. पूर्वीच प्रचारात आघाडी घेतलेले ओमराजे निंबाळकर व आता प्रचारात आघाडी घेत असलेले आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचा हा चाललेला प्रचाराचा कलगीतुरा किती उंच जाणार आणि मतदार या दोघांमध्ये कोणाला यश देणार याची खात्री मतपेटीचा निकाल जाहीर झाल्यानंतरच होणार आहे. लोकांच्या मनामध्ये आजही ओमराजे हेच पुन्हा निवडून येतील असे रोजच्या चर्चेमध्ये आहे परंतु शेवटी निवडणुकी बोला बोलीवर न होता त्यासाठी निवडणुकीची सर्व आयुधे आणून पार पडते त्यामुळे मतदान होईपर्यंत दोन्ही बाजूने प्रयत्नांची पराकाष्टा होणार आहे बहुजन वंचित आघाडीचे उमेदवार आणि त्यांची पडलेली मते हा देखील यामागे कळीचा मुद्दा राहणार आहे. ओमराजे निंबाळकर यांच्या पेक्षा ही निवडणूक राणा जगजितसिंह पाटील यांना ही निवडणूक महत्त्वाची झालेली आहे त्यांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये हा खूप मोठा महिलाचा दगड ही निवडणूक ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *