सावरकरांचे हिंदुत्व व्यापक व सर्वसमावेशक – बाळासाहेब शामराज

तुळजापूर दि 28 प्रतिनिधि

भारताच्या एकात्मतेसाठी व प्रगतीसाठी हिंदुत्व मोलाचे आहे, हिंदुत्व म्हणजे केवळ हिंदु नसून सर्व भारतीय स्वातंत्रवीर सावरकरांना अभिप्रेत आहे असे उदगार तुळजापूर येथील सावरकर विचार मंच अध्यक्ष बाळासाहेब शामराज यांनी काढले.

तुळजापुर येथील सावरकर विचार मंच च्या वतीने सावरकर जयंती निमित्ताने आयोजीत कार्यक्रमात प्रारंभी संस्कार भारती देवगिरी प्रांताचे लोककलाप्रमूख डॉ.सतीश महामुनी यांच्या हस्ते स्वातंत्रवीर सावरकर यांचे प्रतिमापूजन करण्यात आले. या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब शामराज, महेश कुलकर्णी, उमेश गवते, महेश आप्पा गरड, शिवाजीराव डावकरे, डॉ .सतीश महामुनी, गणेशराव जळके, पद्माकर मोकशे,शिवाजी बोधले, प्रफुल्लकुमार शेटे, विजयकुमार वाघमारे, सचिन अमृतराव, दयानंद शिंदे, अमित कदम, प्रसाद पानपुडे , शहाजी पलंगे, शहाजी जगदाळे, डोंगरे अंबादास पोफळे, रमेश बिरंगे, श्रीराम अपसिंकर, दीपक त्रिकोणे, प्रभाताई मार्डीकर, अपर्णाताई शेटे, जगदीश पलंगे, प्रशांत शेटे, गिरीश लोहारेकर , दयानंद शिंदे , संतोष पाठक, सोनू शहापुरे, राम चोपदार उपस्थित होते. यानिमित्ताने उपस्थितांनी प्रतिमा पूजन करून आदरांजली वाहिली. त्यावेळी संस्कार भारती देवगिरी प्रांत लोककला प्रमूख डॉ. सतिश महामुनी यांनी मनोगत व्यक्त केले.

या वेळी बोलतांना अध्यक्ष बालासाहेब शामराज यांनी सावरकर यांचे विचार आज खुप गरजेचे आहेत, जातीच्या भिंती दुर करुन धर्मासाठी सर्वांनी एकत्र यावे असे आवाहन केले. शिवाजी डावखरे यांनी सूत्रसंचलन व महेश गरड यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *