अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्याला दिलासा नाही, मधुकरराव चव्हाण मोर्चा काढणार

अवकाळी पावसाने धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नुकसानीचे अध्याप पंचनामे नसल्यामुळे शेतकरी मदतीपासून वंचित

नुकसानीचे प्रश्नावर मधुकरराव चव्हाण यांची पत्रकार परिषद

तुळजापूर दिनांक 28 पुढारी वृत्तसेवा

धाराशिव जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्याचे आणि ग्रामीण भागातील लोकांची नुकसान झाले आहे या नुकसानीचे एक दिवसात तात्काळ पंचनामे करून मदत दिली पाहिजे अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी पत्रकार परिषदेतून दिला.

वादळी वाऱ्यामुळे आणि अवकाळी पावसामुळे या वर्षातील ही दुसरी नुकसान भरपाई देण्याची वेळ प्रशासनावर आली आहे परंतु प्रशासनाचे कामकाज लक्षात घेता शेतकऱ्याला मदत मिळेल की नाही याबद्दल शंका आहे कारण यापूर्वीची पिक विम्याची रक्कम अद्याप शेतकऱ्याला मिळालेली नाही केवळ अग्रीम दिली आहे मात्र उर्वरित 75 टक्के रक्कम आज पर्यंत शेतकऱ्याला का दिली नाही असा सवाल माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी पत्रकार परिषदेतून सरकारला विचारला आहे. गाव पातळीवर पंचनामे करण्याचे काम 24 तासात पूर्ण झाले पाहिजे आणि पुढच्या 24 तासांमध्ये शेतकऱ्याला मदत मिळाली पाहिजे अन्यथा आपण शेतकऱ्यांचा मोर्चा काढू असा गंभीर इशारा या निमित्ताने त्यांनी दिला आहे.

वादळी वाऱ्यामुळे आणि पावसामुळे ग्रामीण पत्र्याची घरे व शेतकऱ्याचे गोठे पूर्णपणे उध्वस्त झाले आहेत शेकडो शेतकऱ्याचे झालेले नुकसान पंचनामे करण्यासाठी अद्याप महसुली यंत्रणा पोहोचलेली नाही ही बाब अत्यंत गंभीर आहे. तुळजापूर तालुक्यात द्राक्ष केळी आंबा या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे सिंदफळ येथील शेतकरी रवी कापसे यांचे दीड एकर केळीच्या पिकाचे सरासरी सहा लाख रुपये नुकसान झाले आहे. पिंपळा येथील शेतकरी दत्तात्रय डांगे यांचा तीन एकर चुका भाजीचे नुकसान झालेले आहे.
आंबा लागवड करून चार-पाच वर्षे जोपासल्या नंतर आलेले फळ या अवकाळी मध्ये वाया गेले असून आंबा लागवड करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना मदत दिली गेली पाहिजे. याप्रमाणे द्राक्ष व केळी पिकवणारे शेतकऱ्याचे झालेले नुकसान देखील पंचनामा करून मदत दिली पाहिजे अशी भूमिका माजी मंत्री चव्हाण यांनी मांडली.

शहरामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये वीजपुरवठा खंडित झाला आहे शेकडो पोल कोसळले आहेत, ग्रामीण भागातील वीजपुरवठा अद्याप सुरू झालेला नाही त्यामुळे वीज वितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून ग्रामीण भागातील वीजपुरवठा सुरळीत केला पाहिजे यासाठी जिल्हा प्रशासनाने योग्य निर्देश दिले पाहिजेत. ग्रामीण भागातील शेतामध्ये राहणारे पत्र्याचे शेड आणि जनावराची गोठे यांचे पंचनामे करून या सर्वांना तात्काळ मदत द्या अन्यथा आपण नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचा मोर्चा काढून शासनावर दबाव आणू अशी असा इशारा माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी यानिमित्ताने पत्रकार परिषदेमध्ये दिला याप्रसंगी अमर मगर, रणजीत इंगळे, सुनील रोचकरी, आनंद जगताप, बबनराव जाधव यांची उपस्थिती होती.

जिल्ह्यामध्ये नुकसान भरपाई झाल्याच्या बातम्या वर्तमानपत्र आणि प्रसारमाध्यमांमध्ये मागील चार दिवसापासून ठळकपणे प्रसिद्ध झाले आहेत याची जिल्हा प्रशासनाने योग्य दखल घेतली पाहिजे कारण हा विषय अत्यंत संवेदनशील आहे गोरगरीब लोकांचे व शेतकरी वर्गाचे हे झालेले नुकसान प्रसार माध्यमांच्या प्रसारणानंतर दखल घेऊन तात्काळ पंचनामे व मदत दिली पाहिजे असा मुद्दा आपल्या पत्रकार परिषदेमध्ये मांडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *