तुळजापूर दिनांक 7 प्रतिनिधी डॉ. सतीश महामुनी
लोकसभा निवडणूक मध्ये संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीची पीछेहाट झाली आहे, सव्वातीन लाख मतांनी ओमराजे निंबाळकर निवडून आले हा सर्वसामान्य माणसाचा नरेंद्र मोदी आणि त्यांच्या केंद्र सरकार वरील नाराजीचे परिणाम आहेत. राज्यामध्ये पक्ष फोडण्याचे काम केल्यामुळे त्याची किंमत भाजपाला मोजावी लागली आहे त्यामुळे महायुती राज्यांमध्ये पिछाडीवर आली अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धीरज पाटील यांनी पाटील यांच्या कार्यालयात दिली.
याप्रसंगी शिवसेना शहर प्रमुख सुधीर परमेश्वर, काँग्रेसचे युवक नेते अमोल कुतवळ, शिवसेना युवक नेते अमोल जाधव, याशिवाय इतर काँग्रेस व शिवसेना पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. धाराशिव जिल्हा लोकसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीचा विजय झाल्याबद्दल काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धीरज पाटील यांना प्रतिक्रिया विचारले असता त्यांनी सांगितले की हा सर्वसामान्य माणसांनी ठरवलेला विजय आहे. मागील पाच वर्षांमध्ये सामान्य माणसाला शेतकऱ्याला तरुण वर्गाला मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागले त्यांचे अडचणी सोडवण्यासाठी नरेंद्र मोदी सरकारने कोणतीह पावले उचलली नाही. मतदारांनी आपली भूमिका मतदानामधून दाखवून दिली आहे. शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव मिळाला नाही त्यामुळे सोयाबीन आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांच मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सर्व महाराष्ट्रभर कांदा आणि सोयाबीन पिकाच्या नुकसानीने शेतकरी हैराण झाला होता मात्र सरकारने सोयाबीन आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष दिले नाही परिणामी शेतकऱ्याचा असंतोष वाढत गेला आणि त्याची किंमत या निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्रातील भारतीय जनता पार्टीला मोजावी लागली आहे असे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धीरज पाटील यांनी याप्रसंगी सांगितले. धाराशिव जिल्ह्यामध्ये ओमराजे निंबाळकर यांचा जनसंपर्क आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर जनतेने भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचा पराभव केला आहे असेही जिल्हाध्यक्ष पाटील म्हणाले.
या निमित्ताने तुळजापूरचे आमदार राणा जगजीत सिंह पाटील यांनी तुळजापूर शहराच्या विकासासाठी अनेक घोषणा केल्या आहेत परंतु या घोषणा केवळ आज पर्यंत घोषणा राहिले आहेत प्रत्यक्षात अंमलबजावणी झालेली नाही याच्यावर बोट ठेवून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सौ अर्चनाताई पाटील यांच्या पराभवाच्या पाठीमागे तुळजापूर शहरातून या कारणांनी विरोध झाला असा मुद्दा या ठिकाणी उपस्थित केला. या अनुषंगाने काँग्रेसचे युवक नेते अमोल कुतवळ यांनी केवळ घोषणाबाजी झाली त्यामुळे जनतेची दिशाभूल झालेली आहे सत्ताधारी लोकांवर स्थानिक जनता नाराज आहे हेच या मतदानामधून दिसून आले आहे अशी प्रतिक्रिया दिली आहे.
काँग्रेसचे युवक नेते ऋषिकेश मगर यांनी शेतकरी खूप मोठ्या अडचणीत असताना राज्य सरकारने निर्यात बंदीच्या अनुषंगाने मदत केली नाही उलट ऐनवेळी निर्णय बंदी घातली गेल्यामुळे सोयाबीन व कांदा पिकाचे खूप मोठे नुकसान झाले याचा फटका शेतकऱ्याला बसला . महायुतीला अमर्याद सत्ता जनतेने हातामध्ये देऊन देखील जनतेला नाराज करण्याचे काम मागील पाच वर्षांमध्ये भाजपा आणि त्याच्या मित्र पक्षांनी केले आहे.
धाराशिव जिल्ह्यामध्ये याचा अनुभव अधिक तीव्रतेने जाणवतो आहे लोक उघडपणे विरोध करीत आहेत तरीही महायुतीच्या नेत्यांनी शेतकऱ्याला मदत केली नाही परिणामी जिल्ह्यामध्ये संवाद तीन लाखांनी महाविकास आघाडीचा विजय झाला हा सर्वसामान्य माणसाच्या जनतेचा असंतोष आहे असे सांगितले. तरुण लोकांना आज रोजगार उपलब्ध नाही 34 लाख नोकऱ्या उपलब्ध असताना केंद्र सरकारने जागा भरल्या नाही त्यामुळे तरुण वर्ग देखील नरेंद्र मोदी सरकारवर नाराज आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा सोडविण्यामध्ये सरकारला अपयश आले त्याचा देखील फटका भाजपला सहन करावा लागला आहे अशा वेगवेगळ्या कारणांनी सरकार घेरले गेले परिणामी अर्चनाताई पाटील यांना पराभूत व्हावे लागले अशी प्रतिक्रिया काँग्रेसची युवक नेते ऋषिकेश मगर यांनी मांडली.
शिवसेना तालुकाप्रमुख जगन्नाथ गवळी महिला आघाडी जिल्हाप्रमुख शामलताई पवार, माजी जिल्हा सहप्रमुख श्याम पवार, प्रतीक रोचकरी ,अमोल जाधव, सुधीर परमेश्वर अशा शिवसेना नेत्यांनी या निमित्ताने नवनिर्वाचित उमेदवार ओमराजे निंबाळकर यांचे अभिनंदन केले.