तुळजापूर दिनांक १७ प्रतिनिधी
तुळजापूर विधानसभा मतदारसंघ यावेळी अत्यंत रंजक आणि चुरशीचा होणार हे आता निश्चित झाले आहे कारण या निवडणुकीपूर्वी लोकसभा निवडणुका संपन्न झाल्या आणि या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीला ओमराजे निंबाळकर यांचा विजय असे घवघवीत यश प्राप्त झाले. या यशामुळे मोठ्या संख्येने उमेदवारांची संख्या वाढली आहे. ओमराजे निंबाळकर यांचा विजय झाल्यामुळे महाविकास आघाडीचे धाराशिव जिल्ह्यातील पाठबळ अनेक पटींनी वाढलेले आहे.
लोकसभा निवडणुकीमध्ये खासदार ओमराजे निंबाळकर पुन्हा दुसऱ्यांदा विजयी झाले महाविकास आघाडी विजयी झाली त्यामुळे महाविकास आघाडी मधून उमेदवारी मागणाऱ्यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणावर वाढली आहे माजी मंत्री मधुकरराव चव्हाण ,काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धीरज पाटील, युवक नेते ऋषिकेश मगर, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट पक्षाकडून तालुकाध्यक्ष धैर्यशील पाटील, महिला प्रदेश राष्ट्रवादी अध्यक्ष सक्षणा सलगर, प्रदेश कार्यकारणी सदस्य अशोक जगदाळे, भाजपकडून स्वतः आमदार राणा जगजितसिंह पाटील, युवक नेते विनोद गंगणे, लोकमंगल समूहाचे नेते रोहन देशमुख, रूपामाता उद्योग समूहाचे नेते व्यंकट गुंड, आणि देवराज मित्र मंडळाचे नेते देवानंद रोचकरी, याशिवाय या तालुक्यामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे, शिवसेना ठाकरे गटाकडून शामल वडणे पवार, तुळजाभवानी साखर कारखान्याचे चेअरमन सुनील मधुकरराव चव्हाण, अभिजीत बाबुराव चव्हाण, शिवसेना शिंदे गटाकडून अमरराजे कदम, धाराशिव चे माजी नगराध्यक्ष नंदूराजे निंबाळकर, धाराशिवचे आमदार कैलास पाटील, भाजपाचे नेते सुधीर पाटील, असे वेगवेगळे पक्षातील पदाधिकारी आणि राजकीय नेते आगामी विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असल्याची चर्चा आहे.
खूप मोठ्या प्रमाणावर उमेदवार इच्छुक होण्याचे कारण म्हणजे ओमराजे निंबाळकर यांनी ज्या मताधिक्याने विजय प्राप्त केला आहे. त्यामुळे वेगवेगळ्या पक्षातील निष्ठावंत आणि महाविकास आघाडीतील नेत्यांना आपण उमेदवारी का मागू नये ? असे वाटू लागले आहे त्यामुळे ही संख्या वाढली आहे. पक्ष विभागणी झाल्यानंतर प्रमुख पक्षाची संख्या वाढली आहे हे देखील उमेदवारांची संख्या वाढण्याचे कारण आहे.
ओमराजे निंबाळकर ज्या बाजूने उभे राहतील त्या उमेदवाराची पार्टी विधानसभा निवडणुकीमध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये राजकीय दृष्टीने मातब्बर राहणार आहे. असा देखील काय अस राजकीय जाणकारांनी ठेवलेला आहे. तुळजापूर विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला आहे या तालुक्यावर कायम काँग्रेस पक्षाची सत्ता राहिलेली आहे. या तालुक्यावर माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी चार वेळा विजय प्राप्त केला असून मराठवाडा वैज्ञानिक विकास महामंडळ त्यांनी अत्यंत प्रभावी आणि दमदारपणे सांभाळलेले कायम दुष्काळी आणि दगडा धोंड्याच्या तुळजापूर तालुक्यामध्ये 77 साठवण तलाव बांधून राज्य सरकारच्या वेगवेगळ्या योजना राबवून तुळजापूर तालुक्याची सिंचन क्षमता मधुकरराव चव्हाण यांच्या कार्यकाळात मोठ्या प्रमाणात वाढली करण्यामध्ये मधुकरराव चव्हाण यांची आमदारकी कामी आलेले उजनीचे 21 टीएमसी पाणी मंजूर करण्यासाठी मधुकरराव चव्हाण यांनी केलेला संघर्ष आणि विधानसभेमध्ये केलेली भाषणे आजही त्यांच्या पाणीदार आमदार म्हणून ओळखीसाठी पुरेसे दमदार आमदार अशी त्यांची कायम प्रतिमा राहिलेली आहे राज्य मंत्रिमंडळात संधी मिळाल्यानंतर मंत्रीपदाचा फारसा लाभ त्यांना घेता आला नाही कारण कार्यकाळ अत्यंत कमी होता. वाढते वयोमान लक्षात घेता त्यांना निवडणुकीची धावपळ आणि पुढील कामकाज आरोग्यासाठी कसे असेल अशी काळजी प्रदेश कडून केली जाते तशीच काळजी चव्हाण कुटुंबीयांकडून देखील व्यक्त केली जाते परंतु दमदारपणे मधुकरराव चव्हाण या काळात ग्रामीण भागामध्ये संपर्कात असून आपण निवडणुकीसाठी उभे राहणार असल्याचे त्यांच्या कामावरून सांगून जातात. काँग्रेसमध्ये त्यांच्यानंतर अनेक वर्ष जिल्हाध्यक्ष व धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून कामकाज केलेले धीरज पाटील हे उमेदवारी घेण्यासाठी आग्रही आहेत .त्यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसकडे पत्रकार परिषद घेऊन उमेदवारीची मागणी केलेली आहे. प्रदीर्घकाळ काँग्रेस पक्षाची सेवा आपण आणि आपल्या वडील व आजोबांनी केली आहे त्यामुळे निष्ठेचे फळ म्हणून आपणास या विधानसभेसाठी प्रदेश काँग्रेसने उमेदवारी द्यावी महाविकास आघाडी चा धर्म म्हणून काँग्रेस येथे निश्चित विजय प्राप्त करेल असा विश्वास जिल्हाध्यक्ष पाटील यांनी व्यक्त केलेला आहे.
तुळजापूर तालुक्याचे राजकारणामध्ये मधुकरराव चव्हाण यांचा विधानसभा निवडणुकीत झालेला पराभव आणि त्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यां मध्ये काँग्रेस पक्ष बळकट झाला पाहिजे अशी भावना व्यक्त करणारे पदाधिकारी यांच्याकडून मधुकरराव चव्हाण आजारी असल्यामुळे जलसंपर्क करू शकत इतर कोणतेही नेते पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या संपर्कात नव्हते तेव्हा अशा पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या माध्यमातून युवक नेते ऋषिकेश मगर यांनी सत्ताधारी आमदार पाटील यांना विरोध करणारी भिंत उभी केली व काँग्रेस पॅनल मधून चांगले पदाधिकारी उभे करून चांगली लढत दिली. त्यामुळे पक्षांमध्ये ऋषिकेश मगर यांचे स्थान वाढले आणि आमदार पाटील यांना विरोध करण्याचे धाडस दाखवल्यामुळे त्यांच्या प्रतिक कार्यकर्त्यांचा विश्वास देखील वाढला. काँग्रेस नेते ऋषिकेश मगर यांनी देखील कार्यकर्त्यांच्या जोरावर पक्षाने उमेदवारी दिली तर नाकारणार नाही, परंतु पक्षातील नेते माजी मंत्री मधुकरराव चव्हाण आणि इतर नेत्यांना या संदर्भात सर्व अधिकार आहेत आपण पक्षाचा लढवय्या कार्यकर्ता आहोत, पक्ष वाढला पाहिजे, संघटना मोठी झाली पाहिजे अशी आपली भूमिका आहे . आपणाला विधानसभा लढवण्यामध्येच स्वारस्य नाही परंतु कार्यकर्त्याकडून तशा प्रकारची इच्छा होत असल्यामुळे पक्षाने जर संधी दिली तर आपण लढण्यासाठी सज्ज आहोत असा खुलासा केला आहे.
भारतीय जनता पार्टीचे नेते विनोद पिंटू गंगणे हे देखील पक्षाने संधी दिली तर विधानसभा निवडणूक लढवू शकतात. आमदार पाटील हे विद्यमान आमदार असल्यामुळे विरोध पिंट गंगणे यांनी जाहीरपणे उमेदवारीची मागणी केलेली नाही परंतु 2014 पासून विधानसभा निवडणूक लढवण्याच्या मनस्थितीमध्ये ते आहेत. तुळजापूर शहरावर मागील पंधरा वर्षापासून त्यांची सत्ता आहे. राजकारणामध्ये निवडणुका जिंकण्याचे तंत्र आणि कार्यकर्त्यांचे मोठे जाळे त्यांच्या भोवती आहे. महायुतीच्या इच्छुक उमेदवारांमध्ये विनोद गंगणे हे देखील प्रभावी उमेदवार ठरू शकतात असे वातावरण तालुक्यात आहे. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश कार्यकारणी सदस्य उद्योजक मागील विधानसभा निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडी कडून निवडणूक लढवलेले अशोक जगदाळे हे खूप मोठ्या ताकतीने उमेदवारी मिळवण्यासाठी महाविकास आघाडीमध्ये सक्रिय आहेत. राज्यस्तरावर त्यांनी यासंदर्भात चांगली मोर्चे बांधणी केली आहे. नळदुर्ग नगरपरिषद आणि त्या परिसरात त्यांचे वर्चस्व आहे, लक्ष्मीदर्शन आणि कार्यकर्त्यांना सांभाळण्याच्या अनुषंगाने अशोक जगदाळे हे प्रभावी भूमिका बजावतात त्यामुळे त्यांची उमेदवारी महाविकास आघाडी कडून प्रभावी ठरू शकते आणि ते आमदार पाटील यांना कडवा विरोध करू शकतात अशी परिस्थिती आहे. संपूर्ण मतदारसंघांमध्ये त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांची पेरणी केली आहे आणि आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याचा मनोदय व्यक्त केलेला आहे लोकसभा निवडणूक प्रचाराच्या दरम्यान उद्धव ठाकरे यांच्या तुळजापूर येथील जाहीर सभेमध्ये प्रास्ताविक भाषण करताना अशोक जगदाळे यांनी उद्धव ठाकरे यांच्या समोरच महाविकास आघाडी कडून आपण लढण्यासाठी इच्छुक असल्याचा खुलासा केलेला आहे.
माजी मंत्री मधुकरराव चव्हाण हे महाविकास आघाडीतील सर्वात ज्येष्ठ आणि मोठी नेते आहेत. त्यांचे चिरंजीव सुनील चव्हाण हे भाजपमध्ये गेले आहेत परंतु आपण महाविकास आघाडीमध्ये पूर्वीप्रमाणे ताकतीने कामात आहोत मतदारसंघांमध्ये आपला संपर्क कायम आहे अशी भूमिका मधुकरराव चव्हाण यांनी जाहीर केलेली आहे . काँग्रेसचे प्रदेश युवक सरचिटणीस अभिजीत बाबुराव चव्हाण हे लोकसभा निवडणुकीमध्ये सक्रिय ओमराजे निंबाळकर यांचा प्रचार करीत होते. जाहीर सभा मधून त्यांनी ओमराजे निंबाळकर यांचा प्रचार केलेला आहे .त्यामुळे महाविकास आघाडी कडून आपली उमेदवारी राहणार आहे अशी भूमिका मधुकरराव चव्हाण यांनी घेतलेले आहे. मतदारांमध्ये देखील महाविकास आघाडी कडून मधुकरराव चव्हाण यांनी निवडणूक लढवावी असा मनोदय व्यक्त होतो आहे. मतदारसंघांमध्ये सर्वदूर संपर्क आणि सामान्य माणसाच्या कामाला पडणारा नेता म्हणून मधुकराव चव्हाण यांची ओळख आहे. त्यांच्यासोबत काम करणारे अनेक नेते आमदार पाटील व भाजपमध्ये गेलेले असले तरी मधुकरराव चव्हाण यांना मारणारा खूप मोठा मतदार या मतदारसंघांमध्ये आहे. महाविकास आघाडी कडून ते लढले तर ते विजयापर्यंत पोहोचू शकतात किंवा विजय प्राप्त करू शकतात अशी स्थिती आहे. काँग्रेस पक्षामधून मधुकरराव चव्हाण आणि धीरज पाटील यांची मागणी प्रदेशसाठी चॅलेंजिंग आहेत. प्रदेश आणि महाविकास आघाडी कडून ज्याला उमेदवारी मिळेल त्या उमेदवाराच्या अनुषंगाने मतदारसंघांमध्ये सकारात्मक वातावरण राहणार आहे.
एका बाजूला ओमराजे निंबाळकर यांची सहानुभूतीची लाट आहे. त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या मतदारांची संख्या मोठी आहे. त्यामुळे ओमराजे यांचा हात महाविकास आघाडीच्या कोणत्या उमेदवाराच्या बाजूने उभा राहतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महायुती म्हणजे भारतीय जनता पार्टी चे उमेदवार स्वतः आमदार राणा जगजीतसिंह पाटील हेच असणार आहेत. आमदार पाटील यांनी वेगवेगळ्या घोषणा केल्या परंतु ते प्रकल्प उभे राहिले नाहीत ही त्यांच्यावर खूप मोठी टीका या मतदारसंघांमध्ये आहे. गावपातळीपर्यंत त्यांचा थेट संपर्क नसल्याची देखील तक्रार आहे. उलट विकासाची दृष्टी असणारा नेता आणि शांत संयमी अभ्यासू व्यक्तिमत्व उच्च विद्या विभूषित नेता अशी राणा जगजीतसिंह पाटील यांची ओळख आहे. आमदार पाटील यांनी आपल्या पत्नी सौ अर्चनाताई पाटील यांना अजित पवार राष्ट्रवादी पक्षाकडून उमेदवारी देण्यासाठी विरोध करणे गरजेचे होते त्यांनी उमेदवारी घ्यायला नाही पाहिजे होती अशी लोक भावना आहे. प्रत्यक्षात अर्चनाताई पाटील यांच्या उमेदवारी घोषणेनंतर लोकसभा मतदारसंघाच्या प्रत्येक गावापर्यंत आणि मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी अर्चनाताई पाटील यांना वेळ अपुरा पडला. याचा खूप मोठा फायदा ओमराजे निंबाळकर यांना झाला आहे. ओमराजे निंबाळकर यांनी अर्चनाताई पाटील यांची उमेदवारी निश्चित होण्यापूर्वी दोन राऊंड संपूर्ण मतदारसंघांमध्ये आपला प्रचार केलेला होता. शिवाय राज्याच्या राजकारणामध्ये ज्यावेळेस शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी विभक्त झाले व उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री पदावरून पायउतार झाले तेव्हापासून ओमराजे निंबाळकर यांनी पायाला भिंगरी बांधली आणि गावोगाव आपला संपर्क वाढवला त्यांना माहीत होते लोकसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये नरेंद्र मोदी यांचा करिष्मा आपल्या सोबत नाही .आपल्या सोबत भाजप आणि त्यांची यंत्रणा राहणार नाही. आपली शिवसेना आणि आपले शिवसैनिक हेच आपणाला विजयी करणार आहेत . त्यामुळे निवडणुकीच्या काळात विजयी होण्यासाठी शिवसेनेचे कट्टर कार्यकर्ते आणि सामान्य मतदार हेच आपणास विजयी करणार आहेत. हे ओमराजे निंबाळकर यांनी अडीच तीन वर्षांपूर्वी ओळखले होते.
राजकीय दृष्ट्या चानाक्ष आणि धूर्तपणे ओमराजे निंबाळकर यांनी राजकारणाची चाल आणि रीत ओळखली . त्यांनी वाढदिवसाचा फोन करणे, लग्न समारंभाला उपस्थित राहणे, सामान्य माणसाच्या फोनला प्रतिसाद देणे अशा लहान लहान गोष्टी मधून आपला जनसंपर्क आणि लोकप्रियता कमावली आणि उद्धव ठाकरे यांची तुळजापूर येथे झालेल्या जाहीर सभेमध्ये विजयासाठी मागील निवडणुकीच्या विजयापेक्षा एक मत जास्त मिळावे अशी अपेक्षा व्यक्त केली होती परंतु प्रत्यक्षात मात्र तीन लाखापेक्षा जास्त मताधिक्य घेऊन ओमराजे लोकसभेमध्ये पोहोचले.
भारतीय जनता पार्टीची देशभरातील प्रचार यंत्रणा आणि धाराशिव लोकसभा मतदारसंघांमध्ये बलाढ्य पाटील कुटुंबाला पराभूत करण्यासाठी ओमराजे निंबाळकर यांनी जे तंत्र वापरले त्या तंत्राचा वापर आगामी काळात विधानसभा निवडणुकीसाठी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे महायुतीला खूप सावधपणे आगामी विधानसभा निवडणुकीत लढावे लागणार आहे .जिल्ह्याचे पालकमंत्री तानाजी सावंत यांच्या बद्दल खूप नकारात्मक वातावरण आहे. त्यांच्या उद्धट बोलण्यामुळे आणि दाब दडपशाही त्यांची प्रतिमा राजकीय नेत्यांना शोभणारी राहिली नाही. परंडा मतदारसंघांमध्ये ते विधानसभेला निवडून येऊ शकत नाही अशी चर्चा तुळजापूर भागात आहे. भारतीय जनता पार्टीचे जिल्हास्तरावर नेतृत्व करणारी नेते केवळ सोशल मीडियाचा वापर करतात जनमानसामध्ये कोणत्याही निवडणुका न लढवता केवळ पक्षाचे नेतृत्व करण्याचे काम करतात सामान्य कार्यकर्त्याला बोलत देखील नाहीत मानसन्मान देणे दूर पक्षाचे आणि संघटनेचे पद अनेकांना देण्यापासून वंचित ठेवले गेले अशी जिल्हा पातळीवर भाजपचे नेतृत्व करणाऱ्या लोकांविषयी सामान्य माणसात चर्चा आहे. भाजपचे कार्यकर्ते देखील त्यांना बोलण्यासाठी धाडस करत नाहीत , कारण बोलले तर त्यांना अपमानित व्हावे लागते. असा कार्यकर्त्यांचा पूर्व अनुभव आहे. त्यामुळे भाजपाच्या जिल्हा पातळीवरील नेतृत्वाला देखील बदलण्याची नितांत गरज आहे. जनसामान्या मध्ये काम करणाऱ्या सामान्य कार्यकर्त्याला जिल्हा स्थानावर काम करण्याची संधी आमदार पाटील यांनी द्यावी . आमदार ठाकूर यांनी यासाठी पुढाकार घ्यावा अशी चर्चा आहे. केवळ पोपटपंची काम करणारे लोक आणि पक्षासाठी काहीही योगदान न देणाऱ्यांना प्रदेश भाजपवर स्थान दिले आहे यामुळे पक्षाचे नुकसान झाल्याची भावना आहे.
विधानसभा निवडणुकीचे निमित्ताने खूप मोठा रणसंग्राम रंगणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून वेगवेगळ्या लोकप्रिय घोषणा जाहीर केल्या जात आहेत एसटी महामंडळामध्ये प्रवास करण्यासाठी महिलांना बस मध्ये दिलेली सवलत वयस्कर प्रवाशांना मोफत प्रवास करण्याची योजना याशिवाय लाडकी बहीण योजना आणि आता विद्यार्थ्यांसाठी अर्थसहाय्य योजना अशा प्रकारच्या वेगवेगळ्या घोषणा करून राज्य पातळीवरून महायुतीचे नेते विधानसभा निवडणुका जिंकण्यासाठी मोर्चे बांधणी करीत आहेत मात्र गाव पातळीवर खऱ्या अर्थाने भाजपचे काम करणाऱ्या कार्यकर्त्याला संजीवनी देणे भाजपाला अत्यंत आवश्यक आहे हे काम आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांच्या गावोगाव दौऱ्या मधून आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधून पूर्णत्वाला जाऊ शकते अशी स्थिती आहे. प्रत्येक तालुक्याच्या दौऱ्यामध्ये आमदार पाटील यांच्यासोबत असणाऱ्या प्रमुख कार्यकर्त्यांची देखील अदलाबदल केली पाहिजे तेच तेच चेहरे जनतेसमोर जाता कामा नये याची खबरदारी आमदार पाटील यांना आगामी काळात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर घ्यावी लागणार आहे. आमदार महोदय सर्व कार्यकर्त्यांची नेते आहेत ते मुठभर प्रमुख कार्यकर्त्यांची असू शकत नाहीत जसे ते मुठभर श्रीमंत गुत्तेदार कार्यकर्त्यांचे नेत्यांचे मार्गदर्शक नेते आहेत तसेच ते सामान्य गोरगरीब आणि ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांचे देखील मार्गदर्शक नेते आहेत याची जाणीव झाली पाहिजे त्याशिवाय ओमराजे निंबाळकर यांच्याबरोबर सामना करणे कठीण आहे अशी स्थिती आहे.
राजकीय स्थिती लोकसभा निवडणुकीनंतर बदलली आहेत याचा फायदा घेण्यासाठी रोहन देशमुख यांच्यासारखे संधी साधून येथे देखील विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत साडेचार वर्ष रोहन देशमुख तुळजापूर तालुक्यात फिरकले नाहीत मात्र निवडणुकीत तोंडावर त्यांनी उमेदवारीची मागणी करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. मागील पंधरा-वीस वर्षापासून तुळजापूर तालुक्यात देवानंद रोचकरी हे प्रमुख विरोधी उमेदवार म्हणून आपली भूमिका बजावत आहेत अनेक निवडणुकांमध्ये त्यांनी निर्णय मते देखील घेतलेली आहेत आपला मतदार आपल्या सोबत कायम आहे याची जाणीव त्यांना असल्यामुळे त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये निवडणूक लढण्यासाठी वेगवेगळ्या पक्षाकडे संपर्क केला आहे आणि आपल्या देवराज मित्र मंडळाची बांधणी देखील केली आहे देवराज मित्र मंडळ आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची जाळे आजही कार्यरत असून देवानंद यांची उमेदवारी प्रभावी आहे. अशा वेगवेगळ्या उमेदवारांच्या चर्चा मतदारसंघांमध्ये रंगत आहेत उमेदवार आपापल्या परीने कामाला लागलेले आहेत आगामी काळात विधानसभा निवडणूक रणसंग्राम कसा पेटणार आहे आणि कोणते उमेदवार निश्चित होणार आहेत त्याशिवाय पुढील चर्चा करता येणार नाही. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला उमेदवारी मागण्याचा अधिकार असल्यामुळे अनेकांनी आपली उमेदवारी मागितलेली आहे परंतु महायुती आणि महाविकास आघाडी याशिवाय कोण अपक्ष राहणार याकडे देखील लक्ष द्यावे लागणार आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये आमदार राणा जगजितसिंह पाटील हे विद्यमान आमदार असल्यामुळे सर्वात प्रभावी उमेदवार आहेत. धाराशिव तालुक्यातील बहात्तर गावे या मतदारसंघाला जोडली असल्यामुळे आमदार पाटील यांची बाजू भक्कम आहे या पट्ट्यामध्ये त्यांचा जनाधार पूर्वीपासून मोठा आहे डॉक्टर पद्मसिंह पाटील मंत्रीपदावर असल्यापासून या परिसरामध्ये पाटील कुटुंबाचा धबधबा राहिलेला आहे याशिवाय तुळजापूर तालुक्यामधील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सचिन पाटील आणि त्यांचे सोबत भाजपमध्ये प्रवेश केलेले काँग्रेसचे नेते यांनी आमदार पाटील यांना मोठे पाठबळ दिलेले आहे . माजी सभापती सचिन पाटील हे विद्यमान कार्यरत बाजार समितीचे सभापती असून दुसऱ्यांदा या पदावर कार्यरत आहेत. तुळजापूर तालुक्याच्या राजकारणामध्ये अनेक वर्षापासून कार्यकर्त्यांना पाठबळ देणारा नेता म्हणून सचिन पाटील यांची ओळख आहे. त्यांच्यामुळे आमदार पाटील यांना तुळजापूर तालुक्यात निवडणूक लढवण्यासाठी मोठी मदत झालेली आहे. कार्यकर्त्याचे मोठे जाळे, निवडणुकीसाठी आवश्यक सर्व बाबी आमदार पाटील यांच्याकडे तयार आहेत. कोणत्याही क्षणी निवडणुका लागल्या तर त्यांच्याकडून यंत्रणा सुसज्ज असल्यामुळे त्यांची उमेदवारी या मतदारसंघांमध्ये प्रबळ आहे. पुन्हा एकदा मधुकरराव चव्हाण आणि राणा जगजीत सिंह पाटील यांच्यामध्येच लढत होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. काँग्रेस आणि भाजपच्या गोटामधून या शक्यतेला होकार दिला जात असताना देवानंद रोचकरी आणि अशोक जगदाळे हे दोन प्रबळ विरोधक या मतदारसंघांमध्ये पुन्हा एकदा निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे चित्र आहे मत विभागणीचा देखील या मतदारसंघांमध्ये मोठा मुद्दा राहणार आहे.