राष्ट्रीय कलोपासकची ” पुरुषोत्तम करंडक” प्राथमिक फेरीला प्रारंभ

‘पुण्यात भ्रीडी‌’ने पुरुषोत्तक करंडक स्पर्धेचा पडदा उघडला

पुणे दिनांक १६ प्रतिनिधी

नवोदित कलाकारासाठी भविष्य घडवणारी आणि कला क्षेत्रामध्ये उत्तम कलावंत निर्माण करणारी युवकासाठी नवी प्रेरणा म्हणून काम करणारी राष्ट्रीय कलोपासक आयोजित पुरुषोत्तम करंडक स्पर्धेच्या प्राथमिक फेरीला आज (दि.१६) जल्लोषात सुरुवात झाली. डॉ. डी. वाय. पाटील ज्ञानप्रसाद युनिव्हर्सिटी ज्ञानप्रसाद बी.स्कूल, ताथवडेच्या संघाने सादर केलेल्या ‌‘भ्रीडी‌’ या एकांकिकेने स्पर्धेचा पडदा उघडला.

स्पर्धा भरत नाट्य मंदिरात आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धा सायंकाळी ५ ते ८ या वेळात होत आहे. रविवारी सकाळी 9 ते १२ आणि सायंकाळी ५ ते ८ वेळात स्पर्धा होणार आहे. स्पर्धेचे जनक राजाभाऊ नातू यांचे यंदाचे जन्मशताब्दी वर्ष असून स्पर्धेचे 59वे वर्ष आहे. मंजुषा जोशी, गोपाळ जोशी, अभिजित मकाशिर स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे परिक्षक आहेत.

पहिल्या दिवशी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अभियांत्रिकी महाविद्यालयाने (मांजरी)आता वाजव‌’, तर पुणे विद्यार्थी गृहाचे इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट, पुणेने ‌‘बिजागरी‌’ ही एकांकिका सादर केली. दि. १६ ते दि.३० ऑगस्ट या कालावधीत स्पर्धेत ५१ एकांकिकांचसादरीकरण होणार आहे.शनिवारी (दि.१७) सी. ओ. ई. पी. टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी, पुणे ‌‘जीवन साठे अंडरग्राऊंड‌’, झिल अभियांत्रिकी महाविद्यालय, नऱ्हे ‌‘परकी?‌’ आणि पी. ई. एस. मॉडर्न अभियांत्रिकी महाविद्यालय ‌‘विमोचनम्‌‍‌’ एकांकिका सादर करणार आहेत. स्पर्धेची अंतिम फेरी दि. २१ व २२ सप्टेंबर २०२४ रोजी होणार असून दि. २८ सप्टेंबर रोजी प्राथमिक फेरीचा पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *