तुळजापूर दिनांक 27 प्रतिनिधी
हिंदुरुदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न तुळजापूर विधानसभा मतदारसंघावर भगवा झेंडा फडकवण्याचे होते हे स्वप्न साकार करण्यासाठी आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेना शिंदे गटाकडून पक्षाचे राज्य प्रवक्ते योगेश केदार आणि धाराशिव जिल्ह्याचे सहसंपर्कप्रमुख अमरराजे कदम हे दोघे इच्छुक असून कोणत्याही परिस्थितीमध्ये महाविकास आघाडीमध्ये ही जागा शिंदे गटाला सोडावी असा कार्यकर्त्यांचा आग्रहा दिसून येत आहे.
शिवसेना शिंदे गटाच्या वतीने तुळजापूर येथे पक्ष कार्यालयाचे उद्घाटन पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी पर्यावरण मंत्री रामदास भाई कदम, आमदार योगेश कदम , महाराष्ट्र राज्य प्रदूषण महामंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांच्या उपस्थितीत गुरुवार रोजी २९ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आल्याची माहिती या निमित्ताने पक्षाच्या वतीने युवा सेना उपजिल्हाप्रमुख सुरज कोठावळे यांनी दिली आहे. शिवसेनेच्या सर्व कार्यकर्त्यांमध्ये विधानसभा निवडणूक लढवण्याच्या अनुषंगाने मोठी जिद्द आहे या तालुक्यांमध्ये हिंदुरुदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचा खूप मोठा मतदार आहे. सामान्य माणसांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची चांगली इमेज आहे महाराष्ट्राच्या राज्यकारभारामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीचे सरकार चालवताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सर्व सहकाऱ्यांना सन्मानाची वागणूक देऊन राज्याच्या हिताचे उत्तम निर्णय घेऊन राज्याला प्रगतीपथावर आणले आहे. जनसामान्यांमध्ये लोकप्रिय विकासाच्या वेगवेगळ्या योजना त्यांच्याच नेतृत्वाखाली राबविण्यात आले आहेत याचा खूप मोठा फायदा धाराशीव जिल्ह्यातील जिल्हावासीयांना होत आहे.
तुळजापूर विधानसभा मतदारसंघांमध्ये आमदार हे भारतीय जनता पार्टी पक्षाचे आहेत. परंतु लोकशाही मार्गाने तुळजापूर विधानसभा मतदारसंघ शिवसेनेसाठी सोडविण्यात यावा ही तमाम शिवसैनिकांची प्रामाणिक मागणी आहे याचा पक्षाने विचार करावा अशी मागणी या कार्यालय उद्घाटनाच्या निमित्ताने पुढे आली आहे. पक्षाचे राज्य प्रवक्ते योगेश केदार आणि धाराशिव जिल्ह्याचे सहसपर्कप्रमुख अमरराजे कदम यांनी पक्षाकडे उमेदवारीची मागणी केलेली आहे. यामध्ये योगेश केदार तुळजापूर तालुक्यातील सलगरा दिवटी हे गाव आहे यापूर्वी त्यांनी या तालुक्यात सामाजिक आणि सांस्कृतिक तसेच राजकीय वेगवेगळ्या काम केलेले आहे मराठा आरक्षणाच्या विषयात त्यांनी मराठा वनवास यात्रा आणि माजी खासदार छत्रपती संभाजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा दीर्घकाळ लढा दिलेला आहे या पार्श्वभूमीवर त्यांची उमेदवारी मागणी झालेली आहे.
पक्षाचे जिल्हा सहसंपर्कप्रमुख अमरराजे कदम हे भारतीय विद्यार्थी सेनेपासून महाविद्यालयीन जीवनात राजकारणामध्ये प्रवेश केलेले तरुण नेते आहेत. तुळजापूर शहर येथून त्यांनी आपल्या राजकारणाची सुरुवात केली. विविध निवडणुका लढवण्याचा त्यांना अनुभव आहे. तुळजाभवानी फोटो पुजारी मंडळ या पुजारी मंडळाचे ते पदसिद्ध अध्यक्ष असून तुळजाभवानी मंदिर हे तुळजापूरच्या राजकारणामध्ये प्रमुख केंद्र आहे त्यामुळे त्यांच्या उमेदवारीला महत्त्व आहे. तुळजापूर तालुक्याचे राजकारणामध्ये त्यांनी अनेक वर्ष मनसे या पक्षामध्ये काम करून आपली राजकीय पार्श्वभूमी सिद्ध केलेली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व माजी मंत्री रामदास कदम यांच्यावर विश्वास ठेवून त्यांनी शिवसेनेमध्ये गतवर्षी प्रवेश केला आणि ग्रामीण भागामध्ये शिवसेनेला तसेच पक्षाचे काम करणारे शिवसैनिकांना आधार देण्याचे काम केलेले आहे. वेगवेगळे सामाजिक आणि राजकीय उपक्रम त्यांनी या मतदारसंघांमध्ये राबवल्यामुळे त्यांच्या उमेदवारीला कार्यकर्त्यांमधून मोठा उठाव आहे. तुळजापूर विधानसभा मतदारसंघांमध्ये तरुणांच्या बेरोजगारीचा खूप मोठा प्रश्न असून या प्रश्नाच्या अनुषंगाने शिवसेना आगामी काळामध्ये मोठे रोजगार मिळावे आयोजित करून जिल्ह्यातील तरुणांना रोजगार देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी नुकतेच जाहीर केलेले आहे.
दुष्काळ आणि अतिवृष्टी अशा दोन्ही आपत्तीमध्ये धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी वारंवार सापडतो या अडचणीच्या काळात शेतकऱ्यांन आधार देण्याच्या अनुषंगाने शिवसेना शिंदे गटाकडून करण्यात आलेले काम तसेच महाराष्ट्र सरकारने समाजातील सर्व घटकांना समोर ठेवून राबविलेल्या वेगवेगळ्या विकास योजना याविषयी जनजागृती करण्याचा अनुषंगाने पक्षासाठी त्यांनी चांगले काम केलेले आहे त्यामुळे सामान्य कार्यकर्त्यांमधून तुळजापूर विधानसभा निवडणूक लढवण्याच्या अनुषंगाने पक्षाकडे मागणी होत आहे . पक्षश्रेष्ठी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जो निर्णय घेईल त्या निर्णयासोबत राहायचे असा मनसुबा या शिवसैनिकांनी मनामध्ये ठेवला आहे योगेश केदार आणि अमर राजे कदम हे दोन्ही नेते आमच्यासाठी सारखे आहेत कोणालाही उमेदवारी मिळाली तरी आम्ही जिद्दीने लढणार आहोत आणि महायुतीचा विजय करून बाळासाहेब ठाकरे यांची तुळजापूर विधानसभेवर भगवा फडकवण्याचे स्वप्न साकार करणार आहोत अशी ग्वाही दिलेली आहे.