विघ्नहर्ता’ गणेशोत्सव मंडळाने मिरवणुकीसह अन्य अनावश्यक खर्चाला फाटा देत सामाजिक उपक्रम
तुळजापूर: दिनांक 14 प्रतिनिधी तुळजापूर शहरातील यंदा नव्याने सुरुवात करण्यात आलेल्या “विघ्नहर्ता प्रतिष्ठान” गणेशोत्सव मंडळाच्या वतीने गणेशोत्सव साजरा करताना मिरवणुकीसह डिजे, अन्य साऊंड सिस्टीम न लावता सामाजिक भान ठेवून सामाजिक उपक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार शुक्रवार दि.13 रोजी जय तुळजाभवानी माता केंद्रीय प्राथमिक आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांनी येथील गणरायाची आरती करण्यात आली. आरतीनंतर उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वाटप व त्यानंतर जय तुळजाभवानी माता आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
यंदा प्रथमच सुरु करण्यात आलेल्या “विघ्नहर्ता प्रतिष्ठान” गणेशोत्सव मंडळाकडून अनावश्यक मिरवणुकीसह डिजे, वा अन्य साऊंड सिस्टीमसाठी लागणाऱ्या खर्चाला फाटा देत गणेश भक्तांसाठी महाप्रसाद व शैक्षणिक साहित्याचे वाटप या सारखे सामाजिक उपक्रम राबविण्यात आल्याने मंडळाचे कौतुक होत आहे. या सोहळ्यासाठी मंडळातील सर्व पदाधिकाऱ्यासह सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.