तालुक्याच्या विकासासाठी मोठा संघर्ष केला, पाण्यासाठी विधानसभेत केलेली भाषणे हा जिवंत पुरावा आहे,काँग्रेस म्हणजे विकास आणि आमचा श्र्वास – मधुकरराव चव्हाण 

तुळजापूर शहराचा विकास आणि कृष्णा खोऱ्याचे पाणी विलासराव देशमुख यांनी तुळजापूर तालुक्याला दिले कृष्णेचे पाणी 

तुळजापूर दिनांक ६ प्रतिनीधी 

माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी तुळजापूर तालुक्याला शेतीसाठी लागणारे कृष्णा खोऱ्यातील पाणी मंजूर करून त्याला मोठी आर्थिक तरतूद दिली ही काँग्रेसची देणगी आहे काँग्रेस म्हणजे विकास आणि आमचा श्वास आहे असे उद्गार माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी तुळजापूर येथे पत्रकार परिषदेमध्ये काढले. कृष्णा खोऱ्याचे 21 टीएमसी पाणी मंजूर करण्यासाठी केलेला संघर्ष हा तुळजापूर तालुक्याच्या कृषी क्षेत्राच्या विकासाचा मोठा इतिहास आहे आणि जे लोक इतिहास लक्षात ठेवतात तेच पुढे प्रगती करू शकतात तालुक्यातील जनता सुज्ञ आहे, अफवा आणि गैरसमज केवळ बुडबुडे आहेत असा मुद्दा माजी मंत्री चव्हाण यांनी या निमित्ताने व्यक्त केला.

तुळजापूर येथे  मधुकरराव चव्हाण यांच्या संपर्क कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी कृष्णा खोरे विकास महामंडळ आणि मराठवाडा सिंचन योजना या विषयाच्या अनुषंगाने महत्त्वाचे भाष्य केले. पाण्यावरून तुळजापूर विधानसभा मतदारसंघांमध्ये श्रेयाची लढाई सुरू झाली असताना माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी मराठवाडा सिंचन योजना ही केवळ विलासराव देशमुख यांची पुण्याई आहे मुख्यमंत्री म्हणून विलासराव देशमुख यांनी तुळजापूर शहर 325 कोटी रुपयांची मदत केली आणि तालुक्यात मराठवाडा सिंचन योजनेच्या माध्यमातून 21 cmc पाणी औरंगाबाद येथे झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर केले मराठवाडा वैधानिक विकास महामंडळाच्या माध्यमातून आपण केलेला पाठपुरावा आणि विधानसभेच्या सभागृहामध्ये केलेले पाण्याच्या प्रश्नावरून आक्रमक भाषण यामुळे आपल्याला मराठवाडा सिंचन योजना व कृष्णा खोऱ्याचे पाणी मंजूर झाले आहे असे मधुकरराव चव्हाण यांनी या पत्रकार परिषदेत सांगितले. या पत्रकार परिषदेस मध्ये जि प माजी सभापती मुकुंद डोंगरे ,काँग्रेसचे नेते ऋषिकेश मगर, प्रदेश युवक सरचिटणीस अभिजीत चव्हाण माजी सभापती शिवाजी गायकवाड, बाजार समितीचे संचालक रामचंद्र ढवळे रविराज कापसे, रसिक वाले यांची उपस्थिती होती.

आज या पाणी प्रश्नावर चाललेली लढाई पाहिल्यानंतर मनाला वेदना होतात परंतु काँग्रेस पक्ष सतत विकासाला प्राधान्य देणारा पक्ष ठरला आहे सर्व जाती धर्माला सोबत घेऊन काम करताना आणि तुळजापूर तालुक्यामध्ये सर्वच जिल्हा परिषद मतदार संघामध्ये पिण्याच्या पाण्याच्या अडचणी पासून तालुक्यातील रस्ते, तालुक्यातील आरोग्यवस्था, शिक्षण व्यवस्था, शेतकऱ्यांचे प्रश्न यासाठी यापूर्वी केलेले काम निश्चितपणे येणाऱ्य निवडणुकीत उपयोगी पडणार आहे. तालुक्याला वादापेक्षा विकासाची आणि सामान्य माणसाच्या प्रश्नांना वेळ देण्याची गरज आहे. तुळजापूर तीर्थक्षेत्राचा विकास जो विलासराव देशमुख यांनी केला सर्वांना सोबत घेऊन केलेला विकास हा मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा आहे या उलट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काळात केवळ विकासावरून चर्चा झाली विकासाला मूर्त रूप आणण्यामध्ये सर्वांना अपयश आले आहे असेही याप्रसंगी माजी मंत्री चव्हाण यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *