कागदापासून दीपावली निमित्ताने आकाश कंदील निर्माण तुळजापुरात प्रशिक्षण कार्यशाळा

ऋतुजा कावरे यांच्या मार्गदर्शनात शालेय विद्यार्थ्यांनी बनवले आकाश कंदील

तुळजापूर – दप्तरा विना शाळा उपक्रमांतर्गत
नगरपरिषद प्राथमिक शाळा क्रमांक दोन मधील विद्यार्थ्यांसह ऋतुजा शहाजी कावरे यांच्याकडून
टाकाऊ वस्तु पासून व कागदापासून वैशिष्टपूर्ण आणि आकर्षक रंगीबेरंगी आकाश कंदील कसे बनवावे याबाबत प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली.

नगर परिषद प्राथमिक शाळा क्रमांक दोन येथे
दिवाळीसाठी आकाश कंदील कसे करावीत ? करतानाची प्राथमिक तयारी,विविध आकाराचे आणि वेगवेगळ्या पद्धतीने आकर्षक कंदील बनवण्याचे प्रक्रिया विद्यार्थ्यांना सुलभ सोप्या भाषेत
प्रात्यक्षितांतून सांगण्यात आली. मास्टर ट्रेनर
ऋतुजा कावरे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी सुंदर व सुबक आकाश कंदील बनवले.

विद्यार्थ्यांनी स्वतः बनवलेले आकाश कंदील पाहूंन
चेहऱ्यावर आनंदी मुद्रा दिसत होती. या उपक्रमास शाळेचे मुख्याध्यापक गणेश रोचकरी, सहशिक्षक सुरजमल शेटे, सहशिक्षिका सुज्ञानी गिराम,महेंद्र कावरे यांचे सहकार्य लाभले. विद्यार्थ्यांनी या उपक्रमात आनंदी अन उत्साहात सक्रिय सहभाग घेतला.

चौकट

नगरपालिकेच्या प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांसमवेत दिवाळीच्या निमित्ताने कागदापासून छोटे मोठे आकाश कंदील कसे बनवतात यासाठी आनंदी वातावरणात कार्यशाळा घेण्याची संधी मला मिळाली, शालेय विद्यार्थ्यांनी खूपच उत्साहात सहभाग नोंदवला. यापूर्वी मी अनेकदा विविध शाळेत रक्षाबंधन पौर्णिमा निमित्ताने विविधांगी राख्या बनवणे,चित्रकला,मेहंदी,टाकाऊ वस्तूपासून उपयोगी वस्तू बनवणे आदी उपक्रम घेण्याचा प्रयत्न केला आहे.बाल विद्यार्थ्यांसोबत राबवण्यात येणाऱ्या सर्व उपक्रमात सहभागी झाल्याचा आनंद वेगळाच असतो.

कु.ऋतुजा शहाजी कावरे
मेकअप आर्टिस्ट तुळजापूर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *