तुळजापूर येथील पाळीकर समाजा चे अध्यक्ष विपीन शिंदे यांना पुजारी वर्गाच्या मागण्या अनुषंगाने उचित कार्यवाही करण्याच्या अनुषंगाने आमदार राणा जगजितसह पाटील यांनी उप लेखी हमीपत्र मंडळाचे अध्यक्ष विपिन शिंदे यांच्याकडे सादर केले आहे. रोक्त संदर्भीय पत्रात नमूद केलेल्या मुद्यांवर शहरातील पुजारी,व्यापारी व नागरिक यांच्या हिताचा विचार करून मी खालील प्रमाणे कायद्याच्या अधीन राहून माझी भूमिका स्पष्ट करत आहे. तुळजाभवानी मंदिराच्या अनुषंगाने कोणताही गैरसमज पसरू नये तसेच आमदार यांची भूमिका काय आहे हे स्पष्ट करणारे हे निवेदन पाळीकर समाजाकडे दिल्यामुळे आमदार महोदयांच्या संदर्भात होणाऱ्या चर्चांना विराम मिळाला आहे.
अभिषेक पास ५० वरुन ५०० रुपये करणेबाबतचा ठराव रद्द केला असून पुजारी मंडळाला विश्वासात घेऊनच याबाबत पुढील निर्णय घेण्यात येईल.
श्री तुळजाभवानी पाळकर भोपे पुजारी कुटुंबातील महिलांना सन्मानपूर्वक दर्शन व्यवस्था व्हावी यासाठी देवीजींचा मुख्य गाभाऱ्यात जाऊन चरणस्पर्श बाबत तात्काळ निर्णय घेण्यात येईल.
श्री.तुळजाभवानी मातेच्या धार्मिक पुजा विधी अखंडपणे सुरु राहुन अभिषेक पास संख्या आणि वेळ वाढवण्याबाबत.अभिषेक पूजेच्या वेळी गाभारा प्रमुख नियुक्त करण्याबाबत तसेच अभिषेक पास बुकिंग यंत्रणा ऑनलाईन लॉगिन प्रमाणे पुजारी बांधवाना साठी उपलब्ध करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल.
प्रस्तावित विकास आराखड्यात पुजारी मंडळ, नागरिक, व्यापारी यांच्या मागणीनुसार सर्व विकास कामे ही मंदीराच्या मागे विकास करण्यास विरोध लक्षात घेऊन,तुळजापूर शहरातील पूर्व दिशेस कामे करण्याबाबत.आरखड्याबाबत व्यापारी, पुजारी,छोटे मोठे व्यवसायिक ,रिक्षा वाले, फेरीवाले, लॉज /भक्तनिवास चालक यांच्या दृष्टीने सर्व समवेश चर्चा करून निर्णय घेण्यात येईल.
श्री तुळजाभवानी मंदिराचे हक्कदार पुजारी यांचे भोपे जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र काढून देण्यासाठी कटिबद्ध.
श्री तुळजाभवानी देवीजींचा माहिती प्रसार ,पूजा सेवा करण्याच्या उद्दिष्टाने सर्व पुजारी बांधवाना सर्व सोयीयुक्त रूम,प्रसार करण्यासाठी फोटो ,व्हिडिओ काढण्यासाठी परवानगी ,ओखपत्र देण्यासाठी तात्काळ निर्णयघेण्यात येईल.अधिकृत हक्कदार सर्व पुजारी,सेवाधारी, महंत यांची यादी मंदिरच्या वेबसाईटवर प्रकाशित करण्यात येईल.
श्री क्षेत्र तुळजापूर मध्ये विविध ठिकाणी पार्किंग आणि आवश्यक त्या सर्व सुख सोयी,सुरक्षा निगराणी यंत्रना ,दिशा फलक , पुजारी बांधव माहिती फलक, स्वच्छ पिण्याचे पाणी यंत्रणा , सोलर लाईट व्यवस्था ,इत्यादी कामे आमदार फंड आणि इतर फंडातून तात्काळ करण्यासाठी कटिबद्ध.
भक्तांना श्री तुळजाभवानी मंदिर प्रवेश हा मुख्य महाद्वार मधून करणार , दर्शन मंडप चे विविध छोटे छोटे भाग निर्माण करून आवश्यक गर्दी नुसार योग्य व्यवस्थापन करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून सुविधा करणार. सदर मागण्याच्या अनुषंगाने योग्य आश्वासन दिल्यामुळे तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदिर अशी निगडीत असणारे सर्व घटक यांच्यापर्यंत योग्य संदेश गेला असल्याचे दिसून येत आहे माजी नगराध्यक्ष सचिन रोचकरी, विशाल रोचकरी, प्रतीक रोचकरी, सुनिल रोचकरी आदी याप्रसंगी उपस्थित होते.