राणा दादांची विकास कामे आणि जनतेच्या विश्वासावर विजय प्राप्त झाला _ विनोदपिटू गंगणे

तुळजापूर दिनांक 24 डॉ सतीश महामुनी

तुळजापूर विधानसभा मतदारसंघांमध्ये महायुतीचे उमेदवार राणा जगजीत सिंह पाटील यांच्या प्रचंड मोठ्या विजयामध्ये सिंहाचा वाटा असणारे विनोद पिटू गंगणे यांनी दादा यांच्या विजयामध्ये जनतेचा विश्वास आणि त्यांनी तुळजापूर शहर आणि तालुक्यामध्ये विकास कामासाठी दिलेला भरघोस निधी यामुळे प्राप्त झाला आहे अशा शब्दात विधानसभा निवडणुकीतील या विजयाचे वर्णन केले आहे.

आपण मागील दहा वर्षापासून तुळजापूर नगर परिषदेच्या माध्यमातून तसेच तुळजापूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणावर विकास काम केले आहे या विकास कामांचा फायदा लोकांना झालेला आहे राज्य सरकार मागील अडीच वर्षापासून आमदार राणा जगजीत सिंह पाटील यांच्या मार्फत लोककल्याणकारी कामासाठी चांगला विकासाचा निधी देते आहे त्यामुळे वाड्या वस्ती तांड्यापर्यंत शासनाच्या योजना पोहोचले आहेत गावागावात रस्ते समाज मंदिर आणि लोक उपयोगी मूलभूत सुविधा राणा दादा यांच्या नेतृत्वाखाली लोकांना मिळाल्या त्यांचा लाभ लोकांना घेता आला कामाच्या माध्यमातून विश्वास संपादन करून तुळजापूर विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी राणा जगजीत सिंह पाटील यांना विजयी केले आहे हा आमच्यासाठी अत्यंत गौरवाचा दिवस आहे कारण मागील सहा महिन्यापासून सर्व कार्यकर्ते प्रचंड मेहनत घेत होते लोकसभा निवडणूक काळात देखील या सर्व कार्यकर्त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. त्यानंतर सातत्याने भारतीय जनता पार्टी आणि मित्रपक्ष अशी असणारी महायुती विधानसभा निवडणुकीच्या विजयासाठी प्रयत्न करत होती अखेर 37 हजार मतांनी राणा दादा यांचा चांगला विजय झालेला आहे महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीने राणा दादा यांना आशीर्वाद दिला जनतेची सेवा यापुढे राणा दादा अत्यंत प्रभावीपणे करणार आहेत त्यांनी काल सांगितल्याप्रमाणे जे जे आश्वासन निवडणुकीच्या काळात लोकांना दिलेले आहे ते पूर्ण करण्यासाठी आगामी काळात काम करणार आहेत अशी प्रतिक्रिया याप्रसंगी विनोद पिटू गंगणे यांनी दिली आहे.

आम्ही सर्व कार्यकर्ते राणा दादा यांच्या कामाला पूर्ण करण्यासाठी वचनबद्ध असून निश्चित जनतेच्या अपेक्षा पूर्ण होतील आणि महायुतीने ज्या विश्वासाने विजयी केले आहे तो विश्वास सार्थ होईल असे यावेळी युवक नेते विनोद पिंटू गंगणे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *