शिवसेना शिंदे गटाच्या जिल्हा सहसंपर्कपदी तुळजापूरचे अमरराजे परमेश्वर यांची नियुक्ती
तुळजापूर दिनांक 19 न्युज मराठवाडा प्रतिनिधी
शिवसेनेचे जेष्ठ नेते माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्या हस्ते तुळजापूरचे शिवसेना नेते अमरराजे कदम परमेश्वर यांना मुंबई येथील बाळासाहेब भवन पक्ष कार्यालयात धाराशिव जिल्हा सह संपर्कप्रमुख पदाचे नियुक्तीपत्र देण्यात ञआले. याप्रसंगी बुलढानाचे खासदार प्रतापराव जाधव,शिवसेनेचे सचिव संजय मोरे उपस्थित होते.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा संघटक अमरराजे परमेश्वर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वर्षा या निवासस्थान शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला त्यानंतर पक्षाच्या कार्यालयात माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्या हस्ते त्यांना धाराशिव जिल्हा सहसंपर्कप्रमुख असे महत्त्वाचे पद देण्यात आले आहे. यापूर्वी त्यांनी भारतीय विद्यार्थी सेना शिवसेना आणि त्यानंतर राज ठाकरे यांनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये अनेक वर्ष काम केले आहे. तुळजाभवानी भोपे पुजारी मंडळाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी प्रदीर्घकाळ आपली कारकीर्द गाजवली आहे. नव्याने शिवसेनेच्या शिंदे गटामध्ये त्यांनी प्रवेश केल्यामुळे शिंदे गटाला चांगला चेहरा मिळाला आहे. तालुका अध्यक्ष संभाजी पलंगे यांनी तुळजापूर तालुक्याच्या वतीने नवनिर्वाचित जिल्हा सह संपर्कप्रमुख परमेश्वर यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी तुळजापूर येथे पत्रकार परिषद घेऊन या संदर्भातील माहिती पत्रकारांना दिली आपण धाराशिव जिल्ह्याच्या सर्व ज्येष्ठ आणि नव्या सहकारी नेत्यांना सोबत घेऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणारा असून तुळजापूर आणि उमरगा विधानसभा मतदारसंघाचे विशेष जबाबदारी आपल्याकडे राहणार आहे आगामी काळात आपण पक्षाचे पाठबळ वाढवण्याच्या अनुषंगाने सदस्य नोंदणी आणि त्यानंतर महिनाभरात शहराने तालुका पदाधिकांच्या नियुक्ती करणार आहोत.
तुळजापूर शहराचा विकास करीत असताना कमीत कमी विस्थापित करून विकास कसा करता येईल याकडे आपण लक्ष देऊ आणि त्या संदर्भात मुख्यमंत्री महोदयाकडे पाठपुरावा करू शहरातील व्यापारी आणि नागरिकांना त्रास होणार नाही याची खबरदारी घेण्यासाठी आपल्या पदाचा उपयोग करून तुळजाभवानी मंदिर परिसराचा विकास करत असताना शहरातील पुजारी वर्गाला कोणताही त्रास होणार नाही याची काळजी आपण सर्व घटकाशी चर्चा करून निश्चित करू असेही त्यांनी आश्वासन यावेळी दिले. युवक नेते सुरज कोठावळे आणि इतर कार्यकर्त्यांची याप्रसंगी उपस्थिती होती