तुळजापुरातील अतिश इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी संस्थेचा गुणगौरव सोहळा थाटात संपन्न

ए.आय.टी चा स्वप्नपंख गुणगौरव सोहळा संपन्न

तुळजापूर  दि 12 प्रतिनिधी 

शहरातील अतिष इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेचा दहावीच्या परीक्षेत उज्ज्वल यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा स्वप्नपंख हा गुणगौरव सोहळा संपन्न झाला .

कार्यक्रमास प्रोफेशनल टीचर असोसिएशन म. रा. कोअर कमिटी सचिव डॉ. आनंद  मुळे,  जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब म्हात्रे,  तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे डॉ. धनंजय खुमणे, सीमांश डायग्नोस्टिक सेंटर चे प्रमुख डॉ. अक्षय कदम-पाटील  उपस्थित होते.

 डॉ. आनंद मुळे यांनी   विद्यार्थ्यांचे कौतुक करताना तुमचा निकाल हा तुळजापूर शहराच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी अभिमानास्पद आहे असे गौरवोद्गार काढले. महाविद्यालयीन शिक्षणात विद्यार्थ्यांनी विषयातील संकल्पना समजावून घेण्यावर जास्त भर द्यावा असे मार्गदर्शन डॉ. धनंजय खुमने यांनी केले. प्राथमिक शिक्षण घेताना विद्यार्थ्यांनी विषयातील संकल्पना समजून घेण्यावर जास्त भर द्यावा असे मार्गदर्शन डॉ. अक्षय कदम पाटील यांनी केले. 

कार्यक्रमातील सर्वच मान्यवरांनी विद्यार्थ्यांनी कोरोनाचा तणावपूर्ण परिस्थिती मिळवलेल्या यशाचा समाजाच्या सर्वच स्तरावरून सन्मान झाला पाहिजे व विद्यार्थ्यांचे कौतुक झाले पाहिजे असे मत व्यक्त करत, विविध श्रेणीतील सतरा पुरस्काराने विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ए.आय.टी चे संचालक प्रा.अतिश घाटशिळे यांनी तर सूत्रसंचालन कु. वैष्णवी काटकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी टीम ए.आय.टी मधील प्रा. प्रिया सुरवसे, प्रा.निलोफर सय्यद, प्रा.अमृता डोकडे, प्रा.अनुराधा पाटील,  श्रीमती एकता व्यास, श्रीमती दिपाली बर्वे  व संपूर्ण टीम ए.आय.टी ने अथक परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *