तुळजापूर दिनांक 28 डॉक्टर सतीश महामुनी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवक नेते जिजामाता प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेश भाऊसाहेब चोपदार यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट तुळजापूर शहराध्यक्षपदी पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे यांनी नियुक्ती केली आहे. शहर कार्याध्यक्षपदी दिनेश क्षीरसागर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यस्तरावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर अडचणीचा काळ असताना तुळजापूर शहराध्यक्ष पदासाठी मात्र जुन्या कार्यकर्त्याला संधी दिल्याचे यावरून दिसून येत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते राज्याचे क्रीडामंत्री नामदार संजय बनसोडे यांनी धाराशिव जिल्ह्याचा दौरा केला आणि संघटनात्मक नियुक्ती करण्याच्या सूचना जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे यांना दिल्या. अजित पवार गट स्थापन झाल्यानंतर तुळजापूर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये दोन गट पडले असून अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष पदी यापूर्वी युवक तालुका राष्ट्रवादी अध्यक्षपद भूषवलेले आणि जिजामाता प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेचे अध्यक्ष असणारे महेश भाऊसाहेब चोपदार यांची निवड करण्यात आली आहे त्यांच्यासोबत कार्याध्यक्ष म्हणून दिनेश धन्यकुमार क्षीरसागर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या आदेशाने जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे यांनीही नियुक्ती केली आहे या निवडीनंतर आमदार विक्रम काळे प्रदेश सरचिटणीस सुरेश पाटील ज्येष्ठ नेते सुरेश बिराजदार ज्येष्ठ नेते गोकुळ शिंदे शफी शेख विजय सरडे गणेश कदम सुभाष कदम फिरोज पठाण गोरख पवार दुर्गेश साळुंखे आदित्य शेटे अशितोष कदम वैभव शिंदे अभय माने नितीन रोचकरी सुनील शिंदे दत्तात्रय हुंडेकरी अशोक शिंदे विकी घुगे शशिकांत नवले बाळासाहेब पेंदे धनाजी चोपदार दत्तात्रय चोपदार या कार्यकर्त्यांनी महेश चोपदार आणि दिनेश क्षीरसागर यांचे अभिनंदन केले आहे हे दोन्ही कार्यकर्ते तुळजापूर येथे सामाजिक चळवळीमध्ये सक्रिय असून त्यांच्या निवडीचे सर्वांनी जोरदार स्वागत केले आहे.
प्रतिक्रिया
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि अजित पवार हे विकासाचे समीकरण आहे अजित पवार यांची काम करण्याची पद्धत सरकारमध्ये त्यांचा असणारा प्रभाव त्याचबरोबर कार्यकर्त्याला काम करण्यासाठी त्यांच्याकडून मिळणारे प्रोत्साहन या जमिनीच्या बाजू आहेत. तुळजापूर तीर्थक्षेत्राचा नव्याने होत असलेला विकास आणि या तुळजापूरच्या विकास आराखड्यामध्ये शहरासाठी आवश्यक असणारा विकास या बाबीला मी अधिक महत्त्व देणारा कार्यकर्ता असून आगामी काळात या विषयावर तुळजापुरातील पुजारी बांधव व्यापारी बांधव आणि नागरिक तसेच जागा मालक यांच्या भावना प्रशासनापर्यंत गेल्या पाहिजेत सभा पुराव्याच्या आधारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यापुढे तुळजापूर तीर्थक्षेत्राच्या विकासाचा पाठपुरावा करणार आहे शहरातील नागरिकांनी निर्धास्तपणे आपल्या भावना व्यक्त केल्या पाहिजेत आपल्या भावनांना लेखी स्वरुपात मांडल्यास त्या संदर्भात अधिक प्रभावी निर्णय घेतला जाऊ शकतो केवळ चर्चा केल्यामुळे विकासाचे प्रश्न चिघळतात हा आजपर्यंतचा आपला अनुभव आहे याचा गांभीर्याने शहरवासीयांनी विचार करावा. पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे ज्येष्ठ नेते गोकुळराव शिंदे आणि इतर मान्यवर यांच्यामार्फत आपल्या प्रश्नांची सोडवणूक आपण उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली जाईल असे आश्वासन मी माझ्या या शहराध्यक्ष पदाच्या निवडीच्या निमित्ताने देतो.
- महेश चोपदार शहराध्यक्ष तुळजापूर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट