झाडाला राखी बांधून साजरे केले रक्षाबंधन, पर्यावरण संवर्धनाची राखी पौर्णिमा साजरी
तुळजापूर दि 31 पुढारी वृत्त सेवा
दुष्काळी भाग म्हणून कायम अडचणीत असलेल्या प्रदेशांनी वृक्ष संवर्धनाला महत्त्व द्यावे असा संदेश देण्याचा उद्देशाने तुळजापूर येथील नगर परिषद शाळा क्रमांक 2 च्या विद्यार्थ्यांनी झाडाला राखी बांधून राखी पौर्णिमेचा उत्सव साजरा केला आहे या उपक्रमाचे विद्यार्थ्यांमधून खूप मोठ्या प्रमाणावर उस्फुर्त स्वागत झाले.
नगरपरिषद प्राथमिक शाळा क्रमांक २ व देविका अंगणवाडी क्र.१५ च्या वतीने झाडाला राखी बांधून विद्यार्थी व शिक्षकांनी साजरे केले रक्षाबंधन.
यावेळी विद्यार्थिनींनी विद्यार्थ्यांना व शिक्षकांनी शाळा परिसरातील सर्व झाडांना राखी बांधली व त्या सर्व झाडांची संगोपनाची सर्व जबाबदारी शिक्षकाने व विद्यार्थ्यांनी घेतली.
तसेच विद्यार्थिनी विद्यार्थ्यांना राख्या बांधल्याया समारंभात स.शिक्षका. सुज्ञानी गिराम यांनी रक्षाबंधनचे व वृक्षारोपणाचे व त्याच्या संवर्धनाचे महत्व सांगितले.
सूत्रसंचालन ऐश्वर्या जाधव यांनी केले प्रास्ताविक केरण लोहारे यांनी तर आभार विद्यादेवी स्वामी यांनी मांडले. यावेळी मुख्याध्यापक गणेश रोचकरी, सहशिक्षक महेंद्र कावरे ,सुरजमल शेटे ,अंगणवाडीच्या किरण गरडकर, श्रीदेवी पाचंगे उपस्थित होत्या.
विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांना ओवाळणी म्हणून शैक्षणिक साहित्य दिले.