तुळजापुरातील चित्रकला स्पर्धेत १६१७ स्पर्धकांचा सहभाग
तुळजापूर-दि (२) प्रतिनिधी
मराठवाडा मुक्ती संग्राम दिन अमृत महोत्सव वर्ष व जनसेवक अमोल भैया कुतवळ यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद शाळा क्रमांक २ येथे करण्यात आले होते.या स्पर्धेत ३३ शाळेच्या१६१७ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला या स्पर्धेचे उदघाटन तुळजापूरचे पोलीस निरीक्षक गजानन घाडगे,काँग्रेस पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब पाटील,जेष्ठ नेते शिवछत्रपती पुरस्कार विजेते अशोकराव मगर, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गोकुळ शिंदे , काँग्रेस ज्येष्ठ नेते माधवराव कुतवळ, युवा नेते प्रवीण कदम,शाळेचे मुख्याध्यापक गणेश रोचकरी, यांच्या हस्ते देवीची प्रतिमा व स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमेचे पूजन करून स्पर्धेला सुरुवात करण्यात आली.
स्पर्धा यशस्वी होण्यासाठी प्रशाळेचे सहशिक्षक महेंद्र कावरे, सुरजमल शेटे ,महेंद्र पाटील,केरन लोहारे ,सुज्ञानी गिराम ,ऐश्वर्या जाधव ,विद्यादेवी स्वामी ,छोटू पाटील,सुनील मामा शिंदे,बिरु आप्पा माने,विकास चव्हाण,औदुंबर करंडे,आण्णा गोंडगिरे, ,अब्दुल शेख,जफर शेख, पप्पू पवार,प्रमोद भोरे,पप्पू कांबळे,अजय काटकर,गणेश अमृतराव,सलमान शेख,अजय धनके, नितीन गुंजाळ, इ जणांचे सहकार्य लाभले..
स्पर्धेचे सूत्रसंचालन कुणाल रोंगे यांनी तर प्रास्ताविक श्रेयस कुतवळ तर आभार जनसेवक अमोल कुतवळ यांनी मांडले
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी शहरातील 33 शाळेचे कलाशिक्षक व प्रतिनिधी उपस्थित होते.
स्पर्धेत या स्पर्धेत दिव्यांग विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला विशेषता पायाने पायाला ऑपरेशन झालेली व प्लास्टर झालेली विद्यार्थिनी कु. तमन्ना जावेद शेख यांनीही आपला सहभाग नोंदवला. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्याच्या सर्व भागांमध्ये शालेय आणि महाविद्यालय स्तरावर खूप मोठ्या उपक्रम सुरू आहे धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर येथे नगरपरिषदेच्या प्रशाले कडून चित्रकलेच्या क्षेत्रामध्ये खूप चांगली स्पर्धा यानिमित्ताने संपन्न झाली या स्पर्धेला विद्यार्थ्यांनी दिलेल्या उदंड प्रतिसाद आणि या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केलेला शिक्षकांचा उत्साह पाहता मराठवाडा मुक्ती दिनाच्या या आनंद उत्सवामध्ये मराठवाड्यातील सर्व स्तरातील लोक सहभागी झाले आहे असे दिसून येते