तुळजापूर रजिस्ट्री कार्यालय व तुळजाभवानी साखर कारखाना प्रश्नासाठी उठवला आवाज
तुळजापूर दिनांक 8 प्रतिनिधी
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे युवक नेते अमोल जाधव यांनी गेल्या दोन महिन्यांमध्ये प्रशासकीय पातळीवर तुळजापूर तालुक्यात निर्माण झालेल्या वेगवेगळ्या समस्यांच्या अनुषंगाने आवाज उठवला असून तुळजापूरच्या राजकारणामध्ये आवाज उठवण्याची कोणाची हिम्मत उरलेली नसताना आणि भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर एकमेकांना सहकार्य करणाऱ्या राजकारणात त्यांनी मोजकी उचललेली अन्यायाविरुद्धची पावले तुळजापुरातील सामान्य माणसाला समाधान देणारे आहेत.
तुळजापूर मध्ये कोणताही कार्यकर्ता आपल्या पक्षाशी एकनिष्ठ नाही अनेकजण दोन डगरीवर पाय ठेवून राजकारण करतात. एखाद्याने चुकीची बाब केली असेल तर त्याच्या वरुद्ध आवाज उठवण्याची फारशी तसदी कोणी घेत नाही. एकमेकांना सहाय्य करू अवघे धरू सुपंथ या उक्तीप्रमाणे प्रत्येक जण कोठे ना कोठे आपल्या लाभाचे काम करत आलेला आहे आणि एकमेकांना मिळून विसरून राजकारण करण्याचा सल्ला दिला जातो. अशा मिळून मिसळून करावयाच्या राजकारणामुळे निष्ठावंत आणि पक्षासाठी त्या करणारी मंडळी जवळपास दुरपास्त झालेली आहेत.
तुळजापूर नगरपरिषद, तुळजाभवानी मंदिर आणि सर्व पक्षाचे राजकीय प्रशासन याशिवाय जनतेच्या प्रश्नासोबतची बांधिलकी अशा महत्त्वाच्या विषयावर कोणीही एकमेकाला नाराज करण्याच्या भानगडीत पडत नाही प्रत्येक जण एकमेकांना सहाय्य करत आपला लाभ उठवत पुढे चाललेला आहे. यामध्ये स्वकीय आणि परकीय याचा देखील भेद दिसून येतो. तुळजाभवानी साखर कारखान्याच्या विरोधात शेतकऱ्यांनी कारखान्याला दिलेला ऊस आणि कारखान्याकडून शेतकऱ्याच्या ऊसाला मिळणारी बिल तसेच कारखान्यामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मागील चार महिन्यापासून पगार नसल्यामुळे त्यांची होणारी उपासमार अशा दोन प्रमुख मुद्द्यांना सोबत घेऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे युवक नेते अमोल जाधव यांनी उपोषणाची नोटीस दिली होती या नोटिशीचा फारसा परिणाम न झाल्यामुळे व दखल न घेतल्यामुळे त्यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली पहिल्याच दिवशी सायंकाळी काँग्रेसचे युवक नेते ऋषिकेश मगर व काँग्रेस लिगल असेल तालुका अध्यक्ष रामचंद्र ढवळे यांच्या नेतृत्वाखाली यशस्वी चर्चा झाली व आमरण उपोषण वापस घेण्यात आले. यशवंत तुळजापूर येथील रजिस्ट्री कार्यालयामध्ये होणाऱ्या कारभाराच्या विरोधात अमोल जाधव यांनी निवेदन देऊन काही सुधारणा सांगितलेले आहेत. तुळजापूर नगरपरिषद आणि तुळजाभवानी मंदिर येथे देखील अनेक व्यवस्थांच्या अनुषंगाने अमोल जाधव यांनी आवाज उठवला आहे त्यांच्या प्रश्नाला सहकार्य करणाऱ्या लोकांची आणि स्वाक्षरी करणारी लोकांची संख्या कमी आहे. प्रस्थापितांना नाराज न करण्याचा राजकारणात वावरणाऱ्या कार्यकर्त्यांचा स्वभाव लक्षात घेता अमोल जाधव यांना देखील आगामी काळात टीकेचे लक्ष केले जाऊ शकते अशी शक्यता नाकारता येत नाही. परंतु सर्वसाधारणपणे सर्वसामान्य माणसाच्या आणि अशा विषयाच्या अनुषंगाने संदर्भीय असणाऱ्या लोकांमधून शिवसेना युवक नेते अमोल जाधव यांनी मागील दोन महिन्यांमध्ये उचललेल्या प्रश्नाच्या अनुषंगाने समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
राजकारण समाजकारण आणि विकासाच्या प्रश्नावर जिथे काहीच चुकलेले आहे किंवा चुकण्याची शक्यता आहे अशा ठिकाणी संबंधिताला जागे करण्याचे काम कोणीतरी केले पाहिजे यापूर्वी शहरांमध्ये काँग्रेस आणि शेतकरी कामगार पक्ष यांच्यामध्ये कट्टर राजकारण केले जात होते. त्यानंतरच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारचे कट्टर व निष्ठावंत राजकारण राहिलेले नसून आपले सगे सोयरे आणि मित्रपरिवार नातेवाईक यांच्या पुरते मर्यादित राजकारण झालेले आहेत या मुठभर लोकांच्या लाभासाठी सर्वसामान्य माणसाच्या विविध प्रश्नाकडे दुर्लक्ष केले जाते. लोकसभा निवडणुकीमध्ये ओमराजे निंबाळकर उद्धव ठाकरे गटाचे खासदार म्हणून निवडून आले प्रस्थापित आमदार राणा जगजित सिंह पाटील यांनी अचानकपणे आपल्या पत्नी सौभाग्यवती अर्चनाताई पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये पाठविण्याचा निर्णय देखील लोकांना आवडलेला नाही तरीही कोणी या संदर्भात उघड निवडणूक काळात बोलले नाही हे देखील अशाच राजकारणाचे उदाहरण आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे अमोल जाधव यांच्या निवेदन देताना आणि उपोषणाच्या ठिकाणी ठाकरे गटाचे पदाधिकारी देखील अनुपस्थित दिसून आले यावरून आश्चर्य व्यक्त करण्यात आले आपल्याच पक्षाचा कार्यकर्ता एखाद्या प्रश्नावर काम करत असेल तर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी समर्थन का करू नये. अमोल जाधव यांची भूमिका चुकीची असेल तर आपल्या पक्षाची भूमिका देखील चुकीची होऊ शकते असे समजून त्यांची समजूत काढणे किंवा राजकीय भाषेमध्ये त्यांना व्यक्त होण्यासाठी तयार करणे ही जबाबदारी पक्षाची नाही का अशी देखील चर्चा उपोषणाच्या ठिकाणी सुरू होते. किती पातळीवर आपण आपले आपले म्हणून सामान्य आणि शहराच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करणार आहोत हेच लक्षात येत नसताना दिसून येत आहे.
तुळजापूर येथे होणारे बस स्थानक तुळजापूर येथील वाढती यात्रा लक्षात घेता अत्यंत भव्य दिव्य स्वरूपात होणे गरजेचे होते परंतु आज होत असलेले बस स्थानक पाहिल्यानंतर प्रशासनाची आणि नियोजन करण्याची उदासीनता दिसून येते या प्रश्नाकडे देखील कोणी गांभीर्याने पाहिलेले नाही हा शहराच्या विकासाकडे दुर्लक्ष करण्याचा आणखीन एक नवीन मुद्दा आहे . लातूर रोड चे नवीन बस स्थानक अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले आहे प्रचंड नालीचे घाण पाणी या बस स्थानकाच्या समोर वाहते मागील दोन-तीन वर्षापासून ही समस्या आहे या रस्त्यावर असणारा मुख्य रस्त्याला जोडणारा सर्विस रोड अद्याप झालेला नाही तो सर्विस रोड न झाल्यामुळे नालीचे पाणी हजारो भाविक भक्त आज पायदळी तोडून पुढे जात आहे या महत्त्वाच्या प्रश्नाकडे देखील शहरातील लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केले आहे. भाविक भक्त स्वच्छता आणि गटारीच्या पाण्यावरून जाताना काय प्रतिक्रिया देतात हे येथील राजकारण करणाऱ्या नगरसेवक आणि राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उभे राहून ऐकले पाहिजे. त्याच्या बाजूला प्रचंड कचरा टाकलेला असतो आणि या कचऱ्याची मोठी दुर्गंधी येथे पसरते तोंडाला रुमाल लावल्याशिवाय भाविक भक्तांना शहरांमध्ये येता येत नाही आणि दर्शन झाल्यानंतर बस स्थानकामध्ये जाताना तोंडाला रुमाल लावावा लागतो हे वास्तव कधी बदलणार आहे याकडे भाविकांचे लक्ष लागले आहे. म्हणून शिवसेना ठाकरे गटाचे अमोल जाधव यांचे पत्रकार आणि प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी देखील योग्य दखल घेतली पाहिजे कारण विरोधी पक्ष आणि प्रसार माध्यम यांचे समन्वयाने लोकशाही आणि शहराच्या विकासाला गती मिळण्यासाठी मदत होऊ शकते सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यावर वचक ठेवण्यासाठी अशा प्रकारच्या निवेदन आणि प्रयत्नांना प्रसिद्धी मिळाली पाहिजे अशी लोकभावना आहे.