तुळजापूर दिनांक 10 प्रतिनिधी
तुळजाभवानी मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावर चार चाकी वाहनांचा प्रवेश बंद केल्यानंतर आर्यचौक येथे उभारण्यात आलेल्या गेटमध्ये भाविकांना जाण्यासाठी मार्ग नसल्यामुळे दोन चाकी गाड्या आणि भाविक यांच्या दरम्यान कोंडी होत आहे यावर उपाय करण्याचे मागणी शहरातील नागरिकांनी व्यापारी वर्गांमधून करण्यात येत आहे.
तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गर्दी वाढल्यामुळे प्रशासनाने वेगवेगळ्या उपाययोजना केलेल्या आहेत कोणत्याही उपाययोजना केल्यानंतर त्याचे फायदे आणि तोटे समोर येत असतात आर्य चौक येथे गेट बसवल्यानंतर मंदिराकडे जाणारी चार चाकी वाहने थांबलेली आहेत येथील वाहतुकीला चांगली शिस्त लागली आहे .भाविकांना होणारा त्रास कमी झाला आहे. सुरुवातीच्या पहिल्या आठवड्यामध्ये चार चाकी आणि दोन चाकी सर्व वाहन मंदिराकडे जाण्याचा बंद केलेले होते त्यामुळे अधिक शिस्त लागलेली होती परंतु शहरातील नागरिकांची दोन चाकी वाहने सोडवण्याची मागणी लक्षात घेऊन प्रशासनाने गणपतीच्या मंदिरापासून गेट दरम्यान चा भाग दोन चाकी वाहनांना खुला ठेवला आहे परंतु या मार्गावर भाविकांची पायी चालणारी संख्या जास्त असल्यामुळे हा मार्ग अपुरा पडतो आहे याच मार्गावर दोन चाकी वाहने देखील दोन्ही बाजूने येतात तेव्हा वाहतुकीची कोंडी काही प्रमाणात होत आहे गडबडीच्या प्रसंगांमध्ये आमने- सामने येत आहेत त्यामुळे डाव्या आणि उजव्या दोन्ही बाजूंनी वाहनांना जाण्याची व्यवस्था करणे गरजेचे आहे दोन्ही बाजूने दुचाकी वाहने यातायात करू शकले तर भाविकांना त्रास होणार नाही अशी परिस्थिती आहे प्रशासनाने या संदर्भात उपाययोजना करण्याची शहरवासीची मागणी आहे.
काही जाणकार शहरवासी यांच्या मते कमान 20 मार्गाने येणारे यात्रेसाठी गेट भगवती विहिरीच्या दरम्यान असावे अशी मागणी आहे कारण आर्य चौक येथे परिसर कमी असल्यामुळे गेटमुळे वाहतुकीची कोंडी झाली आहे भगवती विहिरी च्या परिसरात गेट बसवल्यास तेथे वाहतुकीला वळवण्यासाठी दोन पदरी रस्ता उपलब्ध आहे. भाविकांना त्रास न होण्याच्या अनुषंगाने हा बदल करणे आवश्यक आहे प्रशासनाने याबाबतची पडताळणी करावी आणि गेटच्या अनुषंगाने निर्णय घ्यावा अशी मागणी आहे.