आषाढी एकादशीच्या निमित्ताने कवी प्रदीप बसवंतवाडीकर यांच्या गीताला मिळाली लोकप्रियता
तुळजापूर दि 14 डॉक्टर सतीश महामुनी
नुकत्याच पार पडलेल्या आषाढी एकादशीच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या घराघरांमध्ये तुळजापूर तालुक्यातील बसवंतवाडी येथील शीघ्र कवी प्रदीप पाटील बसवंतवाडीकर यांच्या भक्ती गीताने मोठ्या प्रमाणावर लोकप्रियता मिळवली.तुळजापूर तालुक्यातील शीघ्र कवी प्रदीप पाटील अनेक वर्षापासून वेगवेगळ्या विषयावर विशेषतः ग्रामीण जीवनावर कविता लेखन करतात त्यांची अनेक गाणी चित्रपटासाठी आणि मालिका साठी वापरले गेले आहेत नव्याने त्यांनी आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर लिहिलेल्या या भक्ती गीताने पांडुरंगाच्या दर्शनासाठी आलेल्या हजारो भाविकांना हे गीत मंत्रमुग्ध करून गेले.
आषाढी एकादशीच्या 8 दिवस अगोदर भूम तालुक्यातील डोंगरगाव येथील रहिवाशी पोलीस खात्यामध्ये रात्रंदिवस बंदोबस्ताचे ड्युटी करणारे परंतु विठ्ठलाच्या नामघोषांमध्ये लीन झालेले गायक विकास कसबे यांनी गायलेले व बसवंतवाडी तालुका तुळजापूर येथील शीघ्रकवी प्रदीप पाटील बसवंतवाडीकर यांनी लिहिलेले आषाढी ची वाडी वारी चाले माझ्या घरी दिनांचा कैवारी पांडुरंग….. हे आषाढी वारीचे आणि महाराष्ट्रातल्या घराघरांमध्ये असणाऱ्या पांडुरंगाच्या वारकऱ्याचे नाते सांगणारे सुंदर भक्ती गीत लिहिले.
एखाद्या घरामधील वारकरी जेव्हा पंढरपूरची वारी करतो वर्षानुवर्ष या घराची ही सेवा चालू असते यादरम्यानच्या काळामध्ये त्याच्या घरातील सर्व सदस्य आणि अंगणातील तुळस देवघरातील देव्हारा आणि पांडुरंगाच्या भक्ती मध्ये लीन झालेले कुटुंबातील इतर सदस्य यांचे नाते सांगणारे हे भक्ती गीत प्रदीप बसवंतवाडीकर यांनी लिहिले आहे आणि त्याचे गायन देखील तेवढ्याच तयारीने करण्यात आल्यामुळे युट्युब वर या गीताने खूप मोठी लोकप्रियता प्राप्त केली. देशभरातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये मराठी माणसांनी हे युट्युब वरील गीत ऐकले आणि प्रदीप पाटील बसवंतवाडीकर यांचे या निमित्ताने जोरदार स्वागत केले आहे.
कविता लेखन प्रकारामध्ये शीघ्र कवी म्हणून प्रदीप पाटील हे गेल्या 40 वर्षापासून सतत लेखन करतात. त्यांची शिवार गीते आणि ग्रामीण जीवनावर प्रकाश टाकणारी अनेक गीते चित्रपट आणि वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये अनेक वेळा लोकप्रिय झालेली आहेत. तुळजापूरची तुळजाभवानी देवी येरमाळ्याची येडाई देवी आणि इतर देवी देवतांच्या अनुषंगाने