कळंब तालुक्यातील महिलासाठी घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाचे धर्मदर्शन, पर्यटन आणि एकत्रीकरणांमधून महिलांचा परस्पर सुसंवाद उपक्रम

तुळजापूर दिनांक 11 डॉक्टर सतीश महामुनी

छत्रपती संभाजीनगर येथील घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी कळंब तालुक्यातील महिलांसाठी दर्शनाच्या कार्यक्रमाचे आयोजन आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्ष सौ अर्चनाताई पाटील यांनी आयोजन केले आहे या उपक्रमाचे कळम तालुक्यातून जोरदार स्वागत करण्यात आले आहे श्रावण महिन्याच्या निमित्ताने दरवर्षी या कार्यक्रमाचे आयोजन माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सौ अर्चनाताई पाटील यांच्याकडून केले जाते.

हिंदू संस्कृतीमध्ये श्रावण महिन्यात धर्मदर्शन करणे पुण्य मानले जाते हाच धागा पकडून माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सौ अर्चनाताई पाटील यांनी मागील काही वर्षापासून कळंब तालुक्यातील महिलांना श्रावण महिन्यामध्ये धर्मदर्शनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करतात त्याला महिलांचा मिळणारा प्रतिसाद लक्षात घेऊन त्यांनी हा कार्यक्रम दरवर्षी सुरू ठेवला आहे यावर्षी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन करण्याचा कार्यक्रम 12 सप्टेंबर रोजी पहाटे 4 वाजता आयोजित केला आहे.

कळम तालुक्यातील मोहा डिकसळ येरमाळा खामसवाडी ईटकुर नायगाव शिराढोण आणि मंगरूळ या जिल्हा परिषद मतदार संघातील महिलांना यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे आवश्यक बसेस ची व्यवस्था संयोजकांच्या वतीने करण्यात आली आहे. यात निमित्ताने महिलांचे एकत्रीकरण धर्मदर्शन आणि सुसंवाद होणार आहे. मनमोकळे वातावरणामध्ये महिलांचे होणारे हे एकत्रीकरण आणि छत्रपती संभाजीनगर येथील ज्योतिर्लिंगाचे धर्मदर्शन याचा आनंद महिलांना मिळणार आहे. सुव अर्चनाताई पाटील यांनी चालवलेल्या या उपक्रमाचे कळंब तालुक्यात जोरदार स्वागत करण्यात आलेली आहे

One thought on “कळंब तालुक्यातील महिलासाठी घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाचे धर्मदर्शन, पर्यटन आणि एकत्रीकरणांमधून महिलांचा परस्पर सुसंवाद उपक्रम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *