केंद्र आणि राज्य सरकार यांच्या योजना मधून खऱ्या अर्थाने स्त्री शक्तीचे सक्षमीकरण – अस्मिताताई कांबळे

शारदीय नवरात्र महोत्सव , नवदुर्गा – “जागर स्त्रीशक्तीचा “
 कार्यक्रम तुळजापूरात उत्साहात
 धाराशिव दि.2 प्रतिनिधी

पुरुषांच्या तुलनेत स्त्रिया कुठेही कमी नाहीत त्यांनी स्वतःच्या क्षमता ओळखून आपली प्रगती, विकास साधावा,असे आवाहन माजी जि.प.अध्यक्षा अस्मिताताई कांबळे यांनी केले.
         
राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत तुळजापूर येथील शिवपार्वती मंगल कार्यालयात “जागर स्त्री शक्तीचा” या विशेष कार्यक्रमाचे आयोजन नुकतेच करण्यात आले.या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या.यावेळी मंचावर सिने अभिनेते पंकज विष्णू,माजी जिल्हा परिषद उपाध्यक्षा तसेच लेडीज क्लबच्या धाराशिवच्या अर्चनाताई पाटील,कार्यक्रम संयोजिका सीमा देसाई – नायर आदी उपस्थित होते.

जिल्ह्यातील पर्यटन वाढावे, महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री. तुळजाभवानी मातेचे वैभव जगासमोर यावे या उद्देशाने ‘जागर स्त्री शक्तीचा ‘ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.या कार्यक्रमाद्वारे केंद्र व राज्य शासनाची महिलांविषयक विविध धोरणे स्त्रियांना समजण्यास मदत होईल असा आशावाद त्यांनी यावेळी व्यक्त केला. तर शासनाच्या महिलांविषयक धोरणांचा उपस्थित महिलांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा.असे आवाहन अस्मिता कांबळे यांनी केले.


          18 ते 23 ऑक्टोंबर या कालावधीत राज्यातील 6 महसुली विभागीय आयुक्तालयाच्या ठिकाणी (मुंबई, पुणे, नाशिक,छत्रपती संभाजीनगर,अमरावती व नागूपर) तसेच साडेतीन शक्तीपिठांच्या ठिकाणी (कोल्हापूर, तुळजापूर, माहूर, वणी ) नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे राज्य शासनाच्या महिलांविषयक योजनांची माहिती देणारा विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमास आमदार संवाद संवाद मंच सदस्य एडवोकेट सौ. क्रांती थिटे यांची उपस्थिती होती.
          लघू नाटिका,नृत्य,स्लाईड शो आदीद्वारे राज्य शासनाच्या महिलांविषयक योजना व सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण करण्यात आले.तसेच यावेळी कार्यक्रमास उपस्थित महिलांसाठी  प्रश्नमंजूषाही  घेण्यात आली.विजेत्या महिलांना पारितोषिके देण्यात आली.या कार्यक्रमासाठी महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली होती.
 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *