क्रांतीसुर्य आंबेडकर अंगणवाडी क्रं. 12 येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा.
तुळजापूर दि. 30 (प्रतिनिधी) :
आपल्या भारत देशात अनेक प्रकाराचे सण व उत्सव साजरे करण्यात येत असतात. रक्षाबंधन म्हणजे बहिण-भावाच्या प्रेमाचे बंधन या दिवशी बहिण-भावाच्या हातावर राखी बांधून भावाचे ह्दय प्रेमाने जिंकून घेते. हा सण म्हणजे पराक्रम, प्रेम, साहस किंवा संयमाचा संयोग होय, जगातील सर्व नात्यांमध्ये भाऊ-बहिणीचे प्रेम निस्वार्थी आणि पवित्र असते.
या निमित्याने तुळजापूर येथील जवाहर गल्ली येथील क्रांतीसुर्य आंबेडकर अंगणवाडी क्रमांक 12 तुळजापूर एकात्मिक बाल विकास सेवा योजना नागरिक प्रकल्प उस्मानाबाद अंतर्गत येथे दि. 29 रोजी रक्षाबंधन साजरा करण्यात आला.
यामध्ये अंगणवाडीतील लहान मुलींनी लहान मुलांना राखी बांधली असता, लहान मुलांनी भावाच्या नात्याने एक भेट म्हणून रुमाल, बिस्किट असे प्रत्येकाने भेट दिली. असा रक्षाबंधनचा कार्यक्रम मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी, सेविका प्रजा विकास कदम आणि मदतनीस करुणा आनंद हत्तीकर लहान बाळ-गोपाळ उपस्थित होते.