जालना येथे करण्यात आलेला लाठीमार अत्यंत गंभीर आहे सरकारला याची किंमत मोजावी लागेल योगेश केदार यांची इशारा

तुळजापूर/ गेवराई दि 2 प्रतिनिधी9

जालना येथे मराठा आरक्षणाची मागणी करणाऱ्या शांतता मुळे आंदोलकांवर लाठीचार्ज करून त्यांना रक्तबंबाळकर पर्यंत मारहाण केली ही बाब महाराष्ट्राच्या परंपरेला शोभणारी नाही सरकारला याची किंमत मोजावी लागेल मराठा समाज शांततेने आरक्षणाची मागणी अनेक ठिकाणी करत असताना मारहाण करण्याची आवश्यकता काय होती असा सवाल मराठा वनवास यात्रेची संयोजक योगेश केदार यांनी विचारला आहे.

येणाऱ्या निवडणुकीत मराठ्यांनी प्रस्थापित आमदारांना पाडण्याची भूमिका घ्यावी. त्याशिवाय हे सर्व पक्षीय नेते मराठा समाजाला आरक्षण देणार नाहीत. आपण स्वतः तुळजापूर ते मुंबई अशी पाई वनवासी यात्रा केली आहे या यात्रेला जागोजागी मिळालेल्या प्रतिसाद आणि सरकारची उदासीनता या अत्यंत गंभीर बाबी आहेत या अनुषंगाने केंद्र सरकारने राज्य सरकार यांनी गांभीर्याने विचार करून तातडीने मराठा समाजाला आरक्षण देणे गरजेचे आहे मराठा समाज अनेक वर्षापासून ही मागणी करीत असताना त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे ही बाबत चिंताजनक आहे सरकारलाही आरक्षण द्यावेच लागणार आहे असे मनोगत जालन्याच्या या घटनेनंतर मराठा वनवास यात्रेचे संयोजक योगेश केदार यांनी व्यक्त केले आहे.

मराठा समाजाचे अनेक प्रश्न उग्र स्वरूप धारण केलेले आहे आरक्षणाचा मुद्दा तर अनेक वर्षापासून प्रलंबित आहे .पूर्वी राज्यकर्ते म्हणायचे की मराठा समाजाच्या संघटना , त्यांच्या मागण्या अनेक, मग आम्ही नेमके ऐकायचे कोणाचे? आम्ही आज मराठ्यांच्या सगळ्या संघटना एक करू शकलो नसलो तरी सगळ्यांची मागणी मात्र एक केली आहे. आपण सर्वजण ओबीसी मधूनच आरक्षण या एकमेव विषयावर एकदिलाने एकत्र आलो आहोत. सरकार ने ते आरक्षण द्यावे. जास्तीचे नाटक करू नये मराठा वनवास यात्रेचे संयोजक योगेश केदार यांनी आपली भूमिका यानिमित्ताने मांडली आहे.

पेड जाहिरात- भाग्यश्री कॉम्प्युटर नगरपालिकेसमोर तुळजापूर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *