तुळजापूर दि ४ डॉ.सतीश महामुनी
शहरातील रहिवाशी नागेश प्रतापराव पैलवान यांच्या मुलाने प्रतिकूल परिस्थितीवर मात करत जिद्द आणि चिकाटीच्या बळावर केंद्र सरकारच्या कस्टम अधिकारी या पदाला गवसणी घातली असून देवेंद्र नागेश पैलवान असे या तरुणाचे नाव आहे. देवेंद्र ची कस्टम अधिकारी म्हणून इंडियन कस्टम्स मुंबई झोन येथे पोस्टिंग झाली आहे.
तुळजापूर शहराला शैक्षणिक क्रीडा व राजकीय या क्षेत्राचा मोठा वारसा लाभलेला असून शहरातील अनेक व्यक्ती उच्च पदावर काम करत आहेत शहराने अनेक खेळाडू ही घडवले असून पैलवान कुटुंबाला राजकीय पार्श्वभूमी ही लाभलेली आहे शहरातील जुन्या काळातील नामांकित व शहराचे लोकप्रिय नगराध्यक्ष डी.एन पैलवान हे त्यांचे पंजोबा होते तसेच आजोबा प्रतापराव पैलवान यांनीही शहराचे नगरसेवक पद भूषवले होते असा संपन्न वारसा लाभलेल्या शहरातील व पैलवान कुटुंबातील देवेंद्र पैलवान यांनी केंद्रीय आयोगाच्या माध्यमातून घेत्यात येणारी सि. जी. एल . इ, 2022 सारखी अत्यंत स्पर्धात्मक परीक्षा पास करत कस्टम अधिकारी या पदाला गवसणी घातली आहे.
देवेंद्र पैलवान याचे दहावीपर्यंतचे शिक्षण शहरातीलच कुलस्वामिनी विद्यालय येथे झाले असून दहावीत तो 92 टक्के घेऊन उत्तीर्ण झाला होता ,पुढे लातूर येथे दयानंद महाविद्यालयामध्ये बारावीचे शिक्षण घेऊन मुंबई येथील विद्यालंकार इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केले.
देवेंद्र याने यापूर्वी सर्वे ऑफ इंडिया या केंद्र शासनाच्या अखत्यारीत येणाऱ्या विभागात फील्ड असिस्ट तसेच संरक्षण मंत्रालया अंतर्गत येणाऱ्या डिफेन्स अकाउंट्स डिपार्टमेंट मध्ये लेखापरीक्षक (auditor) म्हणून ही काम केले आहे.
देवेंद्रची ही तिसरी निवड असून पुन्हा नव्या जिद्दीने प्रयत्न कायम ठेवत देवेंद्रने केंद्र सरकारच्या कस्टम विभागात दाखल होत कस्टम अधिकारी म्हणून, इंडियन कस्टम्स मुंबई झोन येथे पोस्टिंग मिळाली आहे.
त्याच्या या चिकाटीबद्दल सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे…
*आमच्या प्रतिनिधीने संपर्क साधला असता देवेंद्रने त्याच्या यशाचे श्रेय त्याच्या कुटुंबाला दिले आहे. हे यश माझे नसून माझ्या आई -वडिलांनी, कुटुंबियांनी वा मित्रमंडळींनी माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाचे आणि त्यांनी माझ्यासाठी घेतलेल्या कष्टाचे आहे असे त्याचे मत आहे. महाराष्ट्रामध्ये केंद्रीय विभागात असणाऱ्या विविध विभागामधील संधीबद्दल जागृतीची कमी आहे आपल्या मुलांसाठी सरकारी नोकरी म्हणलं की एमपीएससी हेच एक सूत्र माहित आहे महाराष्ट्रामधील मुलांनी सुद्धा केंद्रीय विभागामध्ये असणाऱ्या विविध संधीन बद्दल जागरूक होऊन तिथे आपली गुणवत्ता सिद्ध करून देशाच्या विकासामध्ये आपले अमूल्य योगदान दिले पाहिजे तसेच भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत काळामध्ये कस्टम विभागाचे ‘देशसेवार्थ करसंचय’ हे ब्रीदवाक्य मनात ठेऊन कस्टम्स अधिकारी या पदावर काम करत असताना भारताच्या आर्थिक सीमाचे रक्षण करण्याची संधी आपल्याला प्राप्त होता आहे याचाही अभिमान वाटत असल्याचे मत देवेंद्र ने व्यक्त केले.