तुळजापूर दि 28 डॉक्टर सतीश महामुनी
तीर्थक्षेत्र असणाऱ्या तुळजापूर शहरामध्ये शहरांतर्गत रिक्षा प्रवास करण्यासाठी लातूर आणि सोलापूरच्या धर्तीवर दहा रुपये सीट प्रमाणे प्रवास करण्याचा निर्णय रिक्षा संघटनेने घ्यावा अशी तुळजापुरातील विद्यार्थी आणि नागरिकांची मागणी आहे. पत्रकार सतीश महामुनी यांनी याविषयी एक वृत्त प्रकाशित केल्यानंतर स्थानिक नागरिकांनी दहा रुपये प्रति सीट निर्णय झाला तर आम्ही शहरांतर्गत वाहतुकीसाठी रिक्षाचा वापर करून आणि असा निर्णय संघटनेने घेतला पाहिजे अशा प्रतिक्रिया दिलेल्या आहेत.
तुळजाभवानी मंदिर ते बस स्थानक , बस स्थानक ते वाय सी कॉलेज , बस स्थानक ते सारा गौरव कॉलनी, मलबा हॉस्पिटल ते तुळजापूर खुर्द, तुळजाभवानी मंदिर ते हडको कॉलनी , आर्य चौक ते बस स्थानक , पावणारा गणपतीचे बस स्थानक , आठवडा बाजार ते बस स्थानक , छत्रपती शिवाजी महाराज चौक ते तुळजाभवानी मंदिर , दीपक संघ चौक ते घाटशीळ मंदिर , बस स्थानक ते तुळजाभवानी महाविद्यालय , अशा शहरातील वेगवेगळ्या मार्गावर ऑटो रिक्षा संघटने कडून एका व्यक्तीला दहा रुपये प्रमाणे करता यावा अशी व्यवस्था संघटनेने करावी अशी स्थानिक नागरिकांची मागणी आहे एका व्यक्तीला एका वेळेस दहा रुपये खर्च येत असेल तर ती व्यक्ती दिवसभरात अनेक वेळेला रिक्षा मधून प्रवास करू शकते त्यामुळे रिक्षा वापरण्याची नागरिकाचे प्रमाण वाढू शकते लातूर सोलापूर येथील व्यवसायाचा अंदाज घेऊन रिक्षा संघटनेने सकारात्मक विचार करून या विषयावर एखादी बैठक घेऊन आपला निर्णय जाहीर करावा यामध्ये रिक्षा व्यवसायाचा फायदाच होणार आहे व्यवसाय वाढल्यामुळे प्रत्येक रिक्षाचालकाला चांगला आर्थिक फायदा होणार आहे याविषयी रिक्षा संघटना आणि जाणकारांनी तसेच प्रादेशिक वाहतूक विभागाच्या वतीने करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनानुसार रिक्षा संघटना पदाधिकाऱ्यांनी निर्णय घ्यावा यामध्ये रिक्षा संघटनेला हा निर्णय तोट्याचा वाटत असेल तर त्यांनी आज जी भाडे वाढ झालेली आहे ती मर्यादित कमी करावी ज्यामुळे सामान्य माणसाला रिक्षा वापरणे सोयीस्कर होईल.
जास्त व्यवसाय करून लातूर सोलापूर येथे रिक्षा चालक जर समाधानी असतील तर तुळजापूर स्थानिक ऑटो रिक्षा व्यवसाय करणाऱ्या बांधवांनी याविषयी विचार केला पाहिजे दहा रुपये सीट प्रमाणे प्रवास करण्याची संधी नागरिकांना दिल्यानंतर यामध्ये कोणाचा फायदा होणार आहे याचा त्यांनीच विचार करावा आणि दोन्ही बाजूनी फायदेशीर निर्णय घ्यावा जर दहा रुपये सीट प्रमाणे निर्णय करणे रिक्षा चालकांना परवडणारे असेल तर तातडीने निर्णय घ्यावा अशी नागरिकांच्या वतीने रिक्षा संघटनेला मागणी करण्यात आली आहे. असा निर्णय झाला तर बाहेरगावाहून येणाऱ्या भाविकांना दिलासा मिळणार आहे आणि शहरातील गोरगरीब लोक तसेच विद्यार्थी वर्ग जास्त प्रमाणात रिक्षाचा वापर वापरतील.
बहुत बढ़िया प्रस्तुति जी