तुळजापूर दि 26 न्यूज मराठवाडा प्रतिनिधी
बदललेल्या जीवनशैलीमुळे मानवी जीवन धोक्यात आले असून आता अनेक आजार वाढताना दिसतात शुगर बीपी व अन्य आजार यामुळे माणसे त्रस्त झालेली आहेत. मानवाची रोगप्रतिकारक शक्ती कमी होत आहे. यावर मात करण्यासाठी आपल्या दैनंदिन आहारामध्ये पौष्टिक तृणधान्य चा वापर करणे गरजेचे आहे असे मत परिवर्तन सामाजिक संस्थेचे सचिव मारुती बनसोडे यांनी व्यक्त केले.
अफार्म पुणे परिवर्तन सामाजिक संस्था नळदुर्ग तालुका कृषी अधिकारी कार्यालय तुळजापूर यांच्या संयुक्त विद्यमाने बोरगाव ता.तुळजापूर येथे पौष्टिक तृणधान्य प्रोत्साहन अभियान अंतर्गत शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते .कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी बोरगावचे उपसरपंच लक्ष्मणराव पाटील होते तर प्रमुख पाहुणे म्हणून बसवंतराव मुळे ,अंकुशराव पाटील, अप्पाराव मुळे, बाबुराव पाटील, सुधाकर पाटील , अशोक कांबळे,, पोलीस पाटील नागेश कलशेट्टी, गौतम कांबळे इत्यादी उपस्थित होते.
तुळजापूर तालुक्यातील बोरगाव येथे कृषी मंडळ अधिकारी दिपाली सरवदे व कृषी सहाय्यक कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी शेतकरी मेळावा घेण्यात आला आहे या मेळाव्यात पुढे बोलताना मारुती बनसोडे म्हणाले की कोरोनाच्या लाटे नंतर या धान्याचे महत्त्व लक्षात आलेले आहे जगभरामध्ये 2023 वर्ष हे मिलेट वर्ष म्हणून साजरे केले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज तृणधान्य प्रोत्साहन अभियानांतर्गत शेतकरी मेळावा घेण्यात आला या मेळाव्यात तृणधान्याचे महत्त्व पटवून देण्यात आले .
या कार्यक्रमात शेतकऱ्यांना तृणधान्येच्या बी बियाण्याचे वाटप ही करण्यात आले आता शेतकरी स्वतःच्या शेतात त्याची पेरणी करतील व त्याचे बियाणे पुढे वाढवण्याचे काम करून मोठ्या प्रमाणात याचा वापर कसा करता येईल यावर काम केले जाणार आहे या ठिकाणी तृणधान्य प्रोत्साहन अभियान संदर्भात माहिती देणारे पोस्टर प्रदर्शन लावण्यात आले होते या पोस्ट प्रदर्शनाची पाहणी शेतकऱ्यांनी केली असून यामुळे शेतकरी प्रेरित झाले आहेत. त्यांना एक नवीन प्रेरणा मिळाली आहे असे शेतकरी चर्चा करीत होते.यावेळी बोरगावचे उपसरपंच लक्ष्मणराव पाटील यांनी आपल्या गावातून जास्तीत जास्त भरड धरण्याचं उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न आणि करू असे आश्वासन दिले आहे. आज सर्व शेतकऱ्यांना वाचन साहित्याचे ही वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अप्पा साळुंखे , अशोक कांबळे यांनी सहकार्य केले आहे शेवटी सर्वांचे आभार व्यक्त करुन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली