धाराशिव जिल्ह्यात शिवसेना मजबूत करणार – पालकमंत्री तानाजी सावंत यांची ग्वाही

पालकमंत्री प्रा.डाॅ.तानाजी सावंत यांच्या हस्ते युवकांचा शिवसेनेत प्रवेश

तुळजापूर दि ९ प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा.डॉ. तानाजी सावंत यांच्या हस्ते सहसंपर्कप्रमुख अमरराजे कदम यांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून अनेक युवकांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश देण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री तानाजीराव सावंत यांचे लोक उपयोगी काम आणि हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन अनेक तरुण शिवसेना शिंदे गटात येण्यासाठी उत्सुक आहेत या सर्वांना पक्षात प्रवेश दिला जाईल अशी भूमिका शिवसेना शिंदे गटाच्या वतीने यावेळी सांगण्यात आली.

यावेळी तुुळजापुुर येथील बापूसाहेब भोसले,अभिजीत अमृतराव, धर्मराज पवार माजी नगरसेवक, बार असोसिएनचे अध्यक्ष विधीज्ञ संजय पवार,विधीज्ञ उदयसिंह भोसले,देवसिंगाचे सरपंच देविदास राठोड,मोहन भोसले,स्वाभिमान शेतकरी संघटनेचे माजी तालुकाध्यक्ष बिपिन खोपडे,रमेश ननवरे,खंडू कुंभार,देवानंद चव्हाण,निरंजन करंडे,गणेश रोकडे,अभिजीत पाटील,सुरज कोठावळे,निलेश कदम,संजय गायकवाड,अनिल जाधव,कृष्णा घाटे,शाहूराज कोरेकर,राजकुमार कोरेकर,मल्हारी कांबळे, स्वराज कदम,अमोल शिंदे,धनाजी खंडाळकर,पवन कदम, प्रमोद कदम,सचिन विलास धुरगुडे,जेष्ठ शिवसैनिक मनोज मिश्रा, इत्यादी शेकडो कार्यकर्त्यांचा आज जाहीर प्रवेश घेण्यात आला.

पालकमंत्री महोदयांनी पक्षप्रवेशानंतर मंदिरच्या प्रशासकीय कार्यालयात जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्या समवेत बैठक घेऊन होणा-या मंदिर विकास आराखड्यातील अनेक चुका निदर्शनास आणून दिल्या, पालकमंत्री तानाजी सावंत यांनी सदर बाबी ऐकून घेऊन उपस्थितांना अस्वस्थ केले . तुळजाभवानी मंदिरातील मौल्यवान देवीच्या दागिन्यांच्या अनुषंगाने बोलताना भक्तांनी देविस वाहिलेले दागदागिने गहाळ प्रकरणी चौकशी पुर्ण होताच कोणाला ही पाठीशी घातले जाणार नाही असे प्रसार माध्यमांना सांगितले

तुळजापूर शहरातील भवानी रोडवरती चांभारगल्ली समोरील लोखंडी गेट दुचाकी वाहनास खुले करण्याचे आदेश दिले.यावेळी धाराशिव जिल्हा सहसंपर्कप्रमुख अमरराजे कदम परमेश्वर,शिवसेना जिल्हाप्रमुख मोहन पनोरे, सुरज महाराज साळुंखे, दत्ता आण्णा साळुंखे,माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष धनंजय सावंत साहेब, अनिल खोचरे साहेब, प्रा.गौतम लटकेसर,शिवसेना उपजिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर घोडके, शिवसेना तालुकाप्रमुख संभाजी राजे पलंगेसह आदी पदाधिकारी यांची उपस्थिती होती. जिल्ह्याचे सहसंपर्कप्रमुख अमर राजे कदम यांनी शिवसेना शिंदे गट संघटना मजबूत करण्यासाठी पालकमंत्री तानाजी सावंत यांच्या उपस्थितीत शहर आणि तालुक्यातील तरुण युवकांना पक्षांमध्ये प्रवेश दिलेला आहे यानंतर अनेक युवक पदाधिकारी पक्षांमध्ये प्रवेश करणार असल्याचे या निमित्ताने त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *