ग्रामपंचायतमध्येही स्वीकृत सदस्य निवडण्याची मागणी
तुळजापूर दि 17 न्यूज मराठवाडा प्रतिनिधी
राज्यातील सर्व ग्रामपंचायतमध्ये नगरपंचायत, नगरपालिके सारखेच स्वीकृत सदस्याची निवड करण्याची मागणी पत्रकार सिद्दीक पटेल यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सचिवालय येथे निवेदनाद्वारे केली आहे.
ग्रामपंचायत अधिनियम कायदा (१९५८) कलम ५ नुसार ग्रामपंचायतमध्ये सदस्य निवड होते. वार्ड रचना व आरक्षण यामुळे चांगल्या सामाजिक राजकीय काम करु इच्छुक लोकांना या पध्दतीमुळे निवडणूक अथवा ही संधी मिळत नाही. यामुळे ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये चांगल्या लोकांना समाविष्ठ करता येत नाही. ग्राम पंचायत निवडणुका अतीसंवेदनशील होतात. परंतु, स्वीकृत सदस्य निवड करण्याचा अधिकार दिल्यास काही समाजसेवक, सुशिक्षित राजकारणाची आवड असणार्या पण निवडणुका न लढवता न्याय देऊ शकतो. हे करण्यासाठी महाराष्ट्र नगर पालिका अधिनियम 1956 च्या काही तरतूदी नुसार 10 नगरसेवका मागे 1 स्वीकृत नगर सेवक निवडता येते. याप्रमाणे ग्रामपंचायत अधिनियम कायद्यामध्ये बदल करुन गावची लोकसंख्या किंवा ग्रामपंचायत सदस्य संख्या नुसार ग्रामपंचायत स्वीकृत सदस्य निवड करण्याचा अधिकार देण्यात यावा. यामुळे गावविकासाची तळमळ असणारे गावातीलच होतकरू व्यक्तिमत्त्व असणार्या नागरिकांना या संधीचा फायदा घेऊन गावविकासासाठी काहीतरी नविन करून दाखविण्याची संधी मिळेल. अशी मागणी सिद्दीक पटेल यांनी निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनावर तुळजापूर भावसार समाज अध्यक्ष संजय खुरुद, अविनाश पवार, अलावदिन पटेल, जुबेर पटेल, सत्यजित साठे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.