तुळजापूर दि 22 प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टी धाराशिव नवनिर्वाचित जिल्हा अध्यक्ष संताजीराव पाटील चालुक्य यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार कृषी उत्त्पन्न बाजार समितीचे सभापती सचिन पाटील यांच्या शुभहस्ते तुळजापुरात करण्यात आला . याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
भारतीय जनता पार्टीची जिल्हाध्यक्ष पदाची धुरा हाती पडल्यानंतर नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य प्रथमच तुळजापुरात आले होते त्यांनी महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीची पूजा केली व आशीर्वाद घेतले या दर्शनाच्या नंतर त्यांनी भारतीय जनता पार्टीचे वतीने त्यांचा शाल आणि तुळजाभवानीची प्रतिमा देवून सत्कार करण्यात आला.
जिल्ह्याचे चिटणीस गुलचंद व्यवहारे ,तालुका अध्यक्ष संतोष बोबडे ज्येष्ठ नेते क्रम देशमुख, शहरअध्यक्ष शांताराम पेंदे, उद्योजक बाबा श्रीनामे, उद्योजक बाबा घोंंगते,सागर पारडे , इंद्रजीत साळुंखे, हे यावेळी उपस्थित होते.
यापुढे उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यपद्धतीच्या अनुषंगाने अनौपचारिक चर्चा झाली यावेळी नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष संताजीराव चालुक्य यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि महाराष्ट्रातील भाजपचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेले शासनाचे काम अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने सुरू आहे या कामाचा थेट लाभ लोकांना मिळतो आहे त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकार प्रत्येक घराघरांमध्ये आणि जनतेच्या मनामध्ये स्थान करून आहे आगामी काळात आपणास अनेक निवडणुकांना सामोरे जायचे आहे या काळात आपण याच जनता भिमुख कामाचा प्रचार आणि प्रसार जनतेमध्ये करायचा आहे आपल्या जिल्ह्यामध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार सुजितसिंह ठाकूर आणि आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्याची प्रगती जलद गतीने होते आहे वेगवेगळे विकासाचे प्रकल्प मार्गी लागत आहेत रेल्वे सरकार महत्त्वाचा प्रकल्प देखील साकार होण्याच्या मार्गावर आहे तुळजापूर तीर्थक्षेत्राचा कायापालट करणारा विकास दृष्टिक्षेपात जवळ आलेला आहे राज्य आणि केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या योजना लोकांच्या घरापर्यंत पोहोचलेले आहेत या सर्व कामाची पावती 2024 मध्ये पुन्हा राज्य आणि केंद्रामध्ये भाजपाचे राज्य प्रस्थापित होण्यामधून मिळणार आहे असे त्यांनी या निमित्ताने सांगितले.