प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होण्यासंदर्भात शरद पवार यांचे विधान भाजपाला थोपवण्यासाठी, देशाच्या राजकारणासाठी पवारांची महत्त्वाची भूमिका

तुळजापूर दि 8 डॉ. सतीश महामुनी

देशाच्या राजकारणामध्ये भारतीय जनता पार्टी आणि नरेंद्र मोदी यांच्या महाशक्तीला राजकीय दृष्ट्या शह देण्यासाठी देशपातळीवरील सर्व प्रादेशिक पक्षांनी एकत्र आले पाहिजे अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज प्रसार माध्यमातून व्यक्त केली असून या त्यांच्या विधानाने राजकीय क्षेत्रात चर्चेला उधाण आले आहे वास्तविक पाहता शरद पवार हे देखील अनेक वर्ष काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री आणि इतर महत्त्वाच्या पदावर काम केलेले राजकीय नेते आहेत सोनिया गांधी यांना परकीय असल्याचे टीका करून त्यांनी काँग्रेस पक्ष सोडला आणि 1999 स*** राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली ही स्थापना करताना राजकारणामध्ये त्यांचा पवित्र वेगळा होता आणि आज मात्र तेच शरद पवार काँग्रेसच्या नेतृत्वाखाली सर्व प्रादेशिक पक्षांना एकत्र आणण्याची भाषा करीत आहे या विषयावरून हे राजकीय वादळ निर्माण झाले आहे.

या लोकसभा निवडणुकीमध्ये सबका साथ सबका विकास आणि एक बार मोदी सरकार 4 00 खासदार निवडून आणण्याचा पवित्र जाहीर करून भारतीय जनता पक्षाने देशाच्या राजकारणामध्ये खळबळ उडवून दिली आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा जवळपास सर्व मतदारसंघांमध्ये जाहीर सभा घेऊन प्रचाराचा सपाटा लावलेला सर्वांनी पाहिलेला आहे मागील निवडणुकीमध्ये अशाच प्रकारचा प्रचार करून त्यांनी 303 जागा गमावले आहेत देशपातळीवर आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिमा लौकिक पात्र करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भूमिका शहरी मतदारांनी डोक्यावर घेतली आहे ग्रामीण भागामध्ये शेतमालाला भाव नसणे त्याचबरोबर वाढती महागाई आणि बेरोजगारी या मूलभूत अडचणी लक्षात घेऊन मतदारांनी भारतीय जनता पार्टीला देखील यावेळेस विरोध करण्याचा प्रयत्न केला आहे हा विरोध लोकांमधून आहे जनतेमधून आहे ही बाब अधोरेखित करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार सर्व प्रादेशिक पक्षांना काँग्रेसच्या नेतृत्वाखाली एकत्र येण्यासाठी साद घालत आहे.

ममता बॅनर्जी नितीश कुमार लालूप्रसाद यादव मेहबूबा मुफ्ती उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे भाजप विरोधी ठळक दिसणारे प्रादेशिक पक्षांची प्रमुख आहेत ज्यांनी आपल्या राज्यामध्ये आपल्या पक्षाची सत्ता आणलेली आहेः किंवा हे प्रादेशिक पक्ष त्याच्या राज्यांमध्ये आपली राजकीय ताकद कायम ठेवून आहेत या सर्व प्रादेशिक पक्षांना एकाच पक्षांमध्ये सामील करून चांगली राजकीय शक्ती निर्माण करण्याचा विचार इंडिया आघाडी आणि त्यातील काही नेत्यांनी विचार केला असावा तो फक्त शरद पवार यांनी आज प्रसारमाध्यमांमध्ये व्यक्त करून या विचाराला चर्चेमध्ये रूपांतरित केले आहे वास्तवात पाहता पंधरा वर्षांपूर्वी या देशांमध्ये काँग्रेस हा खूप मोठा पक्ष होता वटवृक्ष वाटावा किंवा इतर पक्षांना काही किंमत नसावी अशा प्रकारचा पक्षाचा व्याप आणि विस्तार होता परंतु हा पक्षाचा व्याप आणि विस्तार कमी करण्यामध्ये नरेंद्र मोदी यांना भरपूर यश प्राप्त झाले आहे या त्यांच्या यशाच्या पाठीमागे काँग्रेस पक्षाची भ्रष्टाचारी कारकीर्द आणि आपलेच नातेवाईक यांना सांभाळण्याची कायम वृत्ती राजकारणातील घराणेशाही घराणेशाही केंद्रित राजकारण या गोष्टींना कंटाळून जनतेने भारतीय जनता पार्टी आणि नरेंद्र मोदी यांच्या 2014 मध्ये झालेल्या वेगवेगळ्या जाहीर सभांच्या माध्यमातून दिलेल्या प्रतिसाद आणि त्यामधून निर्माण झालेले मोदी सरकार आज दहा वर्षाची पूर्ण झाली आहे या दहा वर्षाच्या कार्यकाळामध्ये सरकारने केलेल्या ठळक कामाची प्रसारमाध्यमांमधून केली गेलेली जाहिरात आणि मोदी सरकारच्या कामकाजावर विश्वास ठेवणारा मोठ्या प्रमाणात निर्माण झालेला मतदार या सर्व भारतीय जनता पार्टीच्या जमेच्या बाजू आहेत.

2014 पूर्वी देशामध्ये महाशक्ती म्हणून कारभार करणारी काँग्रेस पार्टी होती या पार्टीचे तिकीट मिळवणे म्हणजे निवडून येण्याची खात्री अशीच पक्षाची स्थिती होती त्या काळात भारतीय जनता पार्टीचे केवळ दोन खासदार होते अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी मुरली मनोहर जोशी सुषमा स्वराज अशा नेत्यांचा हा काळ होता या काळात काँग्रेसचे नेतृत्व राजीव गांधी आणि त्यानंतर सोनिया गांधी यांनी केले गांधी घराण्याची खूप योगदान या देशासाठी आहे स्वातंत्र्यापासून देश घडवण्यापर्यंत गांधी घराण्याने केलेले योगदान अनन्यसाधारण आणि अधोरेखित करणारे असले तरी त्यांच्याभोवती असणारे राजकीय चाणक्य मात्र केवळ आणि केवळ पक्षाचा लाभ घेऊन भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देणारे होते म्हणून काँग्रेस पक्ष या काळात बदनाम झाला. या बदनामीमुळे काँग्रेस पक्षाचे प्रतिमा प्रत्येक राज्यामध्ये खालावली गेली आणि प्रादेशिक पक्षांनी या प्रत्येक राज्यांमध्ये आपले स्थान निर्माण केले अनेक नेते काँग्रेस पक्षामधून बाहेर पडून आपले प्रादेशिक पक्ष काढून त्याच पक्षाची सत्ता राज्यामध्ये आणून आज राज्य काबर करीत आहे त्याचे चालते बोलते उदाहरण म्हणजे स्वतः शरद पवार हे देखील आहेत.

राजकारण देशासाठी व देश जनतेसाठी याचा बराच विचार देश पातळीवरचे राजकारण करणाऱ्या प्रमुख राजकारण्यांना खूप वर्षांपूर्वी पडला त्यांनी स्वार्थाचे आणि भ्रष्टाचाराचे राजकारण केल्यामुळे काँग्रेस सारखा मोठा पक्ष आज अस्तित्वासाठी झगडतो आहे राहुल गांधी यांचे नेतृत्व दोन वेळा त्यांनी भारत जोडो ही पदयात्रा देशभर काढली अनेक किलोमीटर त्यांनी पदयात्रा करून काँग्रेस पक्षाला जोडण्याचा तसेच जनतेचा पाठिंबा काँग्रेस पक्षाला मिळवण्यासाठी आपापल्या परीने त्यांनी प्रयत्न केलेले आहेत कोणत्या ना कोणत्या कारणाने राहुल गांधी यांच्या नेतृत्वाला आजपर्यंत भरघोस राजकीय निवडणुका जिंकण्याचे यश प्राप्त झाले नाही परंतु राहुल गांधी यांनी एकट्याच्या बळावर चालवलेली ही राजकीय वाटचाल आहे शरद पवार यांच्या मतानुसार काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाखाली इतर सर्व प्रादेशिक पक्षांनी एकत्र आल्यास ही राजकीय शक्ती एकत्र येऊन भारतीय जनता पार्टीला आमने-सामने लढत देण्यासाठी ताकद निर्माण करण्याचा आहे शरद पवार यांचे राजकारण प्रत्येक दशकांत बदलत गेलेले आहे महाराष्ट्रामध्ये त्यांनी आपली प्रतिष्ठा कायम ठेवली आहे आजही त्यांना चांगला जनाधार आहे या जनादारा ला सोबत घेऊन त्यांनी हे विधान केले आहे त्यांचे पुतणे अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडला आणि भारतीय जनता पार्टीबरोबर सत्तेमध्ये उपमुख्यमंत्री पद प्राप्त केले त्यानंतर शरद पवार यांनी आपल्या पक्षांमध्ये असलेल्या नेत्यांना सोबत घेऊन लोकसभा निवडणूक लढवली आहे यासाठी त्यांनी उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि महाराष्ट्र काँग्रेस यांना सोबत घेतली आणि भाजपच्या विरोधात महाराष्ट्रामध्ये चांगले वातावरण निर्माण केले अनेक राजकीय जाणकाराच्या मते भारतीय जनता पार्टीच्या वादळासमोर महाविकास आघाडी टिकणार नाही 48 जागा भारतीय जनता पार्टी जिंकणार असल्याची घोषणा करत होती या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव नाही कांदा आणि सोयाबीन या पिकाला हमीभाव न मिळाल्यामुळे शेतकऱ्याची खूप मोठ्या प्रमाणात झालेले नुकसान आणि वाढती महागाई बेरोजगारी या मूलभूत लोकांच्या समस्यांना समोर ठेवून महाविकास आघाडीने महाराष्ट्रामध्ये आपल्या जाहिरातीत निर्माण केल्या आपल्या पत्रकार परिषदा आणि जाहीर सभांमधून मोदी सरकार विरोधात रान उठवले राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांना लक्ष करू प्रचार अत्यंत गतिमान केला त्यामुळे भारतीय जनता पार्टीची या राज्यामध्ये 48 जागा निवडून आणण्याची स्थिती नाही असे मतदानानंतर वाटते आहे लोकांना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सोबत घेऊन भारतीय जनता पार्टीने राज्यांमध्ये सरकार स्थापन केले हे लोकांनी मान्य केले आहे परंतु त्यानंतर अजित पवार आणि त्यांची राष्ट्रवादी यांना सत्तेमध्ये घेतले ही बाब लोकांना आवडलेली नाही या घटनेमुळे खूप मोठा मतदार भाजपच्या विरोधात गेलेला आहे ही बाब देखील या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने समोर आलेली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शरद पवार यांनी प्रादेशिक पक्षांना केलेले आवाहन गांभीर्याने घेण्याची गरज आहे कारण लोकशाही आणि संसदेतील सभागृह तसेच प्रत्येक राज्यांमधील विधानसभा आणि स्थानिक राजकारण स्थिर होण्यासाठी सर्व प्रादेशिक पक्षांची एकजूट होणे तेवढेच महत्त्वाचे आणि गरजेचे देखील आहे परंतु शरद पवार यांचे राजकीय क्षेत्रातील स्वार्थी राजकारण लक्षात घेता प्रादेशिक पक्ष त्यांच्या आवाहनाला किती महत्त्व देतील हे पुढच्या काळात लक्षात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *